महात्मा जोतीबा फुले मराठी निबंध


महात्मा जोतीबा फुले मराठी निबंध


महात्मा जोतीबा फुले मराठी निबंध
महात्मा जोतीबा फुले मराठी निबंध
                                  
 महात्मा जोतीबा फुले 
 

 संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी साधुत्वाची लक्षणे सांगताना असे म्हटले होते की -

जे का रंजले गांजले ;त्यांशी म्हणे जो आपुले । तोचि साधु ओळखावा ;देव तेथेची जाणावा ।। 
साधुत्वाची ही लक्षणे ज्या महापुरुषाच्या जीवनकार्यात ठायीठायी प्रत्ययाला येतात असा महापुरुष महात्मा जोतीबा फुले यांच्याखेरीज अन्य कोण असू शकतो ?

   जोतीबा फुले यांचे संपूर्ण जीवन म्हणजे दीनदुबळ्यांच्या , रंजल्या - गांजलेल्यांच्या उद्धारासाठी अव्याहत महान यज्ञच होता . आपल्या समाजजीवनातील सर्व उपेक्षित वर्गांच्या उद्धाराचा ध्यास त्यांना सतत लागला होता . या कार्याच्या पूर्तीसाठी आपले उभे आयुष्य खर्ची घालण्यात त्यांनी धन्यता मानली . 

    महात्मा फुले यांचा जन्म १८२७ मध्ये झाला . भारताच्या व महाराष्ट्राच्या इतिहासातील हा कालखंड म्हणजे आपल्या समाजपुरुषाला पडलेले एक दुःस्वप्नच होते . इ . स . १८१८ मध्ये पेशवाईचा अस्त होऊन इंग्रजी राज्यकर्त्यांनी आपली पोलादी पकड भारतीय प्रदेशावर भक्कमपणे आवळत आणली होती . राजकीय गुलामगिरीच्या खाईत खितपत पडण्याचे दुर्भाग्य भारतीयांच्या नशिबी आले होते ; परंतु केवळ राजकीय गुलामगिरीपुरतीच आपल्या समाजाची दुर्दशा मर्यादित राहिली नव्हती . भारतीय समाजपुरुषाला असंख्य असाध्य व्याधींनी या काळात जणू पुरते ग्रासले होते . देव व धर्म यांच्या नावावर समाजात सर्वत्र रूढ झालेल्या अनेक अनिष्ट चालीरीती , प्रथा व परंपरा ; स्त्रियांची दुःस्थिती ; अस्पृश्य जातींच्या लोकांना जगावे लागणारे पशुतुल्य जिणे या सर्वांमधून भारतीय समाजाच्या अधोगतीचे ओंगळवाणे दर्शन घडत होते . भारतीय समाजाची ही अधोगती रोखण्याचे आणि त्याची मानवतावादी मूल्यांच्या आधारे पुनर्स्थापना करण्याचे उदात्त कार्य ज्या थोर पुरुषांनी हाती घेतले व त्याकरिता सर्व प्रकारचे कष्ट उपसले ; प्रसंगी अवहेलना सहन करूनही धीरोदात्त वृत्तीने आपल्या ध्येयाप्रत निष्ठापूर्वक वाटचाल चालू ठेवली ; अशा महापुरुषांमध्ये महात्मा जोतीबा फुले यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते .

महात्मा जोतीबा फुले मराठी निबंध


पारतंत्र्यातील अपमानास्पद जिणे ज्याला लाजिरवाणे वाटले नाही तो युवक स्वाभिमानी कसला ? महाराष्ट्राला तर प्रत्यक्ष छत्रपती शिवरायांनीच स्वातंत्र्य व स्वाभिमान यांचे बाळकडू पाजले होते . स्वातंत्र्याच्या या प्रेरणेने तरुण जोतीबांचीही अस्मिता एके काळी जागविली होती ; म्हणूनच लहुजीवस्ताद साळवे यांसारख्या गुरूकडून शस्त्रास्त्रे चालविण्याची दीक्षा त्यांनी घेतली . त्या जोरावर इंग्रजी सत्ता उलथवून टाकण्याची मनोराज्ये ते रचू लागले' 'महात्मा जोतीबा फुले मराठी निबंध'


   तथापि , आपल्या या विचारांतील फोलपणा लवकरच त्यांना कळून चुकला . सशस्त्र लढ्याच्या मार्गाने बलाढ्य इंग्रजी सत्ता उलथवून टाकणे सद्य : स्थितीत अशक्यच हे , हे त्यांच्या लक्षात आले ; परंतु यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे , या प्रश्नाचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची आवश्यकता त्यांना वाटू लागली . राजकीय स्वातंत्र्याचे महत्त्व तर वादातीतच आहे . त्याचे मोल कोण करू शकतो ? राजकीय स्वातंत्र्य 
हे कोणत्याही समाजाच्या जिवंतपणाचे प्रमुख लक्षण होय . परतंत्र समाज खऱ्या अर्थाने मृतवतच असतो ; कारण त्याने त्याचा स्वाभिमान व आत्मसन्मान यांचा बळी दिलेला असतो . म्हणून राजकीय स्वातंत्र्याला पर्याय असूच शकत नाही . असे जरी असले तरी राजकीय स्वातंत्र्याचा लाभ समाजातील सर्व घटकांना समानतेने घेता येऊ शकतो का ? या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता जोतीबांना जाणवू लागली . त्यातूनच त्यांनी आपल्या सार्वजनिक कार्याचे अग्रक्रम नव्याने निश्चित करण्याचा निर्णय घेतला . 

    जोतीबांनी आपल्या आजूबाजूच्या समाजजीवनाचे बारकाईने अवलोकन केले तेव्हा त्यांना असे दिसून आले की , भारतीय समानजीवनातील अनेक घटकांना साध्या माणुसकीचे अधिकारही येथील समाजव्यवस्थेने नाकारले आहेत . भारतीय संस्कृतीने स्त्री - शक्तीचा गौरव करून स्त्रियांना समाजात अतिशय मानाचे स्थान दिले होते . ' मातृदेवो भव ' या वचनाद्वारे मातेची महती तिने गायिली होती . ' यत्र नार्यस्तु पूज्यते , रमन्ते तत्र देवता । हा या संस्कृतीचा उदात्त संदेश म्हणजे जगापुढे ठेवलेला एक आदर्शच होता ; परंतु एकोणिसाव्या शतकातील भारतीय स्त्रियांची वास्तविक स्थिती त्याच्या नेमकी उलट होती . समाजाने स्त्रियांची सर्व प्रकारे अवहेलना चालविली होती . त्यांच्या दुःखाला पारावार उरला नव्हता . "महात्मा जोतीबा फुले मराठी निबंध" ' स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी ' असे म्हणत त्यांच्या विटंबनेवर अश्रू ढाळावेत तितके थोडेच होते .

  • भारतीय स्त्रियांच्या दैन्यावस्थेने महात्मा फुल्यांचे अंतःकरण अक्षरश : कळवळले . ज्या समाजात स्त्रियांना प्रतिष्ठा दिली जात नाही त्या समाजाची आत्मोन्नती कालत्रयीही शक्य नाही , असे त्यांचे ठाम मत बनले त्यामुळे त्यांनी प्रथम स्त्री - उद्धाराच्या कार्याकडे आपले लक्ष वळविले . स्त्रियांना शिक्षण देऊन शहाणे केल्याखेरीज त्यांची प्रगती होणे शक्य नाही , या जाणिवेतून महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचे कार्य घेतले . त्यानुसार १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली . 

जोतीबांच्या या महान कार्यात तत्कालीन समाजाने किती म्हणून अडथळे आणावेत ? स्त्रिया शिक्षण घेऊ लागल्या की समाजाची नीतिमत्ता ढासळेल आणि आपली संस्कृती धोक्यात येईल , असे येथील धर्ममार्तंडांना वाटले ; त्यामुळे त्यांनी जोतीबांची चोहोबाजूंनी कोंडी करण्याचा चंगच बांधला . जोतीबांपुढे त्यांनी अनेक संकटे उभी केली . मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नीला नाना प्रकारे त्रास देण्यात आला . काही नराधमांनी तर या माऊलीच्या अंगावर खडे व शेण फेकण्यापर्यंत मजल मारली ; परंतु असल्या क्षुद्र प्रकारांनी डगमगतील तर ते जोतीबा कसले ? अनेक प्रकारची संकटे अंगावर येत असतानाही जोतीबांचा वज्रनिश्चय अभंगच राहिला . उलट ज्याप्रमाणे अग्निपरीक्षेने सुवर्णाचे तेज अधिकच झळाळू लागते त्याप्रमाणे या संकटरूपी अग्निपरीक्षेने जोतीबांचा आपल्या ध्येयावरील विश्वास अधिक दृढ झाला . परिणामी , त्यांनी स्त्री शिक्षणाचे आपले व्रत निश्चयपूर्वक पुढे चालू ठेवले . आज समाजजीवनाच्या सर्वच क्षेत्रांत स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने सहभागी होत असल्याचे सुखद दृश्य आपणास पाहावयास मिळते . स्त्री शक्तीचा हा प्रत्ययकारी आविष्कार घडवून आणण्यात महात्मा फुले यांनी प्रारंभीच्या काळात केलेल्या पायाभरणीच्या कार्याचा सिंहाचा वाटा आहे , ही गोष्ट आपण कदापीही विसरू शकणार नाही .

    जोतीबांनी अस्पृश्यता निवारणासाठी केलेल्या कार्याचा विसर कोणास पडू शकेल ? त्या काळात अस्पृश्यांना पशूंपेक्षाही हीन लेखले जात होते . कुत्र्यामांजरांसारख्या पशूंचा सवर्णांच्या घरादारांत वावर होता ; पण अस्पृश्यांचा साधा स्पर्शही विटाळ मानण्यापर्यंत समाजाच्या अधोगतीची प्रगती झाली होती . अस्पृश्याने रस्त्यावरून चालताना । त्याची धुळीत उमटलेली पावले पुसली जावीत म्हणून त्याच्यावर कमरेला झाडाची फांदी बांधण्याची सक्ती करण्याची प्रथा निर्माण करण्याचे अघोरी कृत्य भारतीय समाजाखेरीज अन्य कोणत्या समाजाने केले असेल बरे !

       अशा या अस्पृश्य बांधवांना मदतीचा हात देऊन त्यांच्यावर मायेची पाखर घालणारा महात्मा म्हणून जोतीबांचाच उल्लेख करावा लागतो . त्यांनी अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा सुरू केल्या अस्पृश्य बांधवांना संघटित करून त्यांच्यातील आत्मविश्वास जागविला आणि त्यांना आपल्या हक्कांची जाणीव करून दिली . महात्मा फुले हे समाजसुधारक तर खरेच ; पण ते केवळ बोलघेवडे समाजसुधारक नव्हते . त्यांच्या उक्तीत आणि कृतीत तफावत नव्हती ; तर उक्तीला कृतीची साथ होती . उक्ती आणि कृतीत एकवाक्यता होती . समाजसुधारणेसंबंधीच्या आपल्या प्रत्येक विचाराला त्यांनी प्रत्यक्ष कार्याची जोड दिली होती . किंबहुना , त्यांची प्रत्येक कृती हाच समाजसुधारणेच्या कार्याचा प्रत्यक्ष वस्तुपाठ बनला होता ; म्हणूनच जेव्हा एका उन्हाळ्यात पुण्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले तेव्हा महात्मा फुले यांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नव्हते . " बोले तैसा चाले , त्याची वंदावी पावले " या संतउक्तीचे आचरण करावयाचे झाल्यास जोतीबांच्या पावलांइतकीच वंदनीय पावले अन्य कोणती असू शकतील ते महात्मा फुल्यांची समाजसुधारणेची संकल्पना समाजजीवनाच्या चार - दोन क्षेत्रांत बदल घडवून आणण्यापुरती किंवा चार - दोन सुधारणा अमलात आणण्यापुरती मर्यादित नव्हती . सामाजिक विषमता , अन्याय व शोषण यांवर आधारित भारतीय समाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याच्या उदात्त ध्येयाने ते प्रेरित झाले होते . हे लक्षात घेता जोतीबांचा केवळ समाजसुधारक म्हणून उल्लेख केल्याने त्यांच्या कार्याची व विचारांची व्याप्ती आपणास आकलन होणार नाही . समाजाच्या प्रत्येक उपेक्षित घटकाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याच्यावरील आतापर्यंतच्या अन्यायाचे परिमार्जन झाले पाहिजे , अशी त्यांची मागणी होती . याच उद्देशाने समाजातील शूद्रातिशूद्र वर्गांना संघटित करून त्यांना त्यांच्या न्याय्य हक्कांची जाणीव करून देण्यासाठी आणि या हक्कांच्या प्राप्तीसाठी संघर्ष करण्यास त्यांना प्रवृत्त करण्यासाठी जोतीबांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली . ते केवळ समाजसुधारकच नव्हते तर क्रांतिकारक होते ; खऱ्या अर्थाने क्रांतिकारक समाजसुधारक होते . भारतीय समाजातील सर्व भेदाभेद नष्ट करून सामाजिक समता व न्याय यांवर आधारित शोषणविरहित समाजाची स्थापना करणे हे त्यांचे स्वप्न होते . ते साकार होण्यासाठी त्यांनी आपले तन - मन - धन अर्पण केले होते . 

     जोतीबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक क्रांतीसाठी संघर्ष अटळ होता . वर्षानुवर्षे पडीक राहिल्याने अमाप तण व झाडेझुडपे माजलेल्या जमिनीची मशागत करून नको असलेले तण नष्ट केल्याखेरीज नवे पीक घेणे कसे शक्य आहे ? जोतीबांनी समाजातील ऐतखाऊ वर्गाविरुद्ध संघर्ष करण्याचा संदेश येथील बहुजन समाजाला दिला , त्यामागे त्यांचा उद्देश भारतीय समाजात समता व न्याय प्रस्थापित करणे हाच होता . ते एक ट्रष्टे पुरुष होते . त्यांच्या नजरेपुढे भावी काळातील समताधिष्ठित आदर्श समाज होता . त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एका मानवतावादी संताचा विलोभनीय आविष्कार प्रत्ययास येतो . तथापि , त्यांना सामाजिक वास्तवतेचेही भान होते ; त्यामुळे त्यांनी सामाजिक विषमता , अन्याय व शोषण यांचे बळी ठरलेल्या समाजघटकांना आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करण्याचा संदेश देऊन त्यांची अस्मिता जागृत करण्यावर भर दिला . महात्मा फुले यांच्या या कार्यातूनच या ठिकाणी समाजपरिवर्तनाच्या चळवळीचे बीजारोपण झाले . या चळवळीची प्रेरणा सामाजिक समता व मानवतावाद हीच होती ; म्हणूनच एका कुटुंबात विविध जातिधर्माच्या व्यक्ती गुण्यागोविंदाने एकत्र वास्तव्य करीत असल्याचे स्वप्न त्यांनी रंगविले होते . समाजसुधारणेचा याहून उदात्त विचार तो आणखी कोणता असू शकतो ? 



Post a Comment

0 Comments