' राष्ट्र ध्वजाची कहाणी '
Rāṣṭra dhvajācī kahāṇī'
' सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा ' हे गीत ऐकत आपला तिरंगी राष्ट्रध्वज इंग्रजांच्या गुलामीतून भारताची सुटका झाल्याबरोबर १५ ऑगस्ट , १ ९ ४७ या दिवशी भारत देशाच्या आसमंतात फडकला . या ध्वजाची कहाणी ऐकण्यासारखीच आहे .
धरतीवरील अनेक देशांपैकी भारत एक देश आहे . निसर्गाचे वरदान आणि तीन ऋतूंचे हवामान देऊन देवान त्याला विशेष अस्तित्व दिले आहे . या देशात दालचिनी , मिरी , मिरची , लंवग , वेलची , जिरे , खसखस , हळद , लसूण यासारख्या मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन सहज व मुबलक प्रमाणात होते . ते शोधण्यास थंड प्रदेशात राहणारे इंग्रज . पोर्तुगीज , डच , फ्रेंच भारतात आले . हे व्यापारी पाहुणे म्हणून भारतात आले , पण येथे वास्तव्य करून ते भारताचे राज्यकर्ते झाले . त्यांनी भारत देशाला गुलाम केले . दीडशे वर्षे भारताने पारतंत्र्य भोगले . अर्थात तीच स्थिती कायम राहिली नाही . पुढे भारतवासी जागृत झाले . बघता बघता सारा भारत इंग्रजांविरुद्ध पेटून उठला . पुढाऱ्यांनी , देशभक्तांनी , देशप्रेमींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे ठरवले . प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे भाग घेऊन भारतीय जनतेने स्वातंत्र्यलढ्यात सहभाग दिला . ' झाशीच्या राणीने ' प्राणांचे बलिदान देऊन इंग्रज सरकारला घाबरवले . दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना विविध प्रकारे त्रास देऊन जहाल तरुणांनी नामोहरम केले . भूमिगत राहून क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या टेलिफोनच्या तारा तोडल्या , रेल्वेचे रूळ उखडले , कधी त्यांच्या तिजोऱ्या लुटल्या आणि सळो की पळो करून इंग्रजांना राज्य करणे अशक्य केले . अखेर १५ ऑगस्ट १ ९ ४७ या दिवशी भारताचे स्वातंत्र्य इंग्रजानी जाहीर केले . त्याच दिवशी इंग्रजांचा झेंडा खाली ओढला गेला व दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगी झेंडा फडकला .
Rāṣṭra dhvajācī kahāṇī'
हा ध्वज तीन रंगांच्या पट्ट्यांनी बनलेला आहे . तिसरा हिरवा रंग असतो जो धरतीची सुजलाम् , सुफलाम् स्थिती दाखवतो . मधला पांढरा रंग सर्वांना समाजात सामावून घेण्याचा , शांतीचे प्रतीक आहे . ध्वजावरील भगवा रंग क्रांतिकारकांच्या रक्ताची आहुती दाखवणारा असतो . पांढऱ्या रंगात मधोमध २४ आरे असलेले चक्र भारताच्या विकासाची गती दाखवते . हे राजा अशोकाची तसेच महाभारतातील श्रीकृष्णाची आठवण करून देते .
भारतीय संविधान सभेच्या बैठकीत या झेंड्यास एकमताने मान्यता दिली गेली . तिरंगा फडकवण्याचे काही नियम आहेत . सूर्योदयाच्यावेळी तो फडकवला जातो व सूर्यास्तावेळी तो उतरवला जातो . असा हा ध्वज १ ९ ४७ सालापासून आजपर्यंत दरवर्षी १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी मोठ्या अभिमानाने भारतात सर्वत्र फडकताना दिसतो . सरकारी कार्यालये , शिक्षण संस्था , विविध खासगी कार्यक्रमांत त्याचे आरोहण केले जाते , तर काही विशेष सरकारी इमारतीवर , संसदेवर , न्यायालयांवर तो रोज फडकत असतो . देशाचे जवान डोळ्यांत तेल घालून रात्रंदिवस जागृत राहून या ध्वजाचे रक्षण करत आहेत . प्राण गेला तरी झेंडा घट्ट मुठीत पकडून ठेवलेले वीर इतिहासात अजरामर आहेत . सीमेवर जागता पहारा देऊन भारताच्या ध्वजाचे रक्षण करणारे , 'Rāṣṭra dhvajācī kahāṇī' अभिमानाने मरणास सामोरे जाणारे व मरण पत्करण्यास तयार असलेले सैनिक या ध्वजाची शान आहेत .
१५ ऑगस्ट व २६ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय सणाला उत्साहाचे , आनंदाचे उधाण भारतीय जनतेच्या आत्म्यात स्फुरते . त्याचे श्रेय या ध्वजाला मिळते . ज्यांनी ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांची आठवण करून देण्यासाठी ध्वज आम्हांला जागृत करत असतो . तसेच कोणाकोणाची तपस्या , कोणाचे श्रम तर कोणाचा त्याग याची आठवण ध्वज करून देत असतो . त्याच्याकडे बघून नतमस्तक होताना विदयार्थ्यांपासून भारताच्या प्रत्येक रहिवाशाला आम्ही सारे एक आहोत , आमची एकता व भारताची परंपरा महान आहे , हा कानमंत्र ध्वज देत असतो . तो मंत्र प्रत्येकाला जाणवत असतो . "Rāṣṭra dhvajācī kahāṇī"
मोठ्या रुबाबात या ध्वजवंदनाचा उत्सव होत असतो . हा उत्सव देशभर साजरा होत असतो . रवींद्रनाथ टागोरांच्या जन - गण - मन या गीताने त्याला रोज वंदन केले जात असते . अशा या ध्वजाला माझे शतशः प्रणाम !तुम्हाला जर निबंध आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करा.

0 Comments