प्रसंग लेखन कसे कराल ? इयत्ता १० वी | Prasanga lekhana kase karave?2021

Prasanga lekhana kase karave?

प्रसंगलेखन ( गुण ८ ) 

लक्षात ठेवा : 
कृतिपत्रिकेतील प्रश्न ५ ( 5 ) मधील तीन लेखनप्रकारांपैकी एक प्रकार आहे - प्रसंगलेखन , 
प्रस्तुत प्रकरणात ' प्रसंगलेखन ' या लेखनप्रकारासंबंधात मार्गदर्शन दिले आहे . - 

विदयार्थ्यांच्या अनुभवविश्वाला परिचित प्रसंग देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाईल. किंवा

चित्र व मुदे देऊन त्याचे वर्णन करण्यास सांगितले जाऊ शकते. 

॥ शब्दमर्यादा : ८० ते १०० शब्द . .

प्रसंग लेखन कसे कराल ? इयत्ता १० वी |  Prasanga lekhana kase karave?2021
प्रसंग लेखन कसे कराल ? इयत्ता १० वी |  Prasanga lekhana kase karave?2021

प्रस्तावना : 

'Prasanga lekhana kase karave' प्रसंगलेखन म्हणजे वर्णनात्मक निबंधच होय . वर्णनात्मक निबंधात आपण पाहिलेल्या , अनुभवलेल्या प्रसंगाचे वर्णन करायचे असते . तसेच एखादया स्थळाचे , प्रसंगाचे , निसर्गातील सुंदर किंवा भीषण दृश्याचे चित्र शब्दांनी रेखाटायचे असते . साधारणत : निबंधाचे सर्व विषय आपल्या परिचयाचे असतात . त्या प्रसंगात आपण असतो , तर काय झाले असते ? असा नुसता विचार जरी मनात आला , तरी आपण त्या प्रसंगाशी एकरूप होतो , आपल्या कल्पना , भावना , विचार सारे काही तिथे एकवटते . अशा भावनिक स्थितीत आपण त्या प्रसंगाचे वर्णन केले , तर ते कोरडे वर्णन राहत नाही ; ते संवेदनशीलतेने प्रभावी बनते . वाचणाऱ्याच्या मनाला भिडते . त्याच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग साक्षात उभा राहतो . हेच वर्णनकौशल्य या प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते . 

आपण पाहिलेले दृश्य वाचकांच्या डोळ्यांसमोर उभे राहील , अशी आपल्या निबंधाची चित्रदर्शी भाषा असावी • 

Prasanga lekhana kase karave

प्रसंगलेखनातील महत्त्वाच्या बाबी : 

( २ ) त्यासाठी सूक्ष्म निरीक्षणक्षमतेची आवश्यकता असते . मग बारीकसारीक तपशिलांसह प्रसंगाचे वर्णन करता ये 
( ३ ) प्रसंगातील भावनांचेही दर्शन घडणे आवश्यक असते . 
( ४ ) चेहऱ्यावरचे भाव , हावभाव , शब्दांचे उच्चारण वगैरेंमधून संवेदनशीलता दिसते . प्रसंगवर्णनात त्याची अपेक्षा असते.

 प्रसंगलेखन नमुना कृती : 

( १ ) ' माझे बालपण ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा : 

जुन्या आठवणींना उजाळा  
गोड आठवणी 

माझे बालपण 
माझा भित्रा स्वभाव                                                                                              विहिरीत उतरण्याचा अनुभव       

 माझे बालपण

 आसपासची लहान मुले आणि त्यांचे खेळ पाहिले की , माझ्या बालपणच्या आठवणी जाग्या होतात . त्या आठ काही काळ तरी मी हरवून जातो . मला माझे सगळे बालपण नक्कीच आठवत नाही . पण आठवतात त्य आठवणीसुद्धा मला काही काळ सुखावतात "Prasanga lekhana kase karave"

कितीतरी आठवणींनी माझे बालपण सजले आहे . एकदा आमच्या विहिरीतला गाळ काढण्याचे काम चालू होते . माझे बाबासुद्घा विहिरीत उतरले होते . मी काकुळतीला येऊन मलाही विहिरीत उतरवायला सांगत होतो . मग बाबांना अचानक काहीतरी सुचले . त्यांनी माझ्या एका काकांना सांगितले , " रहाटाला बादली बांध , तिच्यात त्याला बसव आणि खाली सोड . " मग मी एखादया सम्राटासारखा विहिरीत उतरलो होतो । त्या वेळच्या माझ्या मित्रांच्या आरोळ्या अजूनही मला आठवतात . एकदा झाडावर चढलो . थोड्या अंतरावर गेलो . पण उतरता येईना म्हणून भीतीने थरथरत मोठमोठ्याने रडलो . मित्रांनी केवढी थट्टा केली ! नदीत उतरल्यावर मासे गुदगुल्या करतात म्हणून नदीतून एकदा पळालो होतो . माझ्या हातातले घावणे माकडांनी एकदा पळवले . म्हणून मी कित्येक दिवस माकडांच्या टेकडीकडे फिरकलो नाही . दुधावरच्या सायीचा आनंद तर अवर्णनीय आहे . हा आनंद मला माझ्या बालपणाने दिला आहे . त्या काळात मी रोज सकाळी वाड्याकडे घाव घेत असे आणि आजोबांनी माझ्यासाठी खास राखून ठेवलेल्या पेलाभर सायीचा आस्वाद घेत असे . आजोबा गुरांच्या रक्षणासाठी रात्री वाड्यावर झोपायला जात . सकाळी मी साय मटकावली की , आम्ही दोघे आनंदाने घरी परतत असू . माझे बालपण म्हणजे आठवणींचा ताजमहाल आहे ! 

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Prasanga lekhana kase karave

( २ ) ' अकस्मात पडलेला पाऊस ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा : 

पावसापूर्वीचे वातावरण 

प्रत्यक्ष पावसाचा , निसर्गाचा घेतलेला अनुभव 

तुमच्यावर झालेला परिणाम 

अविस्मरणीय अनुभव

 अकस्मात पडलेला पाऊस 

या दिवशी भयंकर उकडत होते . सकाळी सहा वाजतासुद्धा अंगातून घामाच्या वर येऊ लागला , तसतसा उकाड्याने जीव हैराण होऊ लागला . पंख्याखाली उभे राहिले त घामाच्या धारा वाहत होत्या . जिवाची काहिली होत होती . बसून पाहिले . उभे राहून पाहिले तरीही मन तगमगत राहिले . चैनच पडत नव्हती . 
तेवढ्यात , भर दुपार असतानाही अंधारून आले . आभाळभर काळेकुट्ट ढग जमा झाले . जोरा जमिनीवरील कागदकपटे , पालापाचोळा हवेत घुसळू लागले ... आणि काही क्षणांतच टपोऱ्या थेंबांच झाला . धुवाधार पाऊस कोसळू लागला . आभाळभर पाऊसच पाऊस होता . घराशे सर्वत्र पाण्याचे लोटच्या लोट सुसाट धावू लागले . एखादया अवखळ दांडगट नुलेसुद्धा त्याच्या अवखळपणात सामील झालो . मनसोक्त नाचू लागलो . खरे नाचत होतो . 

हा अनुभवच वेगळा होता . एरवी असा पाऊस आला की आम्ही पटापटा घरात स्त्यावर असलो तर रेनकोट घालतो . छत्र्या उघडतो . पावसाचा फारच जोर असला तर द नाज मात्र वेगळेच घडत होते . पाऊस आणि आम्ही एकत्रच होतो . आम्ही पावसात शरला होता , हे सांगणे कठीण होते . सर्व भोवताल पाऊसमय झाला होता . झाडे तर शे ती . मी मित्रमंडळींकडे पाहिले . सगळेजण झाडांप्रमाणेच निथळत होते . कानांवरून जवसाचे थेंब सरसर उतरत होते . ते दृश्य मनाला आनंद देत होते .

पावसाच्या त्या शीतलस्पर्शाने जीव सुखावला होता . मन निवांत झाले होते . आता थोड्या वेळापूर्वी मनाची अवस्था काय झाली होती ? आणि आता पाहा . पावसाने केवढा कायापालट केला होता । ही किमया फक्त पाऊसच करु शकतो . पाऊस हा ईश्वराचाच अवतार आहे . नाहीतर , मनाच्या आत आत खोलवर स्पर्श करण्याची ताकद आणाची कोणात आहे ?

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Prasanga lekhana kase karave

( ३ ) ' महापुराचे थैमान ' या विषयावर पुढील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा : 

नदीला पूर येणे . 
मनाला विषण्ण वाटणे . 
मुसळधार पाऊस , 
विजांचा कडकडाट 
शाळेचे नुकसान होणे . 
लोकांचे टेकडीवर स्थलांतर माणसे , 
गुरे पाण्यात वाहत जाणे . 

महापूराचे थैमान 

" अरे पळा , पळा ! गावात नदीचे पाणी शिरलेय । नदीला पूर आलाय । उठा , उठा , पळा , पळा ! " ही आरोळी ऐकत आणि आमच्या सगळ्यांच्या जिवाचा थरकाप उडाला . बाहेर येऊन पाहतो तो काय , जोरदार पाऊस कोसळत होता . नदीच पाण्याचा लोंढा गावाला गिळत आत शिरला होता . जो तो जिवाच्या आकांताने टेकडीवर पळत होता . आम्हीही तीच व घरली . जरूरीपुरते सामान बरोबर घेतले .

 घराबाहेर निघालो तोवर पाण्याचे लोंढे आमच्या घराला वेढत होते . त्यात मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकड सगळेच भयानक ! 

तेवढ्यात आमची सखूमावशी पाण्यात ओढली गेली . आईने टाहो फोडला । थोड्याच वेळात झोपड्या , मातीची क घरे , गुरे - ढोरे पाण्याच्या प्रवाहात वाहताना दिसू लागली . सगळीच स्थिती भयानक होती . त्यात वीज गेलेली . प्या पाणीच नव्हते . आसऱ्यासाठी कोरडी जागा नव्हती . Prasanga lekhana kase karave सगळेजण दयनीय नजरेने इकडेतिकडे बघत होते . 

धावतपळत आम्ही टेकडीवर पोहोचलो . देवळाचा आसरा घेतला , पण पावसाच्या माऱ्यापुढे कोणाचाच निभाव र नव्हता . वयोवृद्ध माणसे , रुग्ण आणि तान्ही बाळे यांचे आता कसे होणार ? सर्वांनाच काळजी लागून राहिली होती , वेळाने शासनामार्फत अन्नाची पाकिटे , औषधे , पिण्याचे पाणी आणि ब्लँकेटचा पुरवठा झाला . थोडेसे हायसे वाटर माझ्या मित्रमैत्रिणींसह स्वयंसेवक व्हायचे ठरवले . अन्नपाणी वाटणे , औषधे देणे इत्यादी कामे आम्ही मनापासून केली.

 दुसऱ्या दिवशी पूर ओसरला . नदीच्या किनाऱ्यावर दलदल झाली होती आणि प्रचंड प्रमाणात कचरा पसरला कुजलेल्या कचऱ्यात मेलेली जनावरेही होती . त्यांची दुर्गंधी सगळीकडे पसरली होती . 

जेमतेम शाळेत पोहोचलो पण तेथेही वाईट स्थिती होती . मुसळधार पावसामुळे शाळेतील वह्या - पुस्तकांचा झाला होता . ते सगळे पाहिल्यावर माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले . 

पुढे पूर ओसरला , पण मातीत मिसळलेला भाजीपाला , नदीचा गाळ आणि गढूळ पाणी पाहून सगळेच विषण होते . 

मुलांनो तुम्हाला प्रसंगलेखन हा टॉपिक आवडला असेल , Prasanga lekhana kase karave तुम्ही काही यातून शिकला असाल ,तर तुमच्या मित्रांना तो शेअर करा आणि कमेंंट करा.

Post a Comment

0 Comments