Vaicarika lekhana 'chala khedyankade'
"MARATHI NIBHANDA"
विषय, चित्र व मुद्दे यांवर आधारित "वैचारिक लेखन चला खेड्याकडे" आज मी तुम्हाला इथे देणार आहेे .
शिक्षणाद्वारे समाज खेड्यांच्या समस्या
ओस पडलेली खेडी
' वैचारिक लेखन चला खेड्यांकडे '
' खेड्यांकडे चला '
खेड्यांकडे कुणीच लक्ष दिले नाही ; त्याचे विपरीत परिणाम आज दिसत आहेत . खेडी ओस पडली आहेत आणि शहरे मात्र वेडीवाकडी फुगत चालली आहेत . निसर्गाचा समतोल बिघडला आहे . प्रदूषणाच्या समस्या सतत ग्रासत आहेत . खेड्यांकडून शहरांकडे वळणारा हा माणसांचा लोंढा आपल्याला थोपवता येणार नाही का ? माणसे शहराकडे भाकरीसाठी , उदयोगधंदयांसाठी येतात . खेड्यांत करण्यासारखे काही उदयोग राहिले नाहीत ; म्हणून ही माणसे शहरांकडे धावतात . खेड्यांमध्ये दारिद्र्य , कुपोषण , आरोग्याचे भीषण प्रश्न यांनी थैमान घातले आहे . शिक्षणाच्या अपूऱ्या सोयी आहेत . रोजगाराच्या संधी नाहीत . शेती करण्यासाठी पाणी , खते , वीज यांसारख्या मूलभूत सुविधा नाहीत . शासन तिकडे लक्षच देत नाही . या अडचणींना तोंड देऊन शेतकरी अन्नधान्य पिकवतात . पण त्याच्या धान्याला बाजारात भावच मिळत नाही . ऐन हंगामात दलाल , सावकार धान्याचे भाव पाडतात , भाजीपाल्यांचे भाव पाडतात . दलाल , व्यापारी श्रीमंत होतात . शेतकरी कंगालच राहतो .chala khedyankade'
_________________________________
आपल्या भारतात खेडी जास्त आणि शहरं थोडी आहेत . तरीही जो उठतो तो शहराकडे घाव घेतो . त्यामुळं खेडी दिवसेंदिवस ओस पडत चालली आहेत . वास्तविक खेडं हे भारताचं हृदय आहे . खेड्यात स्वच्छ हवा , पाणी आणि भरभरून आनंद देणारा निसर्ग आहे . ही परिस्थिती स्वातंत्र्यप्राप्तीनंतर महात्मा गांधी यांच्या लक्षात आली , तेव्हाच त्यांनी तरुणांना आवाहन केलं , ' खेड्याकडे चला . '
खेड्यात जन्माला आलेले तरुण शेतकी व्यवसायाचे पदवीधर होतात आणि शहरात नोकरी धंद्यानिमित्त स्थिरस्थावर होतात . शहरात साऱ्या सुखसोयी उपलब्ध असल्यामुळं त्यांना पुन्हा खेड्याकडे जायची इच्छा होत नाही . परिणामी , खेड्यातील जीवनमानात म्हणावी तशी सुधारणा होत नाही . काही अपवादात्मक खेडी आज सुधारलेली दिसतात . ज्या खेड्यांत वीजपुरवठा आहे . नळाचं पाणी आहे , दवाखाना आहे , वाहतुकीची पुरेशी साधनं आहेत अशी स्वयंपूर्ण खेडी थोडी . परंतु बहुसंख्य खेड्यात जीवनावश्यक सोयी उपलब्ध नाहीत ही वस्तुस्थिती आहे .
खेड्यांत अनेक लोक निरक्षर आहेत याचं प्रमुख कारण म्हणजे आजही अनेक खेड्यांत शाळाच नाहीत . त्यामुळं शिक्षणाचं महत्त्व खेड्यातील जनतेला कळत नाही . शिक्षण क्षेत्रात आपलं आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांची अशी इच्छा होती की प्रत्येक खेड्यात शाळा असलीच पाहिजे . विनाशाळेचं एकही गाव महाराष्ट्राच्या नकाशात दिसता कामा नये . इतकंच नव्हे तर , प्रत्येक नांगरामागे एक पदवीधर मनुष्य उभा राहिला पाहिजे . आजच्या पिढीत खेड्यातील तरुण पदवीधर होतीलही पण अशिक्षितांना त्याचा काय उपयोग ? खेड्यांत राहणाऱ्याला किमान लिहिता वाचता तरी आलं पाहिजे , तो साक्षर झाला पाहिजे . त्यासाठी तरुणांनी खेड्याकडं वळलं पाहिजे . वैद्यकीय शिक्षण पुरं झाल्यावर तरुण डॉक्टरनेेखेड्यात दवाखाना उघडला पाहिजे . शासकीय रुग्णालयात तालुक्याला वैद्यकीय अधिकारी म्हणून स्वेच्छेनं गेलं पाहिजे .
आरोग्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे , हे खेड्यातल्या जनतेला अजून पटलेलं नाही . पिढ्यान्पिढ्या तेच गलिच्छ राहणीमान , बुरसट विचारसरणी , जुन्या समजुती , अंधश्रद्धा . यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न व्हायला हवा . विहिरीला पाणी लागेल की नाही हे शास्त्राच्या आधारे पाहणं महत्त्वाचं असूनही देवाने कौल दिला तरच विहिरीला पाणी लागेल किंवा आजारी मुलाचा ताप उतरत नसेल तर त्याला भूतबाधा झाली , भगताकडे नेऊनच तो बरा होईल ह्या आणि अशा घातक समजुतीतून त्यांची मुक्तता केली पाहिजे . काही वर्षांपूर्वी मराठवाड्यात घडलेलं ' मानवत ' प्रकरण किंवा ' देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी मुलीला बळी दिले ' अशा बातम्या वाचल्या की मन खिन्न होतं .
खेड्यात राहणारे लोक मुंबईत किंवा अशाच शहरात नोकरी करणाऱ्या चाकरमान्यांच्या मनिऑर्डरवर अवलंबून राहून दिवस काढू पाहतात . त्यामुळे त्यांच्या ठिकाणी ऐतखाऊपणा वाढत जातो . तर काही जण सरकारकडून मिळणारी मदत किंवा तगाई त्या त्या कामाकरिता न वापरता तो पैसा बसून खातात किंवा उधळपट्टी करून खर्च करतात . व्यसनापायी प्रकृती आणि पैशाची नासाडी होते . व्यसनाधीनतेमुळे नुकसान होणार आहे ही बाब खेड्यात राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आणून दिली पाहिजे . एक गिलास का नखेड्यात राहणाऱ्या अशिक्षित लोकांना शिक्षणाचं महत्त्व अजूनही पूर्णतया पटलेलं नाही . आपल्या उन्नतीसाठी व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे , शिक्षणाने जीवनात विकास होतो या गोष्टी त्यांच्या मनावर बिंबवण्यासाठी तरुणांनी , सुशिक्षितांनी खेड्यात जाणं भाग आहे . प्रौढ शिक्षण वर्ग , छोटी - मोठी वाचनालये अशासारख्या आवश्यक सोयी खेड्यात व्हायला पाहिजेत . खेड्याचा विकास हा खऱ्या अर्थानं भारताचा विकास आहे म्हणून तरुणांनी , सुशिक्षितांनी खेड्याकडे वळणं आवश्यकच आहे .
मुलांनो तुम्हाला हा 'वैचारिक लेखनाचे प्रकार चला खेड्याकडे' कसा वाटला ? चांगला वाटला असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करा.
नमस्कार !

0 Comments