शुद्धलेखनाचे काही नियम | Suddhalekhanace kahi niyama
Some spelling rules
१) अनुस्वार
शुद्ध कसे बोलावे व लिहावे हे आपल्याला व्याकरण शिकवते. व्याकरणात त्याविषयी काही नियम असतात. व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले निर्दोष लेखन म्हणजे शुद्धलेखन होय.
शुद्धलेखनाचे काही नियम :-
१) अनुस्वार :-
१) ज्या अक्षराचा उच्चार नाकातून स्पष्टपणे होतो; त्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
उदा. तंटा, चिंच, उंट, आंबा, तंतू, घंटा, करंजी, गुलकंद, हिंग, सुंठ, गंमत, गंगा, कुंकू, कंकण
२) नाम व सर्वनाम यांच्या अनेकवचनी सामान्यरूपांतील शेवटच्या अक्षरावर, विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा.
उदा. झाडांचा, पक्ष्यांचा, त्यांचा, मुलांसाठी, कागदांवर
३) एखादे नाम आदरार्थी अनेक वचनात वापरताना त्याच्या सामान्यरूपाच्या अखेरच्या अक्षरावर अनुस्वार द्यावा.
उदा. शिक्षकांना, वडिलांना 'शुद्धलेखनाचे काही नियम | Suddhalekhanace kahi niyama'
२) ऱ्हस्व - दीर्घ
२) ऱ्हस्व - दीर्घ :-
१) मराठीतील इकारान्त व उकारान्त तत्सम (संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले) शब्द दीर्घ स्वरान्त लिहावेत.
उदा. अणू, गुरु, आकृती
२) इतर शब्दांच्या शेवटी येणारे इकार, उकार, दीर्घ लिहावेत.
उदा. गडू, घुंगरू, खाऊ, कचेरी
३) सामासिक शब्दातील पहिले पद इकारान्त किंवा उकारान्त तत्सम शब्द असेल, तर ते ऱ्हस्व लिहावे.
उदा. गुरुदक्षिणा, वायुपुत्र, कविसंमेलन
४) अकारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत.
उदा. ऊस, पूल, जमीन
५) उपान्त्य इकार व उकार असलेल्या शब्दांचे सामान्यरूप करताना इकार व उकार ऱ्हस्व लिहावेत.
उदा. गूळ - गुळासाठी, पूल - पुलाखालून, ऊस - उसाचा
तत्सम शब्द या नियमाला अपवाद आहेत.
उदा. तीर्थ - तीर्थामध्ये, तीर - तीरावरून
शुद्धलेखनाचे काही नियम | Suddhalekhanace kahi niyama
३) इतर काही नियम
३) इतर काही नियम :-
१) तीनअक्षरी शब्दातील मधले अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल, तर सामान्यरूप करताना 'ई' च्या जागी 'य' व 'ऊ' च्या 'व' करायचा.
उदा. देऊळ - देवळात, फाईल - फायलीत
२) 'पूर' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही गावाच्या नावाला लावताना त्यातील 'पू' दीर्घ लिहावा.
उदा. कानपूर, नागपूर, बेलापूर "शुद्धलेखनाचे काही नियम | Suddhalekhanace kahi niyama"
मुलांनो तुम्हाला मी शुद्धलेखनाचे काही नियम | Suddhalekhanace kahi niyama सागितले . हे तुम्हाला समजले असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट करा.👍👍
माझे YouTube channel बघा. Sachin k book review .
धन्यवाद.
0 Comments