कथा लेखन कसे करावे ? HOW TO WRITE KATHA LEKHAN IN MARATHI WITH MORAL | EXAMPLES 2021

कथालेखन ( गुण ५ )



लक्षात ठेवा : 

कृतिपत्रिकेत प्रश्न ५ ( आ ) मधील तीन लेखनप्रकारांपैकी अन्य एक प्रकार आहे- कथालेखन . 

प्रस्तुत प्रकरणात ' कथालेखन ' या लेखनप्रकारासंबंधात मार्गदर्शन दिले आहे .  

पुढीलपैकी कोणत्याही एका प्रकाराने कथालेखन करण्यास सांगितले जाईल : 
( १ ) कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहायला सांगितला जाईल , 
( २ ) कथेचा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहायला सांगितला जाईल . 
( ३ ) महत्त्वाचे काही शब्द देऊन कथा लिहायला सांगितले जाईल . 
( ४ ) कथाबीजावरून कथा लिहायला सांगितले जाईल . 
( ५ ) शीर्षकावरून कथा लिहायला सांगितले जाईल , 
( ६ ) गुद्द्यांवरून कथा लिहायला सांगितले जाईल , 
( ७ ) वरील प्रकारांपेक्षा वेगळी , सर्जनशील पद्धतीने कृती दिली जाऊ शकते . - 

कृतिपत्रिकेत दिलेली अपूर्ण कथा लिहिण्याची आवश्यकता नाही . त्यात परीक्षेचा महत्त्वाचा कालावधी वाया घालवू नये . 
तुम्हांला सुचलेला नवीन भाग फक्त लिहा . तो १०० ते १२० शब्दांत असावा . 

• प्रस्तावना : 

कथा म्हणजे ' गोष्ट ' . गोष्ट सांगण्याची व ऐकण्याची आवड माणसाला पूर्वीपासून आहे . माणूस हा सामाजिक प्राणी
आहे . त्यामुळे आपल्या कल्पना , भावना , आपले विचार , अनुभव इतरांना सांगावेत आणि आपण इतरांचे ऐकावेत अशी त्याला तीव्र इच्छा असते . त्यातूनच ' कथा ' या लेखनप्रकाराचा जन्म झाला . या कथालेखनाचा परिचय व्हावा , नव्या कल्पना , नवनिर्मिती , स्वभाषेत प्रकटीकरण ही कौशल्ये विकसित व्हावीत , या हेतूने या लेखनप्रकाराचा समावेश आपल्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे . 

HOW TO WRITE KATHA LEKHAN IN MARATHI


• कथालेखन करताना लक्षात घ्यायच्या गोष्टी 

( १ ) कथाबीज आणि कथेचे शीर्षक निश्चित करावे . 
( २ ) निवडलेल्या कथाबीजानुसार कथेची सुरुवात आकर्षक करावी . 
( ३ ) कथेला प्रारंभ , मध्य व शेवट असावा . ( ४ ) कथेच्या आशयानुसार कथेत घटना व स्थळांचा उल्लेख करावा . 
( ५ ) कथेसाठी सुयोग्य पात्रांची निवड करावी. 
( ६ ) कथेतील पात्रांचे संवाद आशयाला अनुसरून असावेत . उदा . , ग्रामीण कथेमध्ये बोलीभाषेतील संवाद देता              येतील . 
( ७ ) कथेच्या आशयाला अनुसरून भाषालेखन करावे . 
( ८ ) कथालेखन भूतकाळात करावे . 
( ९ ) कथेतील बोध / संदेश / मूल्ये यांच्या आधारे कथेचा समर्पक शेवट करावा . 

कधाबीजावान कपालेखन :

• कधाबीज म्हणजे काय ?

    कथेचा आशय किंवा विषयगाभा म्हणजे कथाबीच होय . आपल्या मनात कथाबीज तयार झाल्यावर आपण त्याचे शीर्षक निश्चित करतो . त्यामुळे कधेचा प्रकार निश्चित होतो . प्रकार निश्चित झाल्यावर कथाबीज फुलवणे सहज शक्य होते. 
 
• कथबीजानुसार कथांचे विविध प्रकार : 

( १ ) शौर्य कथा ( २ ) ऐतिहासिक कथा 
( ३ ) बोध कथा ( ४ ) विनोदी कथा ( ५ ) विज्ञान कथा ( ६ ) रूपक कथा 
( ७ ) पौराणिक कथा ( ८ ) रूपक कथा इत्यादी . 
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

HOW TO WRITE KATHA LEKHAN IN MARATHI



( १ ) कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे किंवा उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे .

( १ ) पुढील कथेचा उत्तरार्ध लिहा आणि तुम्ही पूर्ण केलेल्या कथेला योग्य शीर्षक दया. 

आम्हांला उन्हाळी सुट्टी लागणार , म्हणून मी व माझी धाकटी बहीण सानिका खूप खूश होतो . त्याला कारणही तसेच होते . बाबांनी सुट्टीत महाबळेश्वरला नेण्याचे कबूल केले होते . १० मे ते १५ मे अशी सहलीची तारीखही नक्की ठरली होती . मी सहलीच्या आनंदात रंगून गेलो होतो . “ वैभवदादा , कॅमेरा बरोबर घ्यायचा का ? " सानिकाच्या या प्रश्नाने मी भानावर आलो . " अग , हो घेऊ या . " म्हणून मी पुन्हा तयारीला लागलो . बरोबर नेण्याच्या वस्तू एकत्रित करणे , महाबळेश्वरची भौगोलिक माहिती आंतरजालावरून मिळवणे. यांसारख्या सहलीला आवश्यक बाबींत मी दंग झालो होतो . आमचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता . बघता बघता १० मे ची पहाट उजाडली . आई , बाबा , मी , सानिका सर्व तयार झालो . आवराआवर झाली आणि आम्ही सगळे निघणार एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कथेचा उत्तरार्ध : 

सुख आले माझ्या दारी 
              
....   ....  ...    आम्ही जरा चक्रावलोच , बाबांच्या ऑफिसमधले शिपाईकाका आले होते . 
त्यांच्या हातात पत्राचे एक पाकीट होते आणि दुसऱ्या हातात चारपाच फायली असलेली एक पिशवी होती . आमच्या काळजात थोडी कालवाकालव झाली , बाबांचा चेहरा काळजीने पूर्ण व्यापला होता . शिपाईकाकांनी काही सांगायच्या आतच बाबांनी विचारले , " काय हो , काय झालं ? " 

" तुम्हांला आजच दिल्लीला जावे लागणार ! तुम्हांला मेलवर सगळं कळवलं आहेच . तुम्हाला ऑफिसात यावं लागू नये म्हणून मला फायली घेऊन सकाळीच यायला लावलं . 

" हे ऐकताच आई कावरीबावरी झाली . सानिका आणि मी , आम्ही दोघे रडायचे तेवढे बाकी राहिलो होतो . किती स्वप्ने पाहिली होती ! काय काय ठरवले होते . वेण्णा तलावामध्ये होडीतून विहार करायचाच , हे आम्ही ठरवून टाकले होते . पॅडल मारायची होडी घ्यायची , या कल्पनेला मी कडाडून विरोध केला होता व वल्हवण्याचीच होडी घ्यायची , हे मी आईबाबांकडून कबूल करून घेतले होते . आणि आता हे असे ! 

बाबांनी मग शांतपणे शिपाईकाकांना बसवले. आई त्यांच्यासाठी चहा करायला गेली . बाबांनी पत्राचे पाकीट उघडले आणि वाचू लागले . मी आणि सानिका त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होतो . त्यांच्या चेहऱ्यावरील बदलते भाव पाहून आम्ही गोंधळून गेलो . त्यांना आनंद झालेला दिसत होता . चेहऱ्यावर हसू उमलत होते . आई चहा घेऊन आली . बाबा आईला म्हणाले , " जा , आधी पेढे घेऊन ये . 

" बाबांना फार मोठे प्रमोशन मिळाले होते . पदावरील कामासंबंधातील एक प्रकल्प दिल्लीला चालू होता . त्या प्रकल्पासाठीच बाबांना दिल्लीला जाणे भाग होते . एका आठवड्यात प्रकल्प पूर्ण करून बाबा परत येणार होते . आता मंजूर झालेली सुट्टी ते दिल्लीहून आल्यानंतर घेऊ शकणार होते. आम्हा दोघांनाही जवळ येऊन ते म्हणाले, " पुढच्या रविवारी आपण नक्कीच महाबळेश्वरला !"

आम्हा सगळ्यांचे चेहरे आनंदाने आणि बाबांविषयी च्या अभिमानाने फुलून आले होते! 'HOW TO WRITE KATHA LEKHAN IN MARATHI'


( 2 ) कथेचा उत्तरार्ध : 

जत्रा आहे खूप लांब . तलावाच्या पलीकडे , आखरावर , महटलं , जवळची वाट म्हणून पार्णदीनेच जावे गुपचूप , मग कोणी टोकणार नाही की कोणी विचारणार पण नाही . आपलं काम बरं नि आपण बरं . बेहड्याच्या खाली एक सापू बसला होता , तसा वेळ फार झाला होता . पण मनात म्हणाले , ' साधू बसला आहे . ठेवावं त्याच्या पायावर डोकं नि मागावी थोडीशी राख . अद्यापि माझ्या पाकटया सुनेला मूल नाही तीन पावसाळे लोटले तरी । ' साधू कसा म्हणतो , " ये म्हातारे आई , पाया पडायच्या आधी तो गळ्यातील दागिना काढून ठेव , मला दागिन्यांचा विटाळ होतोय . काढ तो नि या सागूनच्या पानात गुंडाळून ठेव . " एवढा मोठा बुवा आणि त्याचं ऐकायचं नाही काय ? म्हणून मी घरली नि गळ्यातून सोन्याची पोत काढून सागूनच्या पानात पुडी बांधली . बुवाच्या पाया पडले . बुवाने राख दिली . ती लुगड्याच्या पदराला बांधली . दुसऱ्या टोकाला पोतीची पुडी बांधली . आखराजवळ आले . बाप रे , पुष्कळ लोक आले होते . यंदा तर यात्रा छानच भरली होती . अगदी वेगळीच , एवढ्या लोकांमध्ये जायचं आणि सोन्याची पोत गळ्यात घालायची नाही ? पदराची गाठ उघडली आणि पुडी सोडली . आणि माझी घाबरगुंडीच उडाली ! पुडीत पोत नव्हती . चिंचोके होते , चिंचोके ! 
( आधारित ) 
                                              ---------------------------------------------

 कथेचा पूर्वार्ध : 

भूलभुलैय्या 

आता , तुम्हीच सांगा , गावचीच जत्रा , वर्षातून एकदा येणारी . मग तिला जायचं कोणी सोडेल का ? मी नाही बोलणार , तुम्ही सांगा . मी बोलले तर विनाकारण माझं तोंड दिसतं . पण म्हणून कोणी यात्रा पाहायच्या वेळी घरात कोंडून राहील का खुराड्यातील कोंबडीच्या पिलांसारखा ? 

मी घाईघाईने कामे आटोपली . साजसिंगार केला . आपल्या माहेरची सोन्याची पोत गळ्यात घातली . पण कोणीतरी बोललीच , " या भागीला कशाला हवा साजसिंगार ? म्हातारी ती म्हातारी आणि तोरा कसा ? तर पहिल्यांदा सासरी आलेल्या मुलीसारखा . आता हिरव्या बांगड्या ल्याली की झालं ! "

मी कशाला कोणाचं म्हणणं मनावर घेते ? कोणीतरी बोलेल म्हणून काय मी घावरणार आहे ? आता माझे दिल तरी किती राहिले ? आता उपभोग घेणार नाही , तर कधी घेणार ? वर जाताना काय बरोबर घेऊन जाणार आहे ? ते का नाही मी सोन्याची पोत घालणार म्हणजे घालणार . असा विचार करून निघाले.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

दिलेल्या शब्दांवरून कथालेखन 

. दिलेल्या शब्दांवरून कथालेखन करा :
आई , बाबा , मुलगा , पैसे , हरवणे , बाबांचे पैसे , आईचे पैसे , माझे नको का ? 


सगळ्यांचे असतात , मग माझे नकोत काय ? 

दुसरीच्या त्या वर्गातला निखिल हा शाळेत सगळ्यांचा लाडका होता . अत्यंत प्रामाणिक , सतत हसतमुख व सर्वांशी प्रेमाने वागणारा , कोणाशी कधी भांडण नाही , तंटा नाही . कोणाला कधी उलटून बोलणे नाही . दुसऱ्याला मदत करायला तत्पर . मनमिळाऊ . त्याच्या या स्वभावगुणांमुळे तो सगळ्यांना आवडायचा . त्याचे आईबाबाही त्याच्यावर खूश होते . त्याचे आईबाबा , आजीआजोबा यांनी त्याच्यावर संस्कारच तसे केले होते . "HOW TO WRITE KATHA LEKHAN IN MARATHI" ते घरच सज्जन माणसांचे होते . 
एके दिवशी निखिलची आई काम आटोपून हात पुसत पुसत स्वयंपाकघराबाहेर आली . तिच्या डोक्यात कामाची आखणी चालली होती . काहीजणांना पैसे द्यायचे होते . त्यासाठी ती आता पाकिटे तयार करणार होती . पाकिटांवर नावे लिहून त्यांना दयायचे पैसे त्या त्या पाकिटात घालून ठेवणार होती . ती हात पुसतच कपाटाकडे गेली . कपाट उघडले . त्यातला खण उघडला आणि तिला धक्काच बसला . शंभर रुपयांच्या नोटांचे एक बंडल गायब झाले होते ! 

तिने संपूर्ण कपाट तपासले . पण नाही ! मग तिने निखिलच्या बाबांना विचारले , " अग , मीच तुझ्याकडे दिले . मग मी कशाला घेईन ? " ते म्हणाले . तिने नंतर निखिलच्या आजीआजोबांना घाबरत घाबरतच विचारले . पण त्यांनी ते पाहिलेही नव्हते . मग तिने स्वयंपाक करणाऱ्या काडूंना विचारले . पण छे ! कोणालाही काही माहीतच नव्हते . 

तेवढ्यात निखिल खेळून परतला . आईने त्याला विचारले , निखिलने निरागसपणे सांगितले , " माझ्याकडे आहेत . 
" आई : अरे , पण तू का घेतलेस ? 
निखिल : मला हवे होते . 
आई : तू मला का नाही सांगितलेस ? 
निखिल : त्यात काय सांगायचे ?  
आई : तुला कशाला हवे होते ? 
निखिल : अग , बाबांचे पैसे असतात . तुझे पैसे असतात . आजीआजोबांचे पैसे असतात. मग माझे नकोत काय ? सगळे त्याच्याकडे आ वासून बघतच राहिले ! 


कथाबीजावरून कथालेखन
__
एक मुलगा सर्व कठीण परिस्थितीवर मात करून शिक्षण घेत असतो . कामाच्या ठिकाणी शर्ट भेट म्हणून मिळतो . घरी जाताना रेल्वेरुळ सरकलेले दिसतात . प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येते . शेकडो लोकांचे प्राण वाचवतो . मुलाला शौर्य पुरस्कार प्राप्त होतो . 

वरील कथाबाजीच्या आधारे शौर्य कथा करा 
  प्रसंगावधान

आभाळ फुटल्यासारखा आज सकाळपासून पाऊस कोसळत होता . दुपारपर्यंत सगळी वाहने रस्त्यातच अडकून पडली होती . रेल्वे मात्र धिम्या गतीने चालू होती . रेल्वेच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत पवन आपल्या आजीसह राहत होता . पावसाळ्यात या सगळ्यांचे प्रचंड हाल होत असत . " पोरा दोन - चार दिवस खाण्यापिण्याचे हाल होणार बघ ! " आजी काळजीपोटी पवनला बोलली , 

" ए आजी , तू काळजी करू नको . मी आज कामाला जाणार आहे . " पवनची आजी दोन - चार घरी पुणी - भांडी करीत असे . चौदा वर्षांचा पवन रात्रीच्या शाळेला जात असे . अभ्यास सांभाळून डॉक्टरांच्या अर्णवला सांभाळायचे काम तो करीत असे . 

आजही अर्णवला सांभाळायला तो डॉक्टरीणबाईच्या घरी गेला . छोटा अर्णव पवनच्या येण्याची वाटच पाहत होता .
 ' चल दादा , आपण कॅरम खेळू . " दोघेही कॅरम खेळण्यात दंग झाले . डॉक्टरीणबाईंनी पवनला एक छानसा लाल शर्ट दिला . त्याने पावसात ओला झालेला शर्ट काढला आणि नवा लाल शर्ट घातला . नवा शर्ट घातल्यामुळे पवनचा चेहरा खुलला होता . आजीला तो नवा शर्ट कधी दाखवतो असे त्याला झाले होते . काम संपल्यावर संध्याकाळी झपाझप तो घराकडे निघाला . झपाझप चालताना पवनला रेल्वेचे रूळ वेडेवाकडे झालेले दिसले . पवन जागीच थबकला ! अरे बापरे ! या रुळांवरून गाडी आली तर ; अपघात होणारच ! काय करावे बरं ? " तेवढ्यात त्याला युक्ती सुचली . अंगात घातलेला लाल शर्ट त्याने काढला . हातातील शर्ट जोरात हलवत तो रेल्वे रुळांवरून धावत सुटला . 


 अरे , हा मुलगा लाल शर्ट घेऊन का बरं धावतोय ? समोरून येणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरला शंका आली . कोणीतरी नियंत्रण कक्षाला फोन करून ही घटना सांगितली . ड्रायव्हरने प्रसंगावधान राखून गाडी हळूहळू थांबवली . 

पवन धापा टाकत ड्रायव्हरजवळ पोहोचला . “ साहेब , चला माझ्याबरोबर , मी दाखवतो तुम्हांला , पुढे रूळ वेडेवाकडे झालेत . " सगळे घटनास्थळी आले . सततच्या पावसामुळे रूळ वेडेवाकडे झालेले पाहून सगळ्यांना धक्काच बसला . 

" तुझ्यामुळे आज शेकडो लोकांचे प्राण वाचले . " गाडीच्या ड्रायव्हरने पवनच्या प्रसंगावधानाचे , शौर्याचे कौतुक केले . लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आपला नवा शर्ट कामी आला म्हणून पवन खूश झाला . प्रजासत्ताकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पवनच्या शौर्याबद्दल गौरव झाला . तो सोहळा पाहताना आजीचा आनंद गगनात मावत नव्हता . 

HOW TO WRITE KATHA LEKHAN IN MARATHI


( ४ ) शीर्षकावरून कथालेखन 

पुढील शीर्षकावरून कथालेखन करा : 

( १ ) कर्तव्य नरा देवपण देई । 

 कर्तव्य नरा देवपण देई । 

कणंगले स्टेशनच्या बाहेर आज मच्छीमारी करणाऱ्या लोकांची गर्दी जमली होती . हातात जाळी , वल्हे , डोली घेऊन सारे आले होते . साऱ्याजणांना अजब तक्रार नोंदवायची होती . मल्ल्या कोळी त्यांचा म्होरक्या होता . तो म्हणाला , " आमच्या गावातून वाहणारी शांभी नदी हरवली आहे . " पोलीस खाते चक्रावले . ही तक्रार कशी लिहून घेणार ? नदी कशी शोधणार ? 

परंतु मच्छीमारी करणारे मात्र हैराण होते . गेली अनेक वर्षे चवीचे मासे देणाऱ्या नदीचे पात्र हल्ली कोरडे ठणठणीत पडले होते . 

शांभी नदी बारमाही वाहणारी नदी होती . तिच्या किनाऱ्यावर शेती , फळबागा , भाजीपाला पिकत असे . पण , गेले काही दिवस नदीचे पात्र कोरडे पडायला लागले होते. आता तर उरलासुरला ओलावा पण नष्ट झाला होता .

लोकांना काही कळेना तेव्हा ते पोलीस स्टेशनला पोहोचले आणि तक्रार नोंदवली . पोलीस इन्स्पेक्टर नंदा दिवाण या चाणाक्ष होत्या . लोकांच्या तक्रारीचा अर्थ त्यांना समजला होता . त्यांनी लोकांना विचारले , " जेव्हा नदी होती तेव्हा तुम्ही नदीत काय काय विसर्जित करीत होतात ? " " निर्माल्य , कचरा , घाणपाणी , विष्ठा , पिंड इत्यादी " - अशी भली मोठी यादी लोकांनी दिली . " आणि नदी स्वच्छ कधी केली होती ? " मॅडमनी विचारले . ' कशाला ? नदी स्वच्छ का करायची ? नदी स्वतःच सर्व कचरा समुद्रात नेऊन सोडायची . " " अगदी बरोबर , नदी स्वत : च स्वत : ला स्वच्छ करायची . आम्ही काही करण्याची गरज नव्हती , " मल्ल्या कोळी म्हणाला . " इथेच तुमचे चुकले बघा . तुम्ही टाकलेल्या कचऱ्यामुळे गाळ तयार झाला , नदीचे पात्र बुजून गेले . मग नदीत पाणी टिकेल कसे ? आलेले सर्व पाणी वाहून गेले . नदी तुम्हीच नष्ट केलीत . " इन्स्पेक्टर दिवाण समजावून सांगत म्हणाल्या . गावकऱ्यांना आपली चूक कळली . त्यांनी आठ दिवसांत मेहनत करून गाळ काढला . हळूहळू नदीतील झरे वाहायला लागले . पात्रात थोडे पाणी दिसले गावकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी तरळले . हरवलेली नदी आपणच शोपली याचा सर्वांना आनंद झाला .

---------------------------------------------------------------------------------------------------------------------

( ५ ) मुद्द्यांवरून कथालेखन

 दिलेल्या मुद्द्यांवरून कथालेखन करा 

 मुद्दे : सैरभैर मनवा - आईवडिलाशी वाद अभ्यासाकडे नसणे - आधुनिक राहणीमानाचे व्यसन - वर्गात चोरी करणे - घरातून पळून जाणे मालिकेत काम मिळण्याचे स्वप्न भंगणे - घरी परतणे . 

_____________&&

बदल 

" मनवा , तुझे लक्ष कुठे आहे ? कधीपासून तुला अनुभवकथन करायला सांगतेय , तू स्वप्नातच वावरतेस ! " मनवावर माने बाई वैतागल्या होत्या . नेहमी वर्गात भराभर उत्तरे देणारी मनवा , हल्ली सैरभैर झालेली होती . नटणे , मुरडणे , डोळ्यांत काजळ भरणे , केसांच्या बटा कपाळावर खेळवणे या गोष्टींकडे तिचे लक्ष वळले होते . तिच्या या वागण्यातील बदलामुळे मनवाचे आईबाबाही हैराण झाले होते . HOW TO WRITE KATHA LEKHAN IN MARATHI

" मनवा , तू टीव्ही बंद करतेस की नाही ? " मनवाच्या आईने वैतागून म्हटले . “ करते ग बंद ! काय कटकट आहे ; फॅशन शो संपला की लगेच बंद करते टीव्ही . 

" दहावीचा अभ्यास करण्याबाबत तर अशा त - हेचा रोजचा संवाद होता . खरं तर मनवाचे अलीकडे अभ्यासात अजिबात मन लागत नव्हते . सौंदर्यस्पर्धा , मॉडेलिंग , मालिकेतील नायिका यांचा मोठा प्रभाव तिच्यावर होता . सतत आधुनिक पेहराव आणि मेकअप करावा असे तिला वाटत असे . या सर्व गोष्टींसाठी ती हट्टाने पैसेही मागत असे . छानछोकीचे तिला व्यसनच जडले होते . 

एके दिवशी तर कमालच झाली । मनवाने वर्गात चक्क पैसे चोरले । तिच्या मैत्रिणी आणि वर्गशिक्षिकाही हैराण झाल्या . सगळ्यांना धक्काच बसला . 

मनवाच्या आईबाबांना बाईंकडून ही हकिगत कळली . काय करावे या मुलीला , कसे बोलावे या मुलीशी काही कळत नव्हते . दोघेही सुन्न झाले होते . 

मनवाला आईबाबांच्या समोर बोलावण्यात आले , तिचा चेहरा निर्विकार होता . " असे का वागलीस ग ? " आईने तिला विचारले . तेव्हा मनवा आईशी उद्धटपणे बोलू लागली . तेवढ्यात काड असा आवाज आला . बाबांनी तिला थप्पड मारली होती . " मारा मला . मी मला हवे तेच करणार ! " मनवा बेभान होऊन ओरडू लागली . 

" मनवाचे समुपदेशन करायला हवे " , असे बाई म्हणाल्या . कारण मनवा समजून घेण्याच्या पलीकडे गेली होती . 

दुसऱ्याच दिवशी ज्याची सर्वांना भीती होती तेच घडले ... मनवा कुणालाही न सांगता घरातून रात्री पळून गेली . मालिकेत किंवा चित्रपटात नायिका होणार असे तिने मनाशी ठरवले होते . त्यासाठी रात्रीच्या गाडीने ती शहराकडे निघाली होती . रात्रभर गाडीत तीच स्वप्न पाहत होती . सकाळी महिला पोलिसांनी तिला उठवले . तिचे स्वप्न भंगले म्हणून तिला राग आला होता . पण समोर पोलीस पाहून ती गांगरली . 


तिला एकटीला पाहून त्यांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली . ऑडिशनसाठी घरून पळून आल्याचे तिने कबूल केले . पोलिसांनी निर्मात्यांना फोन केला . फोन बंद होता . मनवाची फसवणूक झाली होती . शेवटी परतीच्या गाडीने ती गावी पोहोचली . आईबाबांच्या मिठीत विसावली . म्हणाली , " आता फक्त दहावीचा अभ्यास हेच माझे ध्येय! 


तुम्ही या "कथा लेखन कसे करावे?" यातून काही शिकला असाल, तुम्हाला हे जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा . कमेंट करा, लाईक करा .
तुमचा शिक्षक.


Post a Comment

0 Comments