Vaicārika lēkhana mhaṇajē kāya
कृतिपत्रिकतील प्रश्न ५ ( ड ) मधील तीन लेखनप्रकारांपैकी अन्य एक प्रकार आहे -'वैचारिक लेखन',
प्रस्तुत प्रकरणात ' वैचारिक लेखन ' या लेखनप्रकाराचे मार्गदर्शन दिले आहे .
या प्रकारात कृती पुढीलप्रमाणे विचारली जाईल :
( १ ) विषय देऊन त्यावर विचार प्रस्तुत करणे,
( २ ) मुढ्यांच्या किंवा विप्राकृतीच्या साहाय्याने लेखन करणे .
चित्रातले लहान चित्रघटक म्हणजे एक प्रकारे लेखनासाठी दिलेले मुददेच होत . फक्त हेच मुद्दे निबंधात यायला हवेत , असे बंधन नसते . या मुद्द्यांमध्ये विदयार्थी स्वत : च्या मुद्दयांचीही भर घालू शकतात .
लेखनात हे मुद्दे कोणत्या क्रमाने यावेत , कोणत्या मुद्दयाला किती महत्त्व दयावे हे विप्रावरून सहजपणे कळणार नाही . त्यामुळे विदयार्थ्याला मुक्तपणे लेखन करण्याची संधी मिळणार आहे .
शब्दमर्यादा : १०० ते १२० शब्द ,
"Vaicārika lēkhana mhaṇajē kāya" कोणत्याही विषयाचा सखोल व सर्वांगीण आढावा घेऊन स्वतःचे मौलिक विचार मुद्देसूदपणे मांडणे , यालाच ' वैचारिक लेखन ' म्हणतात . या लेखनात स्वत : च्या विचारांना महत्त्व असतेच ; त्याचबरोबर तर्कशुद्ध मांडणीलाही महत्त्व असते . या प्रकारात दिलेले विषय हे आपल्या अवतीभवतीच्या परिस्थितीच्या संदर्भातीलच असतात . आपल्या भोवतीच्या सध्याच्या परिस्थितीत कोणत्या त्रुटी आहेत ; या त्रुटींमागील कारणे कोणती आहेत ; ही कारणे कशी दूर करता येतील ; ही कारणे दूर करताना कोणत्या अडचणी संभवतात ; त्या अडचणींवर मात कशी करता येईल इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह या प्रकारच्या लेखनात अपेक्षित असतो . या लेखनाला ' निबंध ' असेही म्हणतात , .
आपला विचार मांडताना आपल्या विचाराला अनुकूल असलेले सगळे मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत . त्याचबरोबर आपल्या विचाराला प्रतिकूल असलेले मुद्देही लक्षात घेतले पाहिजेत . म्हणजेच दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे . विरुद्ध बाजू कशी निराधार वा चुकीची आहे , हे सप्रमाण दाखवून दिले पाहिजे . मग आपल्याला अनुकूल मुद्द्यांतील सामर्थ्य स्पष्ट करून आपली बाजू कशी योग्य आहे , हे सांगितले पाहिजे . पण हे अत्यंत थोडक्या शब्दांत करावे . -
या प्रकारच्या लेखनाची भाषा सोपी असावी . भारदस्त भाषा असली म्हणजे आपला विचार श्रेष्ठ ठरतो , असे नाही . मात्र या लेखनाची प्रकृती गंभीर असते , हेही लक्षात घेतले पाहिजे . Vaicārika lēkhana mhaṇajē kāya
vaicārika lēkhana kasē karāvē ?
१. विषय व मुर्घावर आधारित वैचारिक लेखन नमुना कृती :
वैचारिक लेखन', ग्रामीण सहजीवन 'vaicārika lēkhana Grāmīṇa sahajīvana'
ग्रामीण जीवनातील स्नेहभाव
अडीअडचणीत मदत करणे
मुलांपासून थोरांपर्यंत एकोपा
ग्रामीण भागातील परस्परसंबंधांचे स्वरूप
ग्रामीण भागातील उणिवा
एकोप्याचा आधार
'ग्रामीण सहजीवन'
आमच्या गावी आमचे घर आहे . शेती आहे . तेथे आमचे काका राहतात , आम्ही शहरात राहतो . एकदा काका आमच्याकडे चार दिवसांसाठी आले होते . रात्री आम्ही जेवायला बसलो होतो . गप्पाटप्पा जोरात चालू होत्या , काका गावच्या गमतीजमती सांगत होते . हास्यविनोद चालू होते . तेवढ्यात अचानक गावाहून फोन आला . काकांच्या घरफोडी झाली होती . तोडफोडीचा आवाज ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली , गावी घरे दूर दूर असतात , त्याचा चोरट्यांनी फायदा घेतला होता . परंतु आरडाओरड करून लोकांनी सर्वांना गोळा केले . चोरांशी झटापट केली , त्यांना चोप दिला आणि पोलिसांकडे सुपूर्द केले , काका धावतपळत गावी गेले . स्वत : च्या जिवाची पर्वा न करता गावकरी चोरांना भिडले होते . शेजाऱ्यांमुळे खूप मोठी हानी टळली होती , काकांचा कर भरून आला . त्यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले , " अहो , आभार कसले मानता ? आज तुमच्यावर पाळी आली . उदया आमच्यावरही येऊ शकते . सर्वांनी एकमेकांना मदत केली , तर आपले सगळ्यांचेच भले होईल , " लोकांनी काकांना समजावले .
लोकांचे हे म्हणणे खरेच होते . ग्रामीण भागात लोकच लोकांचे रक्षण करतात , आमच्या गावी तर दिवसा दार लावतच नाहीत , तरी कोणाच्याही घरी चोरी होत नाही . मुले तर या घरातून त्या घरात पावतपळत पकडापकडीचा खेळ खेळत असतात , एखादा पदार्थ वा वस्तू अचानक अवेळी हवी झाली , तर लोक शेजाऱ्यांकडे हक्काने जातात . घर परतण्यासारखी कामे तर सहकार्यानेच होतात . सर्वजण एकत्रितपणे एकेकाचे घर परतत जातात . त्यामुळे एका दिवसात एकेका घराची कौले काढून पुन्हा लावली जातात . कोणाच्याही घरातील धार्मिक कार्याला आवश्यकतेप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात . आजारपणात हमखास मदत केली जाते . पहिला पाऊस पडतो , त्या वेळी एखादया घरातील कर्ता माणूस आजारी पडला तर बाकीचे सर्वजण विचारविनिमय करून त्या माणसाचे शेत नांगरून देतात , अशा वेळी कोणीही कुरकुर करीत नाही . कारण अशी वेळ कोणावरही येऊ शकते , याची जाणीव सर्वांना असते .
मला नेहमी याचेच कुतूहल वाटत राहते की , ग्रामीण भागात हे कसे काय घडते ? मी पाहतो की , तेथे गावातील सर्व माणसे एकमेकांना पूर्णपणे ओळखतात . सर्वांच्या नातेवाइकांसकट सर्व माहिती सगळ्यांना असते . सर्वांना एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो . एखादयाने काही खास कर्तबगारी दाखवली , तर गावातल्या सगळ्यांना ती स्वतःची कर्तबगारी वाटते आणि त्यांची छाती अभिमानाने फुगून जाते .
वास्तविक पाहता गावात अनेक बाबींची कमतरता असते . वाहतूक सेवा , आरोग्य सेवा ; पाणी , वीज , जीवनोपयोगी वस्तू यांचा पुरवठा ; शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी इत्यादी सर्वच बाबतीत उणिवा असतात , त्यामुळे लोक हतबल , काही प्रमाणात निराश झालेले असतात . त्यामुळेच बहुतेक त्यांना एकमेकांच्या सहकार्याची गरज भासते . अडचणीच्या वेळी एकमेकांच्या मदतीला धावून गेले पाहिजे , हे त्यांना मनोमन जाणवलेले आहे . या कारणांनी सगळेजण स्वतःचे जीवन इतरांच्या जीवनाशी जुळवून घेतात . आपले विचार , कल्पना , स्वप्ने , सुखदुःखे , अडीअडचणी इत्यादींशी संपूर्ण ग्रामीणजीवन जोडून घेतात . किंबहुना तशी जगण्याची रीतच निर्माण करतात . ग्रामीण सहजीवनाचा हाच मुख्य आधार आहे .
तुम्हाला 'वैचारिक लेखन', म्हणजे काय व ते कसे करावे", हेे कळले असेल आवडले असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा आणि लाईक करा.

0 Comments