पाऊस पडला नाही तर ...
{ MARATHI ESSAY ON MARATHI ESSAY ON PAUSA PADALA NAHI TAR }
पाव मे महिना संपला आणि जून महिना सुरू झाला . सूर्याच्या तापाने सारी सृष्टी तापली होती . धरतीला भेगा पडल्या होत्या . नदया , नाले कोरडे पडले होते . विहिरी , सरोवरे , तळी , प्राणी , पशू , पक्षी सारी सृष्टी पाण्याची वाट पाहत होती . अंगाची लाहीलाही होत होती . सर्वांच्या बेचैन सुरातून एकच बोल येत होता . ' यंदा पाऊस लवकर येईल तर खूपच बरे होईल ! ' पण ते एकून माझ्या मनात नकारार्थी विचार आला , की जर पाऊस पडलाच नाही तर ... ! ( PAUSA PADALA NAHI TAR ) पृथ्वीवर सगळे उलटे - पालटे होऊन जाईल . बिरबलाची गोष्ट खरी ठरेल , की सत्तावीस नक्षत्रांतील नऊ नक्षत्रे कमी झाली तर बाकी शून्य उरेल कारण ती नऊ नक्षत्रे पावसाची असतात . हा पाऊस हजेरी लावताना कधी लवकर येतो तर कधी वाट पाहायला लावतो . म्हणजेच त्याचे आगमन निश्चित नसल्यामुळे पावसाला लोक लहरी पाऊस म्हणतात . तो कधीही पडतो . मनाप्रमाणे त्याचे राज्य चालते . कधी जास्त पडला तर माणसाला बुडवतो आणि पडलाच पाऊस सदैव तरुणच असतो . नाही तर माणसाच्या तोंडचे पाणी पळवतो . समुद्राच्या पाण्याचे ढग , ढगांतून पाऊस हे निसर्गाचे चक्र आहे .
असा हा तो पडला नाही तर ... मातीचा सुगंध दरवळणार नाही . पहिल्या पावसात नाचण्याचा , भिजण्याचा , कागदाच्या होड्या सोडण्याचा जो आनंद मिळतो तो मिळणार नाही . आपला पिसारा फुलवून नाचणारा मोर दिसणार नाही . बेडकांचा डराव डराव आवाज ऐकता येणार नाही . सुंदर , रंगीत , सुगंधी फुले दरवळणार नाहीत . या पावसाचे पाणी तहानलेल्या जीवांचे अमृत असते . एक वेळ माणसाला जेवण मिळाले नाही तर चालेल , पण पाणी मिळाले नाही तर चालणार नाही . तहानेने प्राणी व पक्षी व्याकूळ होतील . धान्य नाही , अन्न नाही , गाईला चारा नाही म्हणून दूध नाही . मग भुकेलेले प्राणी खाणार काय ? म्हणून पाऊस पडलाच पाहिजे .
पावसाअभावी तळी , नया , विहिरी आटून जातील , मग प्यायला पाणी मिळणार कसे ? या प्रश्नांच्या भोवऱ्यात मन भिरभिरते म्हणून पाऊस पडलाच पाहिजे . शेतकऱ्यांचे जीवन पावसावर अवलंबून असते . पावसाअभावी त्यांच्या शेतात गहू , तांदूळ , ज्वारी , बाजरी , मका ही पिके पिकणार कशी ? जाई , जुई , चंपा , चमेली , गुलाब , मोगरा , शेवंती , जास्वंद ही फुले फुलणार कशी ? चवळी , मेथी , भेंडी , गवार , कोबी या भाज्या मिळणार कशा ? आंबा , चिकू , केळी , पेरू , संत्री , मोसंबी ही फळे पिकणार कशी ? ऊस नसेल तर आपल्याला साखर मिळणार नाही . कापूस न पिकल्यामुळे वस्त्रांची गरज भागणार कशी ? घरासाठी लाकडाची गरज असते . भांडी , बांधकाम , खेळणी , दारे , खिडक्या , टेबल बनवण्यासाठी लाकूड मिळणार नाही . थोडक्यात काय अन्न , वस्त्र , निवारा या मूलभूत गरजा पूर्ण होणार नाहीत .
पावसाअभावी मानवी जीवनाची सर्व व्यवस्था कोसळून जाईल . भोजनाच्या साफसफाईच्या , पिण्याच्या पाण्याची टंचाई होईल . सर्वत्र दुष्काळ पसरेल . अस्वस्थ अवस्थेत मानव भुकेपोटी सैरावैरा धावेल व चोर , दरोडेखोर बनून आपल्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल . तो दुःखाच्या सागरात बुडेल आणि बघता बघता अन्न , पाण्यावाचून मृत्यूला कवटाळेल आणि ही धरती वाळवंटाप्रमाणे प्रमाणे निर्मनुष्य होईल . म्हणून पाऊस पडलाच पाहिजे . अर्थात मानव विचारवंत प्राणी आहे . तो प्रगतिपथावर धावत आहे . पावसाचा भरवसा नाही हे सत्य त्याने ओळखले आहे . हे निसर्गाचे देणे आहे याची जाणीव ठेवून त्याने आपले पाणी व्यवस्थित जपून वापरावे . त्या पाण्याचे जतन करणारी धरणे बांधावी . सावधतेने पाणी वापरावे . ते वाया जाणार नाही तसेच त्याचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी . या निसर्ग शक्तीला शरण जावे . खूप खूप झाडांची लागवड करावी . जंगलांचे रक्षण करावे . ' सिमेंटचे जंगल निर्माण करा , पण निसर्गाला इजा करू नका , ' ' झाडे लावा , झाडे जगवा ' या संदेशाप्रमाणे चला . पावसावर आपले आयुष्य अवलंबून आहे . झाडांना आपण जपले तर पाऊस कमी पडणार नाही . विज्ञानाने कृत्रिम पावसाची निर्मिती करा . पण नैसर्गिक पाऊस पडायलाच हवा हे मात्र पाहा .
मग इतर वस्तू तरी कशा तयार होणार ? आपली कामे वस्तूंअभावी कशी होणार ? म्हणून पाऊस पडलाच पाहिजे .
तुम्हाला निबंध कसा वाटला, आवडला असेल तर शेअर करा लाईक करा.
0 Comments