शाळा बंद पडली तर ? Śāḷā banda paḍalī tara ?

Śāḷā banda paḍalī tara ?




'ही आवडते मज मनापासुनी शाळा' कारण ती ज्ञानाचे मंदिर आहे. जगण्यासाठी माणसाला जशी अन्नाची, पाण्याची , हवेची गरज असते , त्याप्रमाणे स्व : ताच्या शरीर - मन - बुद्धीचा विकास करण्यासाठी शाळेची गरज असते . अशी ही "शाळा बंद पडली तर" ... या विचाराने मन संदिग्ध होते . तोटा की फायदा या दोन्ही प्रश्नांची उत्तरे देणे अवघड वाटतंय . 

शाळेचा बंधनकारक अभ्यास , शिस्तीचे धडे , वारंवार परीक्षा , अभ्यासाचा तगादा , बालपणाचा आनंद न मिळणे , वेळेचे बंधन आणि तुरुंगासारख्या वाटणाऱ्या शाळा यामुळे जर त्या बंद झाल्या तर सर्वांत प्रथम मुलांना व नंतर त्यांच्या पालकांना खूप आनंद होईल , कारण अभ्यास व परीक्षा बंद होतील . वेळ व खर्च वाचेल . 

मुलांच्या वाट्याला स्वच्छंदी जीवन येईल . ते खेळू बागडू शकतील . अभ्यासावरून आईबाबांची बोलणी बंद होतील . शिक्षकांचे ओरडणे ऐकावे लागणार नाही . गृहपाठ करावा लागणार नाही . मानसिक तणाव येणार नाही . आजारपण येणे शक्यच नाही . उलट सुदृढ बालक समाजाची संपत्ती असतील . शिकवणी , दप्तरांचे ओझे गेल्यामुळे मुले सकाळी आरामात उठतील . मनाप्रमाणे जीवन जगतील . नापास झाल्यामुळे आत्महत्या , नैराश्य , पेपरच्या वेळी येणारी शून्यावस्था हे सर्व प्रकार घडणार नाहीत . केवळ कॉपी करणे , पेपर फोडणे यांसारखे चुकीचे प्रकार घडणार नाहीत . म्हणून वाटते शाळा बंद पडली तर किती बरं होईल ... पण हे विचार किती चुकीचे आहेत ! 

Śāḷā banda paḍalī tara ?


कारण शाळा बंद झाल्या तर मुलांना ज्ञानाचे धडे कोण देणार ? भाषा , विज्ञान , इतिहास , शास्त्र , व्याकरण , शब्दार्थ , कविता , निबंध , भूगोल यांचे ज्ञान मिळणार नाही . त्यामुळे जीवन जगताना अज्ञान घेऊन जगावे लागेल . त्यांना बाजारहाट करणे जमणार नाही . भाषा , विज्ञान , इतिहास , भूगोल , चित्रकला , हस्तकला , गायन , कॉम्प्युटर , कोणतेही प्रकल्प , नवनवीन ज्ञान यांपासून विदयार्थी वंचित राहतील . 

शाळा शिक्षण देण्याचे कार्य करून देशातील सर्व लोकांना साक्षर करत असतात . घरानंतर शाळा विदयार्थ्यांचे दुसरे घर असते . तेथे एका मुलाला अनेक मित्र असतात . घरी बसून ते कसे मिळणार ? प्रेमळ शिक्षकांचा सहवास , त्यांच्याकडून होणारे संस्कार , त्यांचे प्रेमळ शब्द , त्यांची कौतुकाची पाठीवरील थाप , चांगल्यासाठी शिस्तीचे घडे हे सर्व काहीच मिळणार नाही . शाळेतील एकता दाखवणारे कार्यक्रम , नृत्य , गाणी , स्पर्धा , सहली , भाषणे , लेखन , वक्तृत्व यांचे कौशल्य मिळणार नाही . अनेक अनुभव शाळेत मिळतात . ते न मिळाल्याने मुले अज्ञानी राहतील . शाळा मुलांना उत्तम नागरिक बनवते . बंधु - प्रेमाचे धडे देते . पण शाळा बंद पडल्यावर हे घडणार नाही व देशाचा दर्जा सर्व क्षेत्रांत खालावलेला आढळेल . परीक्षा न दिल्याने मुलांची क्षमता समजणार नाही . इंजिनिअर , डॉक्टर , वकील , शास्त्रज्ञ , अधिकारी , शिक्षक , प्रोफेसर , लेखक , कवी , विचारवंत , न्यायाधीश आणि वैमानिक यांसारखे विविध व्यवसायिक लोक निर्माण होणार नाहीत . 

अज्ञानाच्या अंधकारात देश अन्न - वस्त्र - निवारा या गरजा भागवू शकणार नाही . झगडे , वाईट मार्ग , वाईट वागणूक , अराजकता , खून , दरोडे , सूड या वातावरणाचा पडसाद देशाच्या कानाकोपऱ्यात उमटेल . ना प्रगती , ना विकास , उलट दुःखाच्या खाईत , अडचणीच्या कचाट्यात सापडलेल्या देशावर दुसरे देश आक्रमण करतील व आपले अस्तित्व पुसण्याचे काम आपणच केले या विचाराने आपणांस पश्चात्ताप करावा लागेल . म्हणून शाळा बंद न करणे हेच योग्य आहे . 'Śāḷā banda paḍalī tara ?'

उलट अधिक संख्येने त्या उघडण्यात याव्या म्हणजे मुलांची वर्गातील संख्या कमी करून त्यांच्याकडे चांगले लक्ष देता येईल . नवनवीन सुधारणा करून चांगल्या शाळा व संपूर्ण सुविधा असलेल्या उत्तम आदर्श शाळा शासनाने निर्माण करायला हव्या . या शाळांत शिकवणाऱ्या शिक्षकांचे ज्ञान मुलांच्या विकासासाठी योग्य रीतीने कसे वापरता येईल याचा विचार करणाऱ्या शाळा निर्माण झाल्या पाहिजेत . पण शाळा कधीही बंद व्हायला नकोत . उलट हे विदयेचे मंदिर चोवीस तास उघडे राहील तर खूपच बरे होईल . त्या गुरुकुलात शिस्तीचे धडे आपोआप मिळतील . एकतेचे संस्कार सतत होत राहतील . भेदभावाच्या भावना नष्ट होऊन आपण सारी एकाच परमेश्वराची मुले आहोत याची जाणीव होईल . आपले जन्मदाते समाधानी होतील . मग लोक बोलतील , Śāḷā banda paḍalī tara ?


'धन्य धन्य ती शाळा  
जी देशासाठी तयार करते बाळा|'

माझ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनो तुम्हाला हा निबंध कसा वाटला ? आवडला तर कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा.

Post a Comment

0 Comments