मराठी सारांश लेखन कसे करावे ? इयत्ता १० वी | Maraṭhi saransa lekhana kase karave 2021


Maraṭhi saransa lekhana kase karave आत्ता ते आपण पाहूया इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मी आता तुम्हाला सारांश लेखन कसे करावे , त्याची सोपी पद्धत सांगणार आहे. काही उदाहरण पण मी इथे तुम्हाला देणार आहेत. चला तर मग आपण शिकूया सारांश लेखन..

मराठी सारांश लेखन कसे करावे ? इयत्ता १० वी | Maraṭhi saransa lekhana kase karave 2021
Maraṭhi saransa lekhana kase karave 2021

Maraṭhi saransa lekhana kase karave


साराशलेखन ( गुण ६ ) 

लक्षात ठेवा : 

# कृतिपत्रिकेतील प्रश्न ५ ( अ ) ( ९ ) मध्ये आणखी एक प्रकार आहे . - सारांशलेखन . या प्रकरणात ' सारांशलेखन ' 

या लेखनप्रकाराचे मार्गदर्शन दिले आहे . 

कृतिपत्रिकेतील प्रश्न १ ( इ ) मध्ये दिलेल्या अपठित तायवेव सारांशलेखन करण्यास सांगितले जाते . 
या उताऱ्याचा एक - तृतीयांश इतका सारांश ( सुमारे ३५ ते ४० शब्दांत ) लिहिणे अपेक्षित आहे . 
सारांशाला शीर्षक दयावे . . 

विदयार्थ्यांना सारांशलेखनाचा अधिक सराव मिळावा , म्हणून येथे काही अपठित उतारे त्यांच्या सारांशांसहित देण्यात आले आहेत . 

• प्रस्तावना : 

दिलेला उतारा किती समजला आहे , हे तपासण्यासाठी ही कृती विचारलेली असते . खरे तर एखादा मजकूर वाचल्यावर विदयार्थ्याला किती आकलन होऊ शकते , त्याची आकलनक्षमता काय आहे , त्याला स्वतंत्रपणे कोणताही मजकूर समजून घेता येतो काय , हे तपासणे हाच या कृतीचा उद्देश असतो . 

सारांशाच्या अनुषंगाने उताऱ्याचा आशय मोजक्या शब्दांत मांडणे येथे अपेक्षित असते . दिलेल्या उताऱ्यातील आशय विदयार्थ्यांनी स्वत : च्या शब्दांत आणि एक - तृतीयांश शब्दांत ( म्हणजे सुमारे ३५ ते ४० शब्दांत ) लिहावा , अशी अपेक्षा आहे . 'Maraṭhi saransa lekhana kase karave'

 सारांशलेखनासाठी सूचना : 

( १ ) कृतिपत्रिकेतील प्रश्न १ ( इ ) सोडवताना तो उतारा काळजीपूर्वक वाचावा . त्या उताऱ्यात कोणता विचार मांडला आहे , हे समजून घ्यावे . 

( २ ) पुन्हा एकदा उतारा वाचावा . नंतर उताऱ्यातील विचार मनात साठवावेत . 

( ३ ) उताऱ्यातील विचार थोडक्यात स्वत : च्या शब्दांत लिहून काढावा . हा विचार लिहून काढताना उताऱ्यातील उदाहरणे , आलंकारिक शब्द इत्यादी टाळावेत . मूळ उताऱ्यात अवतरणे असल्यास ती जशीच्या तशी घेऊ नयेत . हा मजकूर तृतीयपुरुषात आणि थोडक्यात लिहावा . 

( ४ ) उताऱ्यात नसलेला मुद्दा सारांशात घेऊ नये , उताऱ्यातील विचारावर कोणतेही भाष्य करू नये . उताऱ्यातील विचार आपण थोडक्यात सांगायचा आहे . 

( ५ ) आता तुम्ही लिहिलेल्या सारांशातील शब्द मोजावेत . शब्दसंख्या ३५ ते ४० एवढी आहे का ते पाहावे . जास्त असल्यास सारांशातील अनावश्यक शब्द काढून टाकावेत . 

( ६ ) सारांशाला शीर्षक देणे आवश्यक असते . ' शीर्षक दया ' असे सांगितलेले नसले तरी शक्यतो शीर्षक दयावे . या पद्धतीने वर्षभरात किमान दहा उताऱ्यांचा सराव केला ; तर कोणत्याही उताऱ्याचे सारांशलेखन कमीत कमी वेळात सहजगत्या करता येईल .

उदा....

saransa lekhana


१. दिलेल्या उताऱ्याचा एक तृतीयांश ( १/३ ) शब्दांत सारांश लिहा , 

माणसाचे दुर्गुण हे माणसाला अधोगतीकडे नेत असतात . बऱ्याचदा आपल्यातील काही दुर्गुणामुळे आपलपावर पश्चात्ताप करण्याची वेळ येते . आळस हा माणसाचा शत्रू आहे हे प्रत्येकालाच माहीत आहे ; पण आपल्यापैकी किती जणांनी आळस पूर्णपणे झटकून दिला आहे ? " उदयापासून मी कामाला सुरुवात करेन ' असं आपण नेहमी म्हणतो ; पण आठवडे , महिने सरतात . तरी तो : दिवस उजाडत नाही . आजचे काम उदयावर ढकलण्याची प्रवृत्ती सर्वांमध्ये दिसून येते . आळस आपल्या कामात अडथळा आणतो . तंत्रज्ञानाच्या युगात माणसाची अनेक कामे सोपी झाली आहेत ; परंतु केवळ त्यावर अवलंबून राहून कसं चालेल ? सर्व महापुरुषांनी आळसाची निंदा केली आहे . आळशी माणसे वेळेची किमत करत नाहीत . त्यांना काम न करण्यासाठी निमित्त तेवढे हवे असते . आळसावर विजय मिळवला तरच भविष्यात यशाकडे आपल्याला saransa lekhana पहिले पाऊल टाकता येईल . 

सारांश 

माणसाच्या दुर्गुणांमुळे माणसाची अवनती होते . आळस हा आपला शत्रू आहे हे माहीत असूनही आपण तो सोडत नाही . आळसामुळे कामे पुढे ढकलली जातात आणि अपूर्ण राहतात . आळशी माणसांना वेळेचे मोल नसते . आळस सोडून दिला तरच भविष्यात यश मिळेल , 


Maraṭhi saransa lekhana



२. दिलेल्या उताऱ्याचा एक तृतीयांश ( १/३ ) शब्दांत सारांश लिहा . 

मानवाच्या उत्कर्षापासून क्रीडा हा त्याच्या जीवनाचा एक भाग बनला आहे . खेळामुळे माणसाचे मनोरंजन होते , त्याचप्रमाणे खिलाइ वृत्ती आणि संघटनकौशल्य हे गुण वाढीस लागतात . खेळांमुळे मानवाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो . लहानपणी विविध खेळ खेळायला आवडतात ; पण जसजसे मोठे होत जातो तसतसे मैदानी खेळ पूर्णपणे विसरत जातो . त्यामुळे , आजचा तरुण ताणतणावात असलेला दिसतो , नैराश्याने ग्रासलेला दिसतो . खेळामुळे आपली उत्साही वृत्ती टिकून राहते . खेळात म्हणा किंवा जीवनात म्हणा चढ - उतार , हार - जीत हो आलीच ; पण खेळाडू ही हारसुद्धा संयमाने स्वीकारतात . जीवनातल्या कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन पुन्हा उभे राहण्याची शिकवण आपल्याला खेळामुळे मिळते . एक छंद म्हणून खेळ खेळत राहिलो , तर आयुष्यभर सुखी आणि समाधानाचे जीवन जगू शकतो , 

साराश

 खेळ मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे . खेळांमुळे मनोरंजन होते , व्यक्तिमत्त्व घडते . खिलाडूवृत्ती , संघटनकौशल्य या गुणांची जोपासना होते . मैदानी खेळ खेळायचे सोडल्यामुळे हल्लीचे तरुण ताणतणाव , निराशेने त्रस्त दिसतात . खेळ जीवनातल्या संकटांना तोंड देऊन पुन्हा उभे राहायला शिकवतात . खेळामुळे आपण सुखासमाधानाने राहू शकतो .. 



.दिलेल्या उताऱ्याचा एक तृतीयांश  ( १/३ ) शब्दांत सारांश लिहा . 

पूर्वी गावगाडा होता आणि त्यामध्ये बारा बलुतेदार होते . गावची संस्कृती नैतिक मूल्ये जपत होती . हळूहळू कारखाने आले . उदयोगधंदयामध्ये बदल होत गेले . समाज बदलत गेला . शहरे वाढू लागली . शहरे वाढली तसतसे लोकांच्या गरजा पुरवणारे ' मॉल वाढले . त्यामुळे , छोटो छोटो किराणा , भुसार मालाची दुकाने हरवून गेली . शहरामध्येसुद्धा छोटे छोटे दुकानदार होते . विशिष्ट प्रकारच्या वस्तू विशिष्ट दुकानांत मिळायच्या . लोहाराचा भाता बंद पडला . कुंभाराचे चाक फिरायचे थांबले . मॉलमध्ये सर्व वस्तूंची दुकाने एकत्र असतात . शिवाय , खादापान सेवेची हॉटेल्स व सिनेमागृहे असतात . संपूर्ण मॉल वातानुकूलित असतो . मॉलच्या या झगमगाटाचे आकर्षण श्रीमंत , गरोव व मध्यमवर्गीय सगळ्यांनाच असते . महागड्या वस्तू म्हणजे दर्जेदार वस्तू असा गैरसमज निर्माण झाला आहे . आकर्षक जाहिरातीमुळे लोकांना मॉलचे आकर्षण दिवसेंदिवस वाढत आहे . मॉलच्या या अतिक्रमणामुळे छोट्या दुकानदारांना फटका बसला . 

सारांश 

पूर्वीचा गावगाडा व बारा बलुतेदार पद्धती बदलली आणि शहराकडे लोकांचा ओढा वाढला . पूर्वी विशिष्ट दुकानांमध्ये विशिष्ट वस्तू मिळत . मॉल ही संकल्पना आल्यानंतर मॉलचा झगमगाट आणि एकाच ठिकाणी विविध गोष्टी मिळण्याची सुविधा यामुळे सगळ्यांना मॉलये आकर्षण वाटते . यामुळे , लहान दुकानदारांचे नुकसान झाले .



४.दिलेल्या उताऱ्याचा एक तृतीयांश ( १/३ ) शब्दांत सारांश लिहा . 

वेळ ही फार मौल्यवान गोष्ट आहे , म्हणून , वेळेचा उपयोग समजूतदारपणे केला पाहिजे . वेळेचा वेग किती आहे ? वळसाबत आपल्याला चालता येईल का ? कोणीही सांगू शकत नाही ; पण जो वेळेचे भान बाळगतो , तो वेळेसोबत सहज चालू शकतो , मा वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे . वेळेचे नियोजन केले पाहिजे . मग दैनंदिन कामे व्यवस्थित पार पडतात . शिवाय , इतर गोष्टीसार ' भरपूर वेळ मिळतो . अशी माणसे अनेक छद जोपासतात . घरी परतल्यावर दीड - दोन तास वाचन करू शकतात . काहीजण संगीताचा आस्वाद घेतात . काहीजण संध्याकाळचा फेरफटका मारतात , तर काहीजण कुटुंबियांसोबत गप्पागोष्टी करतात , वेळ नाही , ही सबब आळशी माणसे देतात . ही माणसे कामाचे नियोजन करत नाहीत . त्यामुळे , त्यांची कामे वेळेवर पार पडत नाहीत . त्यांना अपयश येते शिवाय त्यांना मोकळा वेळही मिळत नाही . जीवनात वेळेला किती महत्त्व आहे . हे वेळेवर कळले पाहिजे . आळस केला , वेळ टळली , तर सगळेच हातचे जाते शेतकऱ्याने आपल्या सवडीप्रमाणे पेरणी केली , तर काय होईल ? परीक्षेचे वेळापत्रक आठवणीत राहिले नाही , तर सगळे वर्ष जाईल पारिजातक पहाटे फुलतो , रातराणी काळोखात डवरते , चादणे केव्हा पडावे , काळोख कधी दाटावा , "Maraṭhi saransa lekhana kase karave  karave"  हे ठरलेले आहे . 

सारांश 

वेळ ही अतिशय अमूल्य गोष्ट असल्याने तिचा सदुपयोग करायला हवा . वेळेचे व्यवस्थित नियोजन करणारे रोजची कामे नीट पूर्ण करून विविध छदही जोपासू शकतात . कामाचे नियोजन न करणाऱ्या आळशी लोकांना यश मिळत नाही . आयुष्यात वेळेचे महत्त्व ओळखले पाहिजे . शेतीची पेरणी , परीक्षेचे वेळापत्रक यांच्याप्रमाणेच फुलाचे उगवणे , चांदण्याचे उमलणे यांचीही वेळ ठरली असते . 



.दिलेल्या उताऱ्याचा एक तृतीयांश ( १/३ ) शब्दांत सारांश लिहा . 

संयमाला तुच्छ मानू नका . तुमच्या विकासासाठी तो आहे . समाजाच्या हितासाठी तो आहे . आपण संयम पाळला नाही , तर आपले काम नीट होणार नाही काम नीट झाले नाही म्हणजे समाजाचे नुकसान होणार . आपण केवळ आपल्या स्वतःसाठी नाही . आपण समाजासाठी आहोत , याची जाणीव आपणांस हवी . हा आपला देह , हे आपले जीवन समाजाचे आहे . आपले पोषण सारी सृष्टी करत आहे . सूर्य प्रकाश देत आहे , मेघ पाणी देत आहेत , वृक्ष फुले - फळे देत आहेत . शेतकरी धान्य देत आहे . विणकर वस्त्र देत आहे . आपण या सर्व सजीव - निर्जीव ) सृष्टीचे आभारी आहोत , यासाठी हे आपले जीवन त्यांच्या सेवेत अर्पण करणे हे आपले काम आहे .

सारांश 

तुमच्या प्रगतीसाठी व समाजाच्या कल्याणासाठी संयम महत्त्वाचा आहे . आपले आयुष्य समाजासाठीही असते . निसर्गातील सूर्य , ढग , झाडे तसेच , शेतकरी , विणकर इत्यादींमुळे आपले पालनपोषण होते . तेव्हा या सर्वांचे आभार मानण्यासाठी आपण आपले आयुष्य त्यांना समर्पित केले पाहिजे .




तुम्हाला जर Maraṭhi saransa lekhana आवडले असेल तर शेअर करा.



Post a Comment

0 Comments