बातमी लेखन मराठी 2021 | Batmi Lekhan In Marathi for class 10th


नमस्कार मित्रांनो आज आपण (बातमी लेखन मराठी)  batmi lekhan in marathi बातमी लेखन हा मराठी उपयोजित लेखन यामधील महत्त्वाचा भाग बघणार आहोत.यामध्ये आपण बातमी लेखन म्हणजे काय? बातमी लेखन करताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि सर्वात शेवटी एक नमुना कृती आपण बघणार आहोत तर चला मग बघुया बातमी लेखन.

दहावीच्या परीक्षे मध्ये batmi lekhan in marathi 10th class 2020-2021 दरवर्षी यावर एक प्रश्न असतो.




बातमीलेखन ( गुण ५ ) 


कृतिपत्रिकेतील प्रश्न ५ ( आ ) मध्ये तीन लेखन प्रकारांपैकी  एक अन्य प्रकार आहे. बातमीलेखन 

प्रस्तुत प्रकरणात 'बातमीलेखन' या लेखनप्रकारासंबंधात मार्गदर्शन दिले आहे.

कृतिपत्रिकेत एखाद्या घटना-प्रसंगाची किंवा एखाद्या समारंभाची माहिती देऊन त्याआधारे बातमीलेखन करण्यास सांगितले जाईल.

शाळेत, परिसरात साजरे झालेले कार्यक्रम 
( उदा ., मराठी भाषादिन , स्नेहसंमेलन , शालेय घडामोडी ,  सहल , आपत्ती व्यवस्थापन ) वगैरेंची माहिती देऊन बातमीलेखनासाठी मुद्दे दिले जातील . बातमीलेखन यासाठी मुद्दे हे शब्द किंवा चित्रे यांच्या सहाय्याने दिले जातील .
शब्दमर्यादा : ५०६० शब्द , 

Batmi Lekhan In Marathi for class 10th


• प्रस्तावना : 

समाजात रोज असंख्य घटना घडत असतात . त्यांपैकी आपण पाहिलेल्या - ऐकलेल्या घटना एकमेकांना सांगतो , समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनांची माहिती आपल्याला मिळावी , अशी सर्वांचीच इच्छा असते . म्हणून वर्तमानपत्रातून ही माहिती दिली जाते. समाजात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटनेची जी माहिती वर्तमानपत्रातून दिली जाते , तिला
  ' वृत्त ' किंवा ' बातमी ' असे म्हणतात . ही बातमी लेखी स्वरूपात तयार करणे म्हणजे    ' वृत्तलेखन ' किंवा ' बातमीलेखन ' होय . 

आकाशवाणीवरून आणि दूरचित्रवाणीवरूनही बातमी सांगितली जाते . मात्र हा बातमीचा प्रकार श्राव्य किंवा दृक् - श्राव्य स्वरूपाचा असतो . इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमानुसार आपल्याला वर्तमानपत्रासाठी लिहिल्या जाणाऱ्या बातमीचा प्रकार अभ्यासायचा आहे . चलातर मग पुढे शिकूया ' बातमी-लेखन '. 'Batmi Lekhan In Marathi' 


( १ ) शीर्षकावरून बातमी तयार करणे .
        उदा . , शाळेचा शताब्दी वर्ष सांगता समारंभ माननीय शिक्षणमंत्री यांच्या  उपस्थितीत संपन्न .

( २ ) विषयावर आधारित बातमी तयार करणे.

        उदा . , सर्व नागरिकांसाठी आधार कार्डाचा नंबर आपल्या बँकखात्यास लिंक करणे अनिवार्य .

( ३ ) दिलेल्या घटनेची / कार्यक्रमाची बातमी तयार करणे .
 
        उदा . , ' मराठी भाषा संवर्धन ' पंधरवडा ' या उपक्रमास शहरातील सर्वच शाळांकडून उत्तम प्रतिसाद . 

( ४ ) दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी तयार करणे . 

         उदा . , करोना-साथ-रुग्णसंख्या-विलगीकरण-जिल्हा .

बातमीलेखनाचे स्वरूप : 

बातमीचे पुढीलप्रमाणे पाच भाग पडतात . प्रत्येक बातमीत हे पाच भाग असतातच , 

( १ ) शीर्षक : संपूर्ण बातमीचा अर्क बातमीच्या शीर्षकात असतो . शीर्षक म्हणजे बातमीचा आत्माच होय . म्हणून शीर्षक आकर्षक असते . ते वाचताक्षणी वाचकांना बातमीच्या आशयाची ओळख करून देते . शीर्षक दोन शब्दांपासून काही शब्दांपर्यंत असते . शीर्षक नेहमी कमीत कमी शब्दांत लिहिलेले असते . बातमीविषयी कुतूहल निर्माण करणे व वाचकांच्या मनात बातमी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणे हे शीर्षकाचे हेतू असतात .

( २ ) बातमीचा स्रोत : बातमी कोणी दिलेली आहे , हे या भागात सांगितलेले असते . ' आमच्या वार्ताहराकडून ' , ' आमच्या प्रतिनिधीकडून ' , ' आमच्या विशेष प्रतिनिधीकडून ' , ' एक्स्प्रेस वृत्तसंस्थेकडून ' किंवा ' टाइम्स वृत्तसंस्थेकडून ' अशा प्रकारची माहिती शीर्षकानंतरच्या ओळीत दिलेली असते .

( ३ ) स्थळ व दिनांक : बातमीत सांगितलेली घटना कोठे व कधी घडली हे यात सांगितलेले असते . बातमीच्या सुरुवातीलाच ' मुंबई , दि . १५ ' , ' नागपूर , दि . १५ ' हा तपशील या भागात येतो . त्यानंतर लागलीच बातमीला सुरुवात होते .  

( ४ ) बातमीचा शिरोभाग : बातमीचा पहिला परिच्छेद म्हणजे बातमीचा शिरोभाग होय . बातमीतील अत्यंत महत्त्वाचा भाग या शिरोभागात लिहिलेला असतो . बातमी वाचण्याची उत्कंठा शिरोभाग वाचल्यावर पूर्ण होते . 

( ५ ) बातमीचा तपशील किंवा विस्तृत बातमी : शिरोभागानंतरच्या परिच्छेदात बातमीचा विस्तृत तपशील दिलेला असतो . बातमीचा मागचा - पुढचा संदर्भ या भागात स्पष्ट केलेला असतो . या भागात बातमीला पूर्णत्व येते .  

Batmi Lekhan In Marathi 


बातमीलेखनात घ्यायची काळजी : 

( १ ) बातमी ही कधीही पाल्हाळीक नसावी .

( २ ) बातमीत स्थळ , काळ यांचा आवर्जून उल्लेख करावा . 

( ३ ) घटना जशी घडली तशीच लिहावी . स्वत : ची मते व्यक्त करू नयेत .थोडक्यात , बातमी ही वस्तुस्थितिदर्शक          असावी . ती तटस्थ वृत्तीने लिहिली पाहिजे .  

( ४ ) बातमीची भाषा साधी व सोपी असावी . Batmi Lekhan In Marathi वाक्ये छोटी असावीत . परिच्छेद लहान            असावा . 


( ५ ) बातमीला योग्य शीर्षक दयावे . 

( ६ ) एखादया समारंभाची बातमी असल्यास समारंभाचे आयोजन कोणी केले , अध्यक्ष कोण होते , पाहुणे कोण              आले होते यांचा आवर्जून उल्लेख करावा .  

( ७ ) बातमीमध्ये कोणाची व्यक्तिगत निंदानालस्ती असू नये ; समाजाच्या भावना भडकवणारा वा वंदनीय व्यक्तींची           प्रतिमा डागाळणारा मजकूर असणार नाही , याची खबरदारी घेतली पाहिजे .

बातमीलेखन नमुना कृती :

  १. शीर्षकावरून बातमी

( १ ) दादरमधील कलात्मक रांगोळी प्रदर्शन .

दादरच्या रसिकाला कलात्मक झळाळी देणारे रांगोळी प्रदर्शन

    ( आमच्या वार्ताहराकडून ) 

दादर , दिनांक १६ - " मुंबईच्या महापौर असल्याचा मला आज खूप खूप अभिमान वाटत आहे . दादरच्या कलावंतांनी दादरच्या सांस्कृतिक वातावरणाला फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे , " असे भावपूर्ण उद्गार महापौर xx xxxx xxxx यांनी भव्य रांगोळी प्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या वेळी काढले .

एस.ए.डी. ॲकॅडमीच्या भव्य आवारात अनोखे रांगोळी प्रदर्शन भरले असून , गेले तीन दिवस ते पाहण्यासाठी रसिकांची अलोट गर्दी झाली . विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट दिली.

 या रांगोळी प्रदर्शनात सौंदर्यपूर्ण रचनांचेच प्रदर्शन मांडलेले दिसत होते . ठिपक्यांच्या रांगोळ्यांपासून ते पाण्यावरच्या रांगोळ्यांपर्यंत सर्व प्रकारच्या रांगोळ्या तेथे काढलेल्या होत्या. भूमितीच्या आकारांचा उपयोग करून सौंदर्यपूर्ण रांगोळ्या काढल्या होत्या . विविध आकारांच्या त्रिकोणांचा व लहानमोठ्या वर्तुळांचा सुरेख मेळ साधून सौंदर्यकृती निर्माण केल्या होत्या . त्या रांगोळ्यांत मुक्तहस्त आकृत्या होत्या , तसेच वृक्षवेलीही चितारल्या होत्या . रंग वापरण्याचे कौशल्य तर वाखाणण्यासारखे होते . विविध रंग केवळ वापरण्यासाठी वापरले नव्हते ; तर सौंदर्यपूर्ण दृष्टीने त्यांची पखरण केलेली होती. निसर्गदृश्ये तर हुबेहूब वाटावीत अशी होती .

रांगोळ्यांच्या रेषांमधली नजाकत व त्यांवरची कलावंतांची हुकूमत पाहून रसिक प्रसन्नचित्त चेहऱ्याने घरी परतत होते .

Batmi Lekhan In Marathi 

२)  विषयावर आधारित बातमी



• सर्व स्कूलबसवर शाळांचे संपूर्ण नियंत्रण आवश्यक आहे . 

सर्व स्कूलबसवर शाळांचे संपूर्ण नियंत्रण आवश्यक 

( आमच्या विशेष प्रतिनिधीकडून ) 

पुणे , दिनांक १६ ऑक्टोबर : ' जनजागृती ' तर्फे ' प्रवासी कट्टा ' या विषयावर  शाळेच्याबसबाबत सूचना मागवण्यात आल्या होत्या . त्या उपक्रमांतर्गत विदयार्थ्यांच्या सुखरूप आणि सुरक्षित प्रवासासाठी शाळाबसवर शाळांचे संपूर्ण नियंत्रण असावे अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे .
 
शहरात सध्या वाहतुकीचा बोजवारा उडाला आहे . ठिकठिकाणी खोदलेल्या मेट्रोच्या खड्ड्यांमुळे प्रवास विलंबाने होत आहे . विदयार्थी रोज दीड ते दोन तास विलंबाने घरी पोहोचतात . त्यामुळे विदयार्थी आणि पालक दोघेही त्रस्त झाले आहेत . याच पार्श्वभूमीवर पालकांनी काही सूचना पाठवल्या होत्या .

शाळा , शाळाबस - चालक , मदतनीस आणि पालक यांची एक बैठक बोलवावी ; बैठकीत पालकांना शाळाबस - चालक व मदतनीस यांची माहिती दयावी ; तसेच विदयार्थी सुरक्षा लक्षात घेऊन मदतनिसांना ' प्रथमोपचार ' प्रशिक्षण देण्यात यावे , अशी अनेकविध मते त्यातून व्यक्त झाली होती . 

बसमध्ये अग्निशमन यंत्रणा असावी ; बसच्या खिडक्यांना तीन दांड्या असाव्यात ; स्कूलबस मदतनिसांना ओळखपत्रे दिली जावीत ; सुट्टीच्या दिवशी / रविवारी बसची नियमित तपासणी केली जावी ; इत्यादी मौलिक सूचना ' प्रवासी कट्ट्या'च्या माध्यमातून पालकवर्गाकडून करण्यात आल्या .

विदयार्थ्यांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा, यासाठी शाळांनी वरील सूचनांचा विचार करावा , असे मत सर्वच स्तरांतून व्यक्त केले जात आहे .

  ३ ) घटनेवर आधारित बातमी तयार करा

उदाहरण :

 अविचाराने ओढवला भीषण अपघात ! 

 सेल्फी काढताना जीव गमावला ... 

( आमच्या वार्ताहराकडून )

 महाबळेश्वर , दि . २६ जुलै : काल रोजी संध्याकाळी एका पर्यटक मुलाला सेल्फी काढताना जीव गमवावा लागला. सदर मुलगा मुंबईहून इथे फिरण्यासाठी आला होता. सेल्फी काढण्याच्या नादात तो १४०० फूट खोल दरीत कोसळला व त्याचा मृत्यू झाला . सुमारे पाच तासांच्या प्रयत्नांनंतर मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले . गोविंदा चव्हाण ( ३४ ) असे या मुलाचे नाव असून महाबळेश्वरच्या इको पॉइंट येथे ही घटना घडली . पावसाळ्याच्या निसर्गरम्य वातावरणात अनेक पर्यटकांची पावले महाबळेश्वरकडे वळतात . मुंबईतील चव्हाण कुटुंब आपल्या दोन मुलासह महाबळेश्वरला पर्यटनाला आले होते . सायंकाळी हे सर्वजण महाबळेश्वरच्या प्रसिद्ध इको पॉइंट येथे फिरायला गेले होते . या वेळी गोविंदा हा  आपल्या वडीलानसमवेत कड्याजवळ उभे राहून सेल्फी काढत असताना, जोरदार वाऱ्यामुळे गोविंदा याचा तोल गेला आणि तो १४०० फूट खोल दरीत कोसळला . या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघात झालेल्या कुटुंबीयांना साहाय्य केले . सेल्फीच्या मोहात पडून आजवर अनेक पर्यटकांनी आपले जीव गमावले आहेत . "Batmi Lekhan In Marathi" सेल्फीचा मोह टाळावा आणि सुरक्षितपणे पर्यटनाचा आनंद घ्यावा , असे आवाहन पोलीस आयुक्तांनी पर्यटनप्रेमींना केले आहे .

  ४ ) दिलेल्या सूचक शब्दांवरून बातमी 

 इन्स्पायर्ड प्रदर्शन - प्रमुख पाहुणे - पाणी व्यवस्थापन - पारितोषिक . 


पाणी व्यवस्थापन : एक जीवनावश्यक बाब
 
           ( आमच्या वार्ताहराकडून ) 

जळगाव , दि . ३१ फेब्रू . : शासनप्रणित १३ वे राज्यस्तरीय ' इन्स्पायर्ड अवार्ड ' प्रदर्शन जळगाव येथे संपन्न झाले . २७ ते २ ९ फेब्रुवारी यादरम्यान जळगाव येथील ' शंकरराव माध्यमिक प्रशाले ' त हे प्रदर्शन भरवण्यात आले होते . महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्हयांतून निवडलेले प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले होते . ' पाणी व्यवस्थापन ' या विषयावर विदयार्थ्यांनी येथे अभिनव प्रकल्प सादर केले होते . विद्यार्थ्यांच्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनामार्फत हे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येते . 

भूजलतज्ज्ञ डॉ . राजेन्द्र सिंग यांना या प्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते . मुलांच्या कल्पकतेचे त्यांनी कौतुक केले . मार्गदर्शन करताना ते म्हणाले , " पाणी व्यवस्थापनाची जाण येणे हे खरे जनजागरण आहे ."
 
बीड जिल्हयातील ' लोकमान्य विदया मंदिर'च्या विद्यार्थ्यांच्या ' रिमोटच्या साहाय्याने शेतीच्या पाण्याचे व्यवस्थापन या प्रकल्पाला प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले . सातारा जिल्ह्यातील सुमारे लाखभर लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली . ' इन्स्पायर्ड अवार्ड ' या प्रदर्शनातील प्रकल्प पाणी व्यवस्थापनाला उपयुक्त ठरू शकतील , असे मत मान्यवरांनी व्यक्त केले . 

                      स्वाध्याय

( १ ) पुढे दिलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची बातमी तयार करा :

( अ ) मार्च महिन्यात ' लेकी शिकवा ' दिन सखी साजरा 
( आ ) जून  महिन्यात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कार्यक्रमास महाराष्ट्रभर उत्तम प्रतिसाद !

( २ ) पुढे दिलेल्या प्रत्येक घटनेवर बातमी तयार करा :

( अ ) भुसावळच्या शाळेत शिक्षक म्हणून रोबोची नेमणका !
( आ ) वाई तालुक्यातील इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी रसिका धुमाळ हिचा काव्यसंग्रह प्रसिद्ध !

( ३ ) पुढे दिलेल्या सूचक शब्यांवरून बातमी तयार करा :

( अ ) उपक्रम - तंत्रज्ञान मैत्री - विदयार्थी - पालकांना मार्गदर्शन .
( आ ) अभयारण्य - पशुसंवर्धन - निरीक्षण - विदयार्थी - प्राण्यांबद्दल आदर .





तुम्हाला जर बातमी लेखन मराठी आवडले असेल तर शेअर करा.Batmi Lekhan In Marathi for class 10th




Post a Comment

0 Comments