आत्मकथन कसे करावे ? atmakathan Kaise karave in Marathi 2021


atmakathan Kaise karave in Marathi

                                                                                                                                               ( गुण ८ ) 

आत्मकथन 


लक्षात ठेवा : 

कृतीपत्रिकेतील प्रश्न ५ ( इ ) मधील लेखनप्रकारांपैकी अन्य एक प्रकार आहे - आत्मकथन 
 प्रस्तुत प्रकरणात ' आत्मकथन ' या लेखनप्रकाराये मार्गदर्शन दिले आहे . 
कृतीपत्रिकेत या कृतीसाठी एखादे चित्र किंवा वस्तूचे नाव दिले जाईल आणि त्या संबंधी काही मुददे दिले जातील. त्या चित्रातला घटक किंवा वस्तू तुमच्याशी बोलत आहे . अशी कल्पना करून त्याचे आत्मकथन लिहायला सांगितले जाईल . 
आत्मकथनाचा विषय विदयार्थ्याच्या परिचित अनुभवविश्वातलाच असेल . 
शस्टमर्यादा : ८० ते १०० शब्द .


प्रस्तावना :

आत्मकथन म्हणजे स्वतःच्या आयुष्याविषयीची माहिती किंवा वृत्तान्त . आपण ज्या गोष्टीचे आत्मवृत्त लिहीत असतो , ती व्यक्ती किंवा वस्तू आपणच आहोत , अशी कल्पना करून लिहायचे असते . म्हणूनच हा लेखनप्रकार प्रथमपुरुषो लिहायचा असतो . 

या लेखनप्रकारात त्या त्या गोष्टीचा जन्म , परिस्थिती , बदल , आजची स्थिती , जगताना वाटणारी सुखदुःखें इत्यादी गोष्टींचा उल्लेख करणे आवश्यक असते . 

• आत्मकथनातील महत्त्वाच्या बाबी 
( १ ) माणसाप्रमाणेच अन्य प्राणी , पक्षी , जलचर , वनस्पती यांना भावभावना व सुखदुःखे असतात , असे मानणे . 

( २ ) माणसाप्रमाणेच निर्जीव वस्तूंनाही सुखदुःखे वगैरे भावभावना असतात , असे मानणे . 

( ३ ) माणसाच्या जीवनात सर्व प्राणिमात्र व निर्जीव वस्तू यांचे महत्त्वाचे कार्य असते , हे लक्षात घेणे . 

( ४ ) सर्वच प्राणिमात्र व निर्जीव वस्तू या सगळ्यांचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून असते , असे मानणे . 

( ५ ) त्या गोष्टींच्या जागी आपण आहोत , असे मानून कल्पनेने त्यांच्या सुखदुःखांचा अनुभव घेणे आणि त्याचे लेखन करणे . 

( ६ ) या निबंधात , सजीव व निर्जीव वस्तू स्वत : च बोलत आहे , अशी कल्पना केलेली असल्याने या निबंधाचे लेखन प्रथमपुरुषो एकवचनी असले पाहिजे . 

atmakathan Kaise karave in Marathi


आत्मकथन नमुना कृती : 

( १ ) पुढील मुद्द्यांच्या आधारे ' आरसा ' या घटकाचे आत्मकथन लिहा : 

मी आरसा बोलतोय निर्मिती व शोध आरशाचा आनंद व खंत शास्त्रीय तत्त्व माणसाच्या चेहऱ्यावरील भाव हाच त्याच्या मनाचा आरसा आरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आरशाचे महत्त्व .

मी आरसा बोलतोय 

मी माझी मिशी निरखत होतो . ती अस्फुट अस्फुट दिसू लागली होती . कसा आकार होईल तिचा ? मला मिशी हवी थोडीशी रुंद . ओठांवरून किंचित उतरत उतरत येणारी आणि ओठांच्या टोकावर येताच झटकन खाली वळणारी . माझ्या मिशीचा आकार मला हवा तसा मिळाला तर मी कसा दिसेन ? मी कोणाकोणाला आवडेन ? माझ्या डोळ्यांसमोर काही चेहरे तरळू लागले . मी गुंग होत गेलो . खळखळून हसण्याच्या आवाजाने माझ्या समाधीचा भंग झाला . मी चटकन इकडेतिकडे पाहिले . पण समोरचा आरसाच मला हसत होता , हे कळायला फार वेळ लागला नाही . 

वा ! वा ! किती छान गुंग झाला होतास , नाही का ? पण ते जाऊ दे . तुम्हां माणसांना स्वप्न दाखवण्यासाठीच तर माझा जन्म झाला आहे ! 

हे बघ . प्रत्येक माणसाचं स्वत : वरच सर्वात जास्त प्रेम असतं . आपण इतरांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून प्रत्येक जण काहीतरी वेगळी कृती , कोणीही न केलेली नवीनच कृती करण्याच्या प्रयत्नात असतो . या धडपडीतूनच माणसाने या पृथ्वीतलावर अनंत पराक्रम गाजवले आहेत . म्हणून तर माणूस आज सर्व प्राण्यांचा राजा , या पृथ्वीचा राजा म्हणून वावरतोय , या पराक्रमी माणसांनी आपल्या प्रत्येक पराक्रमानंतर आरशात स्वत : ला पाहिले असणारच आणि पाहता पाहता मुठी आवळून , हात उंचावून ' माझा विजय असो ' असे मोठ्याने मनातल्या मनात घोषणा देत स्वत : चा जयजयकार केला असणारच , atmakathan Kaise karave in Marathiहे लक्षात ठेव . तुमच्या मनातल्या या प्रेरणेचा निर्माता मीच आहे . मीच तुमची प्रगती घडवून आणतो . 

आठवते का रे ? जत्रेत आपली भेट झाली होती । किती विविध रूपांत मी त्या आरसे महालात अवतरलो होतो ! तू तर नुसता लोटपोट हसत होतास . तुझ्याच किती प्रतिमा पाहायला मिळाल्या होत्या ! गोलगरगरीत , हडकुळी , एकदम बुटकी ! किती प्रतिमा ! एका आरशातली प्रतिमा आठवते ? डोकं मोठं भोपळ्याएवढं . बाकीचा देह दोनअडीच फूट फक्त ! काय हसत होता तुम्ही सगळेजण ! 

लक्षात ठेव . ही माझी रूपं केवळ विनोद करण्यासाठी निर्माण झालेली नाहीत . ड्रायव्हरला पाठीमागून येणाऱ्या गाड्या दाखवण्यासाठी मीच तर गाडीच्या कडेवर बसतो . वेगवेगळी भिंगे ही माझीच रूपे आहेत . प्रयोगशाळेतल्या सूक्ष्मदर्शकापासून अवकाशातल्या ग्रहगोलांचे निरीक्षण करणाऱ्या दुर्बिणीपर्यंत सर्वत्र मीच असतो . घरात , दारात , कपड्यांवर , दुकानांत , रस्त्यांवर , गाड्यांमध्ये , जत्रांमध्ये , 'atmakathan Kaise karave in Marathi' इथे तिथे सर्वत्र मीच असतो . पण लक्षात ठेव , मी कधी स्वतःच्या मिजाशीत राहिलो नाही . 

पाणी पिण्यासाठी माणूस प्रथम नदीत वाकला तेव्हा त्याला स्वतःलाच स्वत : चे दर्शन घडले असणार . तेव्हापासून मी त्याच्यासोबत आहे . मी स्वत : ला बाजूला ठेवून माणसाला मदत केली आहे . तूसुद्धा अशीच मदत करीत राना केवढा मोठा होशील तू ! 


atmakathan Kaise karave in Marathi


( २ ) पुढील मुद्द्यांच्या आधारे सीमेवरील जवानाचे मनोगत लिहा : 

आत्मकथन कसे करावे ? atmakathan Kaise karave in Marathi 2021
आत्मकथन कसे करावे ? atmakathan Kaise karave in Marathi 2021

          सीमेवरील जवानाचे मनोगत 

दहा महिने झाले , घर सोडल्याला . तेव्हासुद्धा घरी फक्त दोन दिवस होतो . पण इकडे सीमेवर अकस्मात गडबड झाली . दहशतवादी हल्ले सुरू झाले आणि मंजूर रजा रद्द झाली . तातडीचा हुकूम निघाला होता . डोळे पुसतच घरच्यांचा निरोप घेऊन मी घर सोडले आणि दोन दिवसांचा खडतर प्रवास करीत , या सीमेवरील छावणीत येऊन दाखल झालो . वाटेत जनतेने अत्यंत आपुलकीने वागवले . तेव्हा मनाला खूप दिलासा मिळाला . तेव्हापासून आजपर्यंत मी या मोक्याच्या ठिकाणी पहारा देत उभा आहे . हे नाके भारताच्या उत्तर सीमेवर आहे . येथून दूरवर शत्रूची चौकी दिसते . तेथेही माझ्यासारखाच त्यांचा एक जवान तासन्तास खडा पहारा देत उभा आहे . डोळ्याला दुर्बीण लावून आम्हांला सतत जागरूकपणे पहारा करावा लागतो . शत्रूच्या गोटात थोडीशी हालचाल दिसली , तरीही आम्हाला त्याची नोंद घ्यावी लागते . डोळ्यात तेल घालून आपल्या भूप्रदेशाचे रक्षण करावे लागते . 

अशा वेळी मनात येते की का आलो मी या सीमेवर ? माझ्या गावात मी सुखी नव्हतो का ? आजही मला गावातले ते दिवस आठवतात . खाऊनपिऊन सुखी होतो आम्ही . पण कुटुंब वाढले नि केवळ शेतीवर गुजराण होईना ! घराबाहेर पडणे आवश्यक झाले . लहानपणापासून सैनिक होण्याचे स्वप्न मनात घोळत होते . गावातील बऱ्याच जणांनी सैनिक होऊन मोठी कामगिरी गाजवली होती . आपणही आपल्या देशासाठी असाच पराक्रम करावा या हेतूने उत्साहाने सैन्यात भरती झालो . वर्ष - दीड वर्ष खूप खडतर शिक्षण घेऊन येथील कामगिरीवर रुजू झालो . येथे सीमेवर प्रचंड थंडी असते .

 अशा वेळी काही क्षण कामाचा कंटाळा येतो . पण लगेच कर्तव्याची आठवण येऊन पुन्हा कामाला लागतो . महिन्यातून एखाददुसरे घरचे पत्र येते व घरची खुशाली कळते . तसा हल्ली मोबाइल संपर्कही असतोच . पण प्रथम सेवा आणि नंतर घर , परवा मकरसंक्रांतीला अनेकांनी तिळगूळ पाठवला . राखीपौर्णिमेला काही भगिनींनी राख्या पाठवल्या . दिवाळीचा फराळही आला . थंडी सुरू झाली तेव्हा अनेक माता , "atmakathan Kaise karave" भगिनींनी स्वेटर - मफलर विणून पाठवले . तेव्हाच समाधान वाटले की , आपण एकटे नाही .

 आपल्यामागे आपला देश आहे . आता आम्ही आमच्या घरापासून दूर आहोत ; पण त्याची चिंता वाटत नाही . माझा देश माझ्या घरादाराची , माझ्या मुलामाणसांची काळजी घेईलच ! atmakathan Kaise karave आणि मी माझ्या देशाच्या सीमेची काळजी घेईनच !



Post a Comment

0 Comments