जाहिरात लेखन शिका सोप्या भाषेत | Jahirat Lekhan in Marathi 2021

Jahirat Lekhan in Marathi जाहिरात लेखन शिका सोप्या भाषेत मराठी 9वी 10वी. मित्रांनो जाहिरात ही आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे.

देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्या आपले उत्पादन बाजारामध्ये जास्तीत विकले जावे या हेतूने प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम फक्त जाहिरात करण्याकरिता खर्च करते. काही कंपन्या जाहिरात कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता कॉंट्रॅक्ट साईन करते. जाहिरातींचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे, आजच्या युगात जाहिरात ही डिजिटल झाली आहे.

संगणकाच्या मदतीने जाहिरात डिजिटल बनवली जात आहे, जाहिरातीमध्ये ऑडिओ, विडियोचा वापर करून वस्तूंचा प्रत्यक्ष वापर दखवला जात आहे. त्यामुळे जाहिरात अधिक आकर्षक होऊ लागली आहे. तसेच जाहिरात ही फेसबूक, व्हाटसप्प, लिंकडेन, टेलेग्राम, व यूट्यूब सारख्या सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न उत्पादक कंपन्या करत आहेत. जाहिरात डिजिटल झाल्यामुळे कंपनीला प्रत्यक्ष ग्राहक शोधण्याची गरज पडत नाही, कारण जाहिरात ही डायरेक्ट ग्राहकाच्या मोबाइल वर पोहचली जात आहे.

जाहिरात लेखन ही एक सृजनशील कला आहे त्यामुळे यावर प्रभुत्व मिळवणे ही आजच्या काळाची गरज आहे, आपण बाजरामध्ये, भाजी मंडई मध्ये पाहतो भाजी विक्रेता हा ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता मोठ्या आवाजात विनोदी भाषेचा वापर करून ओरडत असतो, ही सुद्धा एक जाहिरातच आहे. व्यवसायामध्ये जाहिरातील अधिक महत्व दिले जात आहे.


इयत्ता दहावी व बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये जाहिरात लेखन हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यादृष्टीने या लेखामध्ये दिलेली माहिती जाहिरात लेखन करताना उपयुक्त ठरेल.

Jahirat Lekhan in Marathi जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी
जाहिरात लेखन करताना जाहिरातीची भाषा लक्षात घेणे महत्वाचे आहे, ती खालील मुद्यांना अनुसरून असावी.

Jahirat Lekhan in Marathi 2021


जाहिरातलेखन ( गुण ५ ) 

लक्षात ठेवा - 

कृतिपत्रिकेतील प्रश्न ५ ( आ ) मधील तीन लेखनप्रकासंबकी एक प्रकार आहे . जाहिरातलेखन - 

प्रस्तुत प्रकरणात ' जाहिरातलेखन ' या लेखनप्रकारासंबंधात मार्गदर्शन दिले आहे . 

जाहिरातीचा प्रश्न कृतियुक्त स्वरूपात दिला जाईल . त्यासाठी प्रसंग , चित्र , बातमी ,  शैक्षणिक विषय यांपैकी  कोणत्याही स्वरूपात विषय दिला जाईल , जाहिरात लिहिताना दिलेल्या कृतीतील सर्व मुददयांचा विचार करावा . -


कृतिपत्रिकेत पुढीलपैकी कोणत्याही प्रकारची ती दिली जाईल : 

( १ ) शब्दांवरून जाहिरातलेखन , 
( २ ) जाहिरात देउन त्यावरील ती सोडवणे , 
( 3 ) विषय देऊन जाहिरातलेखन , 
( ४ ) दिलेल्या जाहिरातीच अधिक आकर्षक पदधतीने पुनलेखन , 
( ५ ) कलात्मक , सर्जनशील रितीने तयार केलेल्या अन्य कोणत्याही कृतीआधारे जाहिरातलेखन .
शब्दमर्यादा : ५० ते ६० शब्द .

• प्रस्तावना : 

सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक वस्तू वापरतो . त्या वस्तू आपण निर्माण करीत नाही , म्हणून , आपल्या गरजेच्या वस्तूंसंबंधात आपल्याला पुढील माहिती हवी असते  : 'Jahirat Lekhan in Marathi 2021'

( १ ) ती वस्तू आपली गरज किती प्रमाणात आणि कशा प्रकारे भागवते ? 
( २ ) ती वस्तू कुठे मिळते ? 
( ३ ) त्या वस्तूची किंमत काय ? 
( ४ ) आपल्याला हवी असलेली वस्तू कोण निर्माण करते ? 

वरील माहिती पुरवणारा मजकूर म्हणजे ' जाहिरात ' होय . आपल्याला हव्या असलेल्या वस्तूची माहिती आपल्याला जाहिरातीमार्फत मिळते , जाहिरात आपल्याला हव्या असलेल्या वस्तूपर्यंत नेते , म्हणजेच आपले लक्ष वेधून घेते . 

लोकांना हव्या असलेल्या वस्तू निर्माण करणारा तो निर्माता होय . निर्मात्याने वस्तू निर्माण केल्यावर ती वस्तू लोकांनी खरेदी करणे आवश्यक असते , म्हणून वरील माहिती लोकांपर्यंत पोहोचवावी लागते . वरील माहिती पुरवणाऱ्या मजकुराला जाहिरात म्हणतात , वस्तूचा निर्माता व ग्राहक यांना जोडून देण्याचे कार्य जाहिरात करते . म्हणून आहिरात आकर्षक करावी लागते .

आपण निर्माण केलेली वस्तू जास्तीत जास्त ग्राहकांनी खरेदी करावी , असे प्रत्येक निर्मात्याला वाटत असते . म्हणून निर्मात्याला जाहिरात आकर्षक करावी लागते.


तसेच , एकाच प्रकारची वस्तू निर्माण करणारे अनेक निर्माते असतात . अशा वेळी आपलीच वस्तु उत्तम आहे , हे लोकांना कळवण्यासाठी जाहिरात आकर्षक करावी लागते . 

जाहिरात करण्याचे विविध मार्ग आहेत . मार्ग कोणताही असला , तरी प्रथम ती जाहिरात लिहून काढावीच लागते . 

- महत्त्वाचे मुद्दे 

( १ ) जाहिरातीची माध्यमे : 

( १ ) इंटरनेट ( २ ) चित्रपट ( ३ ) वृत्तपत्रे 
( ४ ) मासिके ( ५ ) आकाशवाणी 
( ६ ) दूरदर्शन 
( ७ ) चौकांमधील फलक ( ८ ) गर्दीच्या ठिकाणी वाटली जाणारी पत्रके .

 ( २ ) जाहिरात लिहिताना घ्यायची काळजी : 

( १ ) जाहिरात कोणत्या वस्तूची अथवा सेवेची आहे , हे ठळकपणे व लक्षवेधक रितीने जाहिरातीत मांडले पाहिजे . 
( २ ) जाहिरात तयार करताना मथळा , उपमथळा तयार करावा . त्यासाठी सुभाषिते , सुवचने , सुप्रसिद्ध कवितेतल्या वा गाण्यातल्या ओळी , काव्यमयतेचा आभास निर्माण करणाऱ्या ओळी , लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असलेले शब्दप्रयोग इत्यादींचा उपयोग करता येतो . 
( ३ ) जाहिरात नेहमी कमीत कमी शब्दांत असावी . 
( ४ ) जाहिरातीची भाषा साधी , सोपी ; पण वेधक असावी . व्यवहारातील भाषा वापरली तरी चालेल . 
( ५ ) भाषा क्लिष्ट , किचकट , बुद्धीला ताण दयायला लावणारी नसावी . 
( ६ ) समाजातील प्रचलित संकेत , लोकभावना यांना धक्का देणारी भाषा नसावी.
( ७ ) काव्याचा आभास निर्माण करणारी लयबद्ध शब्दरचना जाहिरात आकर्षक बनवते. 
( ८ ) विनोदाची पखरण करता आल्यास उत्तम . 
( ९ ) जाहिरातीला चित्रांची जोड देता आल्यास जाहिरात अधिक प्रभावी होते , हे खरे . मात्र जाहिरातलेखनात चित्रे काढणे किंवा चित्रकलात्मक सजावट करणे परीक्षेत अनिवार्य नाही . 
( १० ) ग्राहकांच्या आवडी , गरजा , सवयी व फॅशन्स या सतत बदलत असतात , जाहिरातीत या बदलांचा प्रभाव दिसला पाहिजे . 
( ११ ) जाहिरातीचे भाषिक रूप महत्त्वाचे . साध्या चौकटीमध्ये योग्य ओळीत केलेली मांडणीही पुरेशी असते . 
( १२ ) जाहिरात तयार करताना दिलेल्या कृतीतील सर्व मुद्द्यांचा विचार करावा . 
( १३ ) जाहिरातीत संपर्क स्थळ , संपर्क क्रमांक , ई - मेल आयडी इत्यादींचा ठळक उल्लेख असला पाहिजे .

Jahirat Lekhan in Marathi 2021


 जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी. मित्रांनो जाहिरात ही आजच्या स्पर्धेच्या युगातील महत्वाचा घटक आहे, जाहिरात जितकी प्रभावी असेल तितका वस्तूंचा खप वाढतो, वस्तूंची मागणी वाढते. जाहिरात जेवढी आकर्षक, चित्रमय असेल, तेवढा प्रभाव त्या वस्तूच्या विक्रीवर पडतो. त्यामुळे एखाद्या उत्पादनाची पद्धतशीर, प्रभावी जाहिरात करणे ही एक कला आहे.

देशातील तसेच परदेशातील अनेक कंपन्या आपले उत्पादन बाजारामध्ये जास्तीत विकले जावे या हेतूने प्रत्येक वर्षी ठराविक रक्कम फक्त जाहिरात करण्याकरिता खर्च करते. काही कंपन्या जाहिरात कंपनीला आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याकरिता कॉंट्रॅक्ट साईन करते. जाहिरातींचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत चालले आहे,Jahirat Lekhan in Marathi 2021 आजच्या युगात जाहिरात ही डिजिटल झाली आहे.


 
संगणकाच्या मदतीने जाहिरात डिजिटल बनवली जात आहे, जाहिरातीमध्ये ऑडिओ, विडियोचा वापर करून वस्तूंचा प्रत्यक्ष वापर दखवला जात आहे. त्यामुळे जाहिरात अधिक आकर्षक होऊ लागली आहे. तसेच जाहिरात ही फेसबूक, व्हाटसप्प, लिंकडेन, टेलेग्राम, व यूट्यूब सारख्या सोशल मीडियाचा वापर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न उत्पादक कंपन्या करत आहेत. जाहिरात डिजिटल झाल्यामुळे कंपनीला प्रत्यक्ष ग्राहक शोधण्याची गरज पडत नाही, कारण जाहिरात ही डायरेक्ट ग्राहकाच्या मोबाइल वर पोहचली जात आहे.

जाहिरात लेखन ही एक सृजनशील कला आहे त्यामुळे यावर प्रभुत्व मिळवणे ही आजच्या काळाची गरज आहे, आपण बाजरामध्ये, भाजी मंडई मध्ये पाहतो भाजी विक्रेता हा ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता मोठ्या आवाजात विनोदी भाषेचा वापर करून ओरडत असतो, ही सुद्धा एक जाहिरातच आहे. व्यवसायामध्ये जाहिरातील अधिक महत्व दिले जात आहे.


 
इयत्ता दहावी व बारावीच्या मराठी विषयाच्या पेपरमध्ये जाहिरात लेखन हा प्रश्न हमखास विचारला जातो. त्यादृष्टीने या लेखामध्ये दिलेली माहिती जाहिरात लेखन करताना उपयुक्त ठरेल.

Jahirat Lekhan in Marathi जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी
जाहिरात लेखन करताना जाहिरातीची भाषा लक्षात घेणे महत्वाचे आहे, ती खालील मुद्यांना अनुसरून असावी.

Jahirat Lekhan in Marathi 2021


जाहिरातीची भाषा:

उत्पादनाची गुणवत्ता निर्माण करणारी: उत्पादन किती प्रभावी आहे, किती गुणकारी आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा.  

कमी शब्दात जास्त आशय निर्माण करणारी: कमी शब्दांचा वापर करून जास्त अर्थ किंवा जो संदेश द्यायचा आहे तो भाषते समाविष्ट करण्यात यावा.  


 
प्रभावी शब्द रचना असावी: भाषेमध्ये वाक्यरचना ही परिणामकारक असावी, सरळ आणि उत्पादनाचे प्रतिबिंब दाखवणारी असावी.

उत्पादन(वस्तु) मिळण्याचे ठिकाण यांचा स्पष्ट उल्लेख असावा: उत्पादन ज्या ठिकाणी ग्राहकाला विकत मिळेल त्या ठिकाणाचा पत्र व्यवहाराचा पत्ता, ईमेल, व फोन नंबर इत्यादि माहिती देण्यात यावी.

अलंकारिक, काव्यमय शब्दांचा वापर वाक्यरचनेत असावा: उदाहरणार्थ: नमक कम ही खाऐ, पर अच्छा खाऐ! ….हे वापरा आणि आयुष्यभर तरुण रहा.

उत्पादनाची किंमत, सवलत यांचा स्पष्ट उल्लेख असावा: उत्पादनाचे वजन, विक्रीची किंमत, व उत्पादनावर असणारी चालू ऑफर यांचा उल्लेख करण्यात यावा.  

उत्पादनाची गरज निर्माण करणारी असावी: ग्राहकाने हे उत्पादन का विकत घ्यावे, इतर उत्पादनाच्या तुलनेत हे का फायदेशीर आहे याचे स्पष्टीकरण थोडक्यात असावे.

सूचना: जाहिरात ही पेनने लिहावी, पेन्सिलचा वापर करू नये. "Jahirat Lekhan in Marathi 2021" जाहिरातीमध्ये चित्र काढू नये. चित्र, नक्षी वगैरे काढून सुशोभीकरण करू नये. जाहिराती सभोवती एक साधी चौकट पुरेशी आहे.



प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात?

वरील जाहिरातीचे अधिक आकर्षक व प्रभावी स्वरूपात पुनर्लेखन करा.
शब्दावरून जाहिरात लेखन करणे.





खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.


अशा प्रकारे जाहिरात लेखनावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात.

उदाहरण: १

उदाहरणार्थ: 2

खालील जाहिरात वाचा व त्याखालील कृती सोडवा.

  

_____________________________________________________
 
           उत्तम आरोग्यहवं आहे ? 

                 आत्ताच ' हिरवाई ' बागेतून आणलेल्या      

           ताज्या ताज्या भाज्या खा !  

           उत्तम आरोग्य हवं आहे ? 

                रासायनिक खते न वापरलेल्या भाज्या खा !   

           उत्तम आरोग्य हवं आहे ? 

           स्वच्छतापूर्वक हाताळलेल्याच भाज्या खा !

      हे सर्व आम्ही देतो . 

            हे सर्व आम्ही घरपोच देतो .

           हे सर्व आम्ही रास्त दरात घरपोच देतो . 

  त्वरा करा !  

            एक दिवस आधी मागणी नोंदवणे आवश्यक .

         ग्रीनरी सेंद्रिय भाजीपाला केंद्र 

                 सिंहगड रोड , सातारा .
                संपर्क : 9820xxxxx2
___________________________________________________

उतर  :



 
आपणास जर “Jahirat Lekhan in Marathi". जाहिरात लेखन मराठी 9वी 10वी. जाहिरात लेखन मराठी.” या लेखामध्ये दिलेली माहिती अभ्यासाच्या दृष्टीने महत्वपूर्ण वाटत असल्यास आपल्या मित्रांसोबत सोशल मीडियावर नक्की शेअर करा.








Post a Comment

0 Comments