पत्रलेखनाचे प्रकार | HOW TO Write Marathi Patra Lekhan new format | 10th class Student 2021 |

How to write Marathi letter writing 10 std
E-LETTER


How to write Marathi letter writing 10 std
Marathi Patra Lekhan

[   पत्रलेखन  ]

  लक्षात ठेवा : -

*कृतिपत्रिकेतील प्रश्न ५ ( अ ) ( 1 ) यात एक प्रकार आहे - पत्रलेखन , 

* या प्रकरणात ' पत्रलेखन ' या लेखनप्रकाराचे मार्गदर्शन दिले आहे .

* कृतिपत्रिकेत पत्रलेखनासाठी - निवेदन , जाहिरात बातमी सूचनाफलकावरील सूचना निमंत्रण यांसारख्या एकाची माहिती चौकटीत देऊन त्याआधारे पत्रलेखन करण्यास सांगितले जाईल .

* या इयत्तेत तीन प्रकारचे पत्रलेखन अभ्यासायचे आहे : ( १ ) मागणीपत्र 
( २ ) विनंतीपत्र ( ३ ) कौटुंबिक या - गामणीपत्र , विनंतीपत्र व कौटुंबिक पा यांपैकी कोणतीही दोन पत्रे विचारली जातील .
या दोन विषयांपैकी कोणत्याही एका विषयावर पत्र लिहिण्यास सांगितले जाईल . 

___________________________________________________________________________________

* प्रस्तावना

इंटरनेट , संगणक , मोबाइल फोन यांमुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार मंदावला आहे , हे खरे असले , तर | त्यांच्यामुळे पत्रव्यवहार चालूसुद्धा राहिला आहे . फक्त पत्रलेखनाची पद्धत बदललेली आहे . काही वेळा माणसे कामात असतात . संपर्क होऊ शकत नाही . अशा वेळी ई - मेलद्वारे पत्रे पाठवली जातात . किंबहुना , आता तंत्रज्ञानाचा प्रभाव व सुलभता यांमुळे ई - मेलचा प्रसार खूपच वाढला आहे . ई - मेलवरील पत्रलेखनाची एक विशिष्ट पद्धत आहे . पारंपरिक पत्रलेखनाहून थोडी वेगळी आहे . ई - मेलवरील पत्रलेखनाचे संकेतही थोडे वेगळे आहेत . यापुढे तंत्रज्ञानाच्या आधारेच पत्रव्यवहार प्राधान्याने होणार असल्याने , त्या पद्धतीचा परिचय होणे आवश्यक आहे . म्हणून पत्राचे प्रारूप ई - मेल पद्धतीनुसार स्वीकारले आहे .

Marathi Patra Lekhan new  format


[पत्रलेखनाचे प्रकार]


पत्रलेखनाचे स्थूलमानाने दोन प्रकार : 

( १ ) औपचारिक पत्रे ( २ ) अनौपचारिक पत्रे .

[ ( १ ) औपचारिक पत्रे ]

    दैनंदिन जीवनात आपल्या काही अडचणी सोडवण्यासाठी किंवा काही सुविधा मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयांत किंवा खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांत जावे लागते . आपली कामे व्हावीत म्हणून या कार्यालयांत आपल्याला पत्रे सादर करावी लागतात . 'Marathi Patra Lekhan' या पत्रांना औपचारिक पत्रे म्हणतात .


 कधी कधी आपल्याला त्रयस्थ व्यक्तींनाही काही कामानिमित्त पत्र लिहावे लागते . हेही ' औपचारिक पत्र च होय . 
आपली कामे कोणालाही त्रास न होता , बिनचूक व त्वरेने होण्यासाठी अशी पत्रे विशिष्ट पद्धतीने लिहिली जातात . त्यांची एक ठरलेली रूपरेषा असते . त्यात शिष्टाचार व उपचार पाळावे लागतात . या पत्रांत पाल्हाळ, फापटपसारा नसतो . कामाचे स्वरूप थोडक्यात व अत्यंत नेमकेपणाने स्पष्ट केलेले असते . मित्रांना किंवा नातेवाईकांना लिहिलेल्या पत्रात जशी सलगी व्यक्त होते , तशी सलगी औपचारिक पत्रात नसते . ही औपचारिक पत्राची वैशिष्ट्ये आहेत .

औपचारिक पत्रांचे स्थूलमानाने पुढीलप्रमाणे काही उपप्रकार मानले जातात : 

( १ ) निमंत्रणपत्र ( २ ) आभारपत्र 
( ३ ) अभिनंदन पत्र किंवा गौरवपत्र
( ४ ) चौकशीपत्र ( ५ ) क्षमापत्र
( ६ ) मागणीपत्र ( ७ ) विनंतीपत्र
( ८ ) तक्रारपत्र

इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमात औपचारिक पत्रांपैकी मागणीपत्र व विनंतीपत्र या दोन प्रकारच्या पत्रांचा समावेश केलेला आहे .

औपचारिक ई - पत्र लिहिताना बाळगायची दक्षता : 

( १ ) पत्राची सुरुवात करताना वरच्या डाव्या कोपऱ्यात दिनांक लिहावा . 
( २ ) प्रेषक व प्रति यांची नावे दिलेली असल्यास तीच लिहावीत . अन्यथा अ.ब.क. किंवा तत्सम अक्षरे लिहावीत . सही करू नये, 
( ३ ) प्रेषक व प्रति यांचे पत्ते प्रश्नपत्रिकेत दिलेले असतील , तर तेच लिहावेत ; पत्ते दिलेले नसतील , तर ते काल्पनिक लिहावेत .
( ४ ) औपचारिक पत्रात मायना ' लिहिल्यावर त्यानंतरच्या ओळीत विषय लिहावा . 
( ५ ) त्यानंतरच्या ओळीत आवश्यकतेप्रमाणे ' महोदय ' महोदया ' हे संबोधन लिहावे आणि स्वल्पविराम दयावा . ( ' मा , महोदय महोदया ' किंवा ' माननीय महोदय / महोदया ' असे लिहू नये , फक्त ' महोदय ' / ' महोदया ' एवढेच लिहावे . ) 
( ६ ) त्यानंतरच्या ओळीत मजकुराला सुरुवात करावी . 
( ७ ) ' आपला विश्वासू ' , " आपला कृपाभिलाषी ' या शब्दांनी शेवट करून त्याखाली आवश्यकतेप्रमाणे अ.ब.क. किंवा नाव आणि पत्ता व ई - मेल आय डी.सुद्धा लिहावा .
( ८ ) प्रत्येक परिच्छेदाची व प्रत्येक तपशिलाची सुरुवात डावीकडून करावी .

 [ ( २ ) अनौपचारिक पत्रे ]

 आई , वडील , भाऊ , बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत . त्यांपैकीच कौटुंबिक पत्रे हा एक प्रकार आहे . हल्ली संदेशवहनातील प्रचंड क्रांतीमुळे अनौपचारिक पत्रे लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे . त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली फारच कमी प्रमाणात होत आहे .

 इयत्ता १० वीच्या अभ्यासक्रमात कौटुंबिक स्वरूपाच्या पत्रांचा समावेश केलेला आहे .

अनौपचारिक पत्र लिहिताना बाळगायची दक्षता : 

( १ ) पत्राच्या वरच्या बाजूस डाव्या कोपऱ्यात तारीख लिहावी . 
( २ ) पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही . 
( ३ ) पत्र कोणत्या व्यक्तीला लिहीत आहोत , हे लक्षात घेऊन मायना लिहावा . 
( ४ ) आईवडिलांना ' शिरसाष्टांग नमस्कार ' किंवा ' शि . सा . नमस्कार ' आणि कुटुंबातील इतरांना सा . न . / साष्टांग नमस्कार / नमस्कार / आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत .
( ५ ) पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत . 
( ६ ) पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी . 
( ७ ) पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा . समारोपाचा मायना योग्य असावा . 
( ८ ) प्रत्येक परिच्छेदाची व प्रत्येक तपशिलाची सुरुवात डावीकडून करावी .
___________________________________________________________________________________

             पूर्वी आईवडिलांना पत्र लिहिताना मायन्यात ' तीर्थरूप ' लिहिण्याची पद्धत रूढ होती . तसेच , वडीलपाय नातलगांना ' तीर्थस्वरूप ' आणि आपल्यापेक्षा लहान असलेल्यांना ' चिरंजीव ' लिहिण्याची पद्धत होती , अजूनही काहीजण तसे लिहितातही . मात्र अलीकडे ' तीर्थरुप ' , ' तीर्थस्वरूप ' व ' चिरंजीव ' या शब्दांऐवजी ' प्रिय ' हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो . इतकेच नव्हे , तर अन्य नातेवाइकांसाठी ' प्रिय दादा ' , ' प्रिय ताई ' , ' प्रिय आजोबा ' ' प्रिय आजी ' , ' प्रिय काका / काकी ' , ' प्रिय मामा / मामी ' वगैरे शब्द मायन्यात योजले जातात . ' प्रिय ' या शब्दातून अधिक जवळीक साधलेली दिसून येते . तसेच , अभिवादनदर्शक मजकुरात आईवडिलांना ' शिरसाष्टांग नमस्कार ' , ' शि , सा . नमस्कार ' व अन्य ज्येष्ठ नातेवाइकांना ' साष्टांग नमस्कार ' किंवा ' स्नेहपूर्वक नमस्कार ' हे शब्द लिहिले जातात ; तर लहानांसाठी ' अनेक आशीर्वाद ' असेही शब्द लिहिले जातात . 
__________________________________________________________________________________

       पत्राची गुणविभागणी 

ई - मेल प्रारूप ( मायना , दिनांक , विषय ) -२ गुण 

विषयानुरूप मजकूर व कृतीतील सर्व मुद्द्यांचा मजकुरात योग्य विचार -३ गुण

खालचा मायना ( शेवट व पत्रलेखकाचा पत्ता ) - १ गुण 

नोंद : पत्रलेखनाच्या कृतीत दोन औपचारिक किंवा एक औपचारिक व एक अनौपचारिक पत्र असे विचारले जाणार आहे . 
___________________________________________________________________________________

       औपचारिक ई - पत्राचा आराखडा

___________________________________________________________________________________


__________दिनांक

प्रति ;

माननीय ._________________ _____ ज्याला उद्देशून पत्र                                  
               _________________ _____लिहिले आहे .त्याचे
               _________________ _____ नाव / हुददा .पत्ता
                                  
                                                   
           
विषय : ______________________________________________________________

महोदय ,

___________________________________________

___________________________पत्राचा मजकूर

__________________________________________
 

___________________________पत्राचा शेवट

___________________________.पत्रलेखकाचे पूर्ण नाव 


___________________________पत्रलेखकाचा पत्ता

________________________________________

[ई -मेल]_________________________________


( टीप : पाकीट काढून पत्ता लिहिण्याची आवश्यकता नाही ; कारण ई - मेलसाठी पाकीट नसते . 



   अनौपचारिक ई - पत्राचा आराखडा 


___________. [दिनांक]


________________
__________________________} [मायना]


__________________}पत्राचा मजकूर

__________________}पत्राचा मजकूर

__________________}


__________________}


___________________.पत्राचा शेवट 

___________________.स्वत : चे पूर्ण नाव


__________________.}स्वतःचा पत्ता 

_________________.}

_________________}


[ई - मेल] ____________________________________



( टीप : पाकीट काढून पत्ता लिहिण्याची आवश्यकता नाही ; कारण ई - मेलसाठी पाकीट नसते . )



औपचारिक व अनौपचारिक पत्रांचे नमुने

[नमुना कृती]

 अभिनंदन पत्र ( अनौपचारिक पत्र ) :

 दिनांक : १ ९ जुलै २०२१
 चि . विभोर ,
 अनेकोत्तम आशीर्वाद . 

 विभोर, मला कालच तुझ्या बाबांचा मेल आला होता . तू शाळेच्या वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी झाली होतीस . शाळेच्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण केलेस . तू आणि तुझ्या वर्गमित्र - मैत्रिणी यांनी वृक्षसंवर्धनाची जबाबदारीही घेतली आहे . या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल तुझे मनःपूर्वक अभिनंदन!!! 

पर्यावरण संवर्धनासंबंधीची तुझी जाणीव प्रगल्भ आहे . त्यामुळेच तू ही जबाबदारी पेलण्याचे ठरवले असणार ; याबद्दल मला खात्री आहे . तू स्वतःबरोबरच तुझ्या मित्र - मैत्रिणींचीही मानसिक तयारी केलीस , ही बाब मला जास्त भावली . तुम्हा सर्वांचेच अभिनंदन ! 

तुमचा अभ्यास , खेळ , फिरायला जाणे जितके महत्त्वाचे तितकेच पर्यावरण संवर्धनही ! ही गोष्ट तुम्हां सर्वामुळे इतरांसाठी आदर्श ठरू शकते . तुमचा हा उपक्रम वृद्धिंगत होवो ! सातत्याने चालू राहो अशा शुभेच्छा व्यक्त करतो . पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन ! 

तुझा मामा , 
क.ख.ग. 
अप्पा बळवंत चौक , 
पुणे -४११ ०३० . 
ई - मेल : sachin@xxxx.com


किंवा


मागणीपत्र ( औपचारिक पत्र ) : 

२५ जून २०२१

प्रति,
मा , वन - अधिकारी , 
ताडोबा राष्ट्रीय उदयान , चंद्रपूर , 
 ४०२ ०६८

विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी

महोदय , 

पुढील महिन्यात शासनातर्फे साजरा करण्यात वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे . या महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत , असे कळले . आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत , त्यासाठी हे पत्र लिहीत आहे . 
     आमच्या शाळेला सुमारे दोनशे रोपे हवी आहेत . आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची रोपे आम्ही निवडू . है पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे . तसदीबद्दल क्षमस्व . 

आपली कृपाभिलाषी , 

रसिका धुमाळ. 

विद्यार्थी प्रतिनिधी , लोकमान्य विद्यालय , 
माहीम ( पू ) , मुंबई -४०० ०१६ .
ई - मेल : rasika@xxxx.com 

[ नोंद : मागणीपत्रात ई -मेलचा आराखडा नमुना म्हणून दाखवलेला आहे .]


नमुना कृती : २

 प्रश्न पुढील घटनेमागील विचार समजून घ्या आणि दिलेल्या सूचनेनुसार पत्रलेखन करा : 

ओमकारच्या बहिणीने स्वतःच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका सर्वांना व्हॉट्सअॅपवर पाठवली . लग्नपत्रिका न छापल्यामुळे वाचलेले पैसे तिने ' बालमोहन विद्यालय , जळगाव ' या शाळेला वृक्षारोपणासाठी देणगी म्हणून दिले . ओमकार ने अभिमानाने ही हकिगत आपल्या मैत्रिणीला व्हॉट्सअॅपवर कळवली . सोबत बहिणीच्या लग्नाची निमंत्रण पत्रिकाही पाठवली . 
________________________________

तुमच्या घरातील लग्नकार्यासाठी तुमच्या जवळच्याच एका सॉफ्टवेअर कंपनीला इलेक्ट्रॉनिक लग्नपत्रिकेच्या आज्ञावलीची ( Programme ची ) मागणी करणारे पत्र लिहा .

__________________________________

किंवा 
__________________________________

विदयार्थिनी या नात्याने तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना , ओमकार ने पाठवलेले पत्र काचफलकात प्रदर्शित करण्याची विनंती करणारे पत्र लिहा . 
__________________________________

मागणीपत्र ( औपचारिक पत्र ) :

दिनांक : १०-१-२०२१
प्रति 
माननीय व्यवस्थापक , 
आयडियल इन्फोटेक , 
सातारा -४४२००१ .

विषय :    लग्नपत्रिकेची आज्ञावली तयार करून देणे.

महोदय , 

आम्हांला एक लम्नपत्रिका व्हॉट्सअॅप / ई - मेल या स्वरूपात सर्व निमंत्रितांना पाठवायची आहे . या लग्नपत्रिकेची एक आज्ञावली आम्हांला आपल्याकडून तयार करून हवी आहे . तीत पुढील सुविधा हव्या आहेत . .

( १ ) लग्नपत्रिका युनिकोडमध्ये तयार करावी 
( २ ) निमंत्रितांची यादी जोडण्याची सुविधा असावी . 
( ३ ) लग्नपत्रिका व यादी यांच्यात एक दुवा  ( Link ) असावा . या दुव्याच्या आधारे लग्नपत्रिकेवर निमंत्रिताचे नाव देता येईल .    
( ४ ) लग्नपत्रिकेत पत्रोत्तरासाठी आणखी एक दुवा हवा . या दुव्याच्या द्वारे निमंत्रित व्यक्ती त्यांच्याकडून किती व्यक्ती येणार याची नोंद करतील . 

कृपया आपले शुल्क कळवावे , ही विनंती .

आपला , 
अ . ब . क . 
१९ , महात्मा स्मृती , 
सातारा - ४७२००५ .
__________________________________

किंवा 
__________________________________

विनंतीपत्र ( औपचारिक पत्र ) : 

दिनांक : १५-१-२०२१

प्रति , 

मा . मुख्याध्यापक , 
मॉडन विद्यामंदिर , 
महात्मा गांधी मार्ग , 
वाई -४४६ ००१ . 

विषय : सध्याच्या काळात आवश्यक असा विचार देणारे एक पत्र शाळेच्या काचफलकात लावणे . 

महोदय , 

माझ्या मैत्रिणीने व्हॉट्सअॅपवर मला पाठवलेल्या पत्राची प्रत मी सोबत जोडत आहे . त्या पत्रातील विचार अनेकांपर्यंत पोहोचावा असे मला वाटते . म्हणून हे पत्र शाळेच्या काचफलकात लावण्यास परवानगी दयावी , ही विनंती . माझ्या मैत्रिणीच्या बहिणीच्या लग्नाचे हे निमंत्रण आहे . ते तिने मला व्हॉट्सअॅपवर पाठवले आहे . या पद्धतीने लग्नाचे निमंत्रण व्हॉट्सअॅपवर दिल्यास कागद वाचेल , त्यामुळे झाडे वाचतील , पर्यावरणाची हानी टळेल  यात आणखीही फायदे आहेत . सध्याचे मोबाइल तंत्रज्ञान सर्व माणसांना अवगत आहे . कोणीही कोणत्याही प्रसंगी हे तंत्रज्ञान वापरू शकतो . त्यामुळे निमंत्रण क्षणार्धात व विनामूल्य पोहोचते . आपला वेळ , श्रम व पैसा यांची बचत होते . 
    असा हा बहुगुणी विचार खूप लोकांपर्यंत पोहोचावा , म्हणून हे पत्र शाळेच्या काचफलकात लावण्याची कृपया परवानगी दयावी , अशी पुन्हा एकदा नम्र विनंती करते .

आपली आज्ञाधारक , 
अ . ब . क . 
विद्यार्थिनी 

३० , सहकार वसाहत , 
महात्मा गांधी मार्ग , 
वर्धा -४४२००१ . 
ई - मेल : vibhor@xxxxx.com
__________________________________


तुम्हाला जर पत्रलेखन आवडले असेल तर शेअर करा.


Post a Comment

0 Comments