वाक्याचे प्रकार किती व कोणते - मराठी व्याकरण इयत्ता दहावी | Vakyacee prakara kiti va konate - marathi vyakarana std 10 -2021

Vakyacee prakara kiti va konate - marathi vyakarana


व्याकरण घटकांवर आधारित कृती 

वाक्यप्रकार
 ( विधानार्थी / प्रश्नार्थी / आज्ञार्थी / उद्गारार्थी )

Vakyacee prakara kiti va konate - marathi vyakarana

 वाक्यांचे प्रकार :

वाक्यांच्या अर्थावरुन वाक्यांचे चार प्रकार आहेत :

( १ ) विधानार्थी वाक्य ( Statement )
( २ ) प्रश्नार्थी वाक्य ( Guestion ) 
( ३ ) आज्ञार्थी वाक्य ( Command )
( ४ ) उद्गारवाचक वाक्य ( Exclamation ) 


( १ ) विधानार्थी वाक्य 

• पुढील वाक्ये नीट वाचा :
( १ ) समीर दररोज शाळेत जातो .
( २ ) मी नियमित व्यायाम करतो . 

वरील केवळ विधाने ( Statements ) केली आहेत ; म्हणून अशा वाक्यांना विधानार्थी वाक्ये म्हणतात .

'Vakyacee prakara kiti va konate - marathi vyakarana'



( २ ) प्रश्नार्थी वाक्य

• पुढील वाक्ये नीट वाचा : 
( १ ) सायली , सहलीला जाणार आहेस का ?
( २ ) तुझ्या घरात किती माणसे आहेत ?

 वरील वाक्यांत केवळ प्रश्न ( Questions ) विचारले आहेत ; म्हणून अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्ये म्हणतात .


( ३ ) आज्ञार्थी वाक्य

 • पुढील वाक्ये नीट वाचा : 
( १ ) मुलांनो , शिस्त पाळा .. ( या वाक्यात आज्ञा केली आहे . ) 
( २ ) देवा , मला चांगली बुद्धी दे . ( या वाक्यात प्रार्थना केली आहे .)    
( ३ ) तुम्हांला तुमच्या कार्यात यश मिळो . ( या वाक्यात आशीर्वाद दिला आहे . ) 
( ४ ) सरोज , कृपया मला वही दे . ( या वाक्यात विनंती केली आहे . )
( ५ ) समाजाचे नेहमी भले करा . ( या वाक्यात उपदेश केला आहे . ) "Vakyacee prakara kiti va konate" - marathi vyakarana

वरील वाक्यांतील क्रियापदांवरून आज्ञा करणे , प्रार्थना करणे , आशीर्वाद देणे , विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो ; अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्ये ( Command ) म्हणतात .


( ४ ) उद्गारार्थी ( उद्गारवाचक ) वाक्य

 • पुढील वाक्ये नीट वाचा : 
( १ ) अहाहा । किती सुंदर दृश्य आहे है । ( आनंददर्शक भावना ) 
( २ ) अरेरे । घावताना पडला तो . ( शोकदर्शक भावना )
( ३ ) शाब्बास । जिंकलास तू . ( प्रशंसादर्शक भावना ) 
( ४ ) मी पक्षी झालो तर । ( तीव्र इच्छा ) 

वरील वाक्यांत मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारांतून व्यक्त झाल्या आहेत ; अशा वाक्यांना उद्गारार्थी ( उद्गारवाचक ) वाक्ये ( Exclamation ) म्हणतात .


मुलांनो तुम्हाला मी आज वाक्याचे प्रकार किती व कोणते सांगितले ! हे तुम्हाला समजले असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट करा.👍👍

 धन्यवाद.











Post a Comment

0 Comments