वाचाल तर वाचाल मराठी निबंध | MARATHI ESSAY ON vachal tar vachal 2021

वाचाल तर वाचाल मराठी  निबंध | MARATHI ESSAY  ON  vachal tar vachal


वाचाल तर वाचाल मराठी  निबंध | MARATHI ESSAY  ON  vachal tar vachal 2021
वाचाल तर वाचाल मराठी  निबंध

वाचाल तर वाचाल........... 


बहिणाबाईंच्या पुढील ओळीतून सामान्य कष्टकरी माणसांचे सांसरिक चित्र उभे राहते .

अरे संसार , संसार 
जसा तवा चुल्यावर , 
आधी हाताला चटके , 
तेव्हा मिळते भाकर । 

आणि आता तुम्ही म्हणा आधी वाचन कराल , तेव्हा वाचाल वाचाल । ' वाचाल तर वाचाल यातील पहिल्या ' वाचाल ' या शब्दाचा अर्थ ' ग्रंथाचे वाचन कराल तर असा आहे आणि दुसन्या वाचाल या शब्दाचा अर्थ ' वाचन केले , की तुम्ही जीवनाच्या वाटचालीतून सहज बाहर पडणार व प्रगती करणार . असा आहे . तुमच्या विचारांना दिशा मिळणार , जगण्यात उत्साह वाटणार . पण आजच्या धावत्या जगात रमला आहे . त्याला काहीही विचारा , " थाबा , इंटरनेटवरील गुगलवर पाहूया ! असे तो म्हणतो आणि वाचन टाळत अमर्याद वेगाने पळणारा माणूस वाचनाचे महत्त्व विसरून गेला आहे . खेळ , दूरदर्शन , मनोरंजन व श्रीमंत होण्यात तो असतो . त्याला जागे करण्यास त्याला वाचनाचे महत्त्व सांगण्यास त्याला वाचनाची जाणीव देण्यास ' वाचाल तर वाचाल ' असे म्हटले जात आहे . ' खरेच , वाचन केले तरच आपण वाचणार यात शंका नाही . ' विचारवंत मानवाने ज्ञान मिळविण्यासाठी ग्रंथलेखन व वाचन प्रक्रिया सुरू केली .


 प्राचीन काळापासून ' रामायण ' , ' महाभारत ' , ' पुराणे ' अशा विविध ग्रंथांचे रोज सामूहिक वाचन करणारी भारताची परंपरा आजही टिकून आहे . भारत खेड्यांचा देश आहे . या खेड्यांतील लोक दिवसभराची कामे आटोपून देवळात पारावर अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन करून अर्थ समजावून घेण्यात मग्न असतात . अनेक वाचनप्रेमी ग्रंथालयात जाऊन वाचन करत असतात . लेखक लिहित राहतात , वाचक वाचत राहतात . म्हणून वाचन संस्काराचे संक्रमण सतत होत राहिले आहे . त्यातूनच वाचन हा मानवाच्या जीवनातील अविभाज्य भाग झाला आहे . त्याचा परिणाम असा झाला , की तो ज्ञानी झाला . त्याचा उत्साह वाढला . इच्छाशक्ती बरोबर कार्यशक्ती वाढली आणि त्याने आजचे ज्ञानी संपन्न जग निर्माण केले . सकाळी उठल्याबरोबर वर्तमानपत्रातील समाचार वाचताच मानवाच्या जीवनात चैतन्य निर्माण होते . ग्रंथ , कादंबऱ्या , लेख , पुस्तके त्याला ज्ञान व आनंद देतात . त्याचे मनोरंजन होऊन अनेकांच्या अनुभवांची शिदोरी त्याच्या बरोबर येते . अनेक यशस्वी लोकांची आत्मचरित्रे अनुकरण करण्यास प्रेरणा देतात . हे सारे त्याचा सर्वांगीण विकास करतात . त्याला शिक्षित करतात . म्हणून म्हणतात ' वाचाल तर वाचाल . ग्रंथालयात दरवर्षी हजारों ग्रंथ उपलब्ध होतात . अभ्यास करून लेखक ते लिहितात . भाषा , शास्त्रे , गणित , व्यवहार , समाजकारण , राजकारण , अर्थशास्त्र या विषयांचे वाचन अनेक जण करतात . परिणामी त्यांच्या ज्ञानात भर पडते . त्यातूनच अनेक बुद्धिमान व्यवसायिक , डॉक्टर , इंजिनिअर , वकील , पदाधिकारी निर्माण होतात . त्यामुळे मानवाच्या सर्व गरजा भागल्या जात आहेत . 


ग्रंथ वाचनात चौरस ज्ञानाचे सामर्थ्य असते . जीवनास उपयोगी असलेले रीती - रिवाज , रूढी , परंपरा , व्यवहार , आचार - विचार यांचे ज्ञान होण्यास वाचन झाले पाहिजे . नवीन विचारांचे स्वागत , नवनिर्मिती , सृजनशीलता यासाठी वाचन झाले पाहिजे . मानवी जीवनाचा इतिहास कसा आहे , चांगले काय , वाईट काय , उत्तम शिकवण कोणती हे समजण्यासाठी वाचन झाले पाहिजे . मनाला प्रसन्न करण्यास व पैसे मिळवण्यास पडणाऱ्या ज्ञानाचे वाचन झाले पाहिजे . कायदे , नियम , नियोजन , वेळापत्रके , उपाय या प्रत्येक क्षेत्राचे सखोल ज्ञान यासाठी वाचन झाले पाहिजे . वाचनामुळे तुम्ही तुमचे जीवन संपन्न कराल . स्वतःचे प्रश्न स्वतः सोडवाल . ज्ञानी रुबाबदार व्यक्तिमत्त्वात अज्ञान बरोबर न घेता योग्य निर्णयशक्ती वापराल . वाचनाचा छंद जडला तर जीवनाची नौका दिमाखात चालवाल . शरीराला अन्नाची गरज असते तशी मनाला वाचनाची गरज असते . कालांतराने वाचक हाच लेखक बनतो व वाचकाला वाचन करायला काहीच कमी पडू देत नाही . आमच्या शेजारच्या काकू नववी पास आहेत . घरची कामे आटोपून वाचन करण्यात त्या सदैव मग्न असायच्या . त्यांचे सामान्य ज्ञान अगाध आहे . आपल्या मुलांना त्यांनी पदवीधर केले आहे . आमचा दूधवाला शिक्षणात मागे पडला , पण वाचनामुळे जगाला ज्ञान वाटत फिरत असतो . आमच्या शेजारची केतकरांची आजी कॉलेजला गेली नाही , पण वाचनातून आत्मविश्वासाने स्वत : चे जग निर्माण करू शकली आहे . स्वतःचे प्रश्न सोडवून जगत आहे . सत्तरीचे संपतकाका वाचनामुळे विमानाचा प्रवास एकट्याने करून अमेरिकेतल्या मुलाला भेटून येतात . ही सारी रोजच्या जीवनातली उदाहरणे सांगतात , की कुणीही वाचावे त्यासाठी वयाचे , शिक्षणाचे बंधन नसते . मनाचे बंधन तोडा आणि वाचायला लागा .


 मग वाचता वाचता शिक्षण होते . त्यामुळे वाचन आणि शिक्षण या ज्ञानाच्या दोन्ही बाजू तुम्हाला प्राप्त होतील . समाजासाठी आपण काय लिहितो याकडे लेखकांनी लक्ष देणे आवश्यक असते . उत्तम ग्रंथाचे वाचन माणसाच्या बुद्धीचे वैभव वाढवते शिवाय वाईट गोष्टी , गुन्हेगारी , व्यसने यांपासून माणसाला दूर ठेवते . तर काय वाचावे व काय वाचू नये , याकडे वाचकांनी लक्ष देणे आवश्यक असते . कारण एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत . 




तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर ! , शेअर करा लाईक करा.

Post a Comment

0 Comments