नाम आणि त्यांचे प्रकार किती ? | nam ani Tyanche prakara

नाम आणि त्यांचे प्रकार किती ? nam ani Tyanche prakara kitee ?


१) नाम

नाम :
जगातील कोणत्याही दिसणाऱ्या किंवा न दिसणाऱ्या वस्तूला जे नाव ठेवलेले असते, त्याला नाम असे म्हणतात.

उदा.  
कागद,  गाई,  चिकू,  जॉकी,  गंगा,  महाबळेश्वर,  गोदावरी,  राम,  मेहनत,  चतुरपणा,  चपळाई, प्रामाणिक  इ.  

नामाचे मुख्य प्रकार आहे ते पुढील प्रमाणे :  
१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचक नाम


nam ani Tyanche prakara 


२) सामान्यनाम

सामान्यनाम :-
ज्या नामाने एकाच प्रकारच्या एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूचा किवा प्राण्याचा किंवा पदार्थाचा बोध होतो, त्या नामाला सामान्यनाम असे म्हणतात.

१) दर्शना हुशार मुलगी आहे.
२) गंगा पवित्र नदी आहे.
३) ठाणे प्रसिद्ध शहर आहे.

वरील वाक्यात 'मुलगी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही मुलीला लागू पडतो.
तसेच 'नदी' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही नदीला लागू पडतो.
आणि 'शहर' हा शब्द त्या जातीच्या कोणत्याही शहराला लागू पडतो. 
अशा प्रकारे 'मुलगी, नदी, शहर' ही नावे अशी आहेत की, ती त्या त्या जातीतील सर्व वस्तूंना, त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मांमुळे लागू पडतात.

*सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.

अ) पदार्थ वाचक नाम :-

जे घटक शक्यतो लिटर, मीटर, किंवा, कि.ग्रॅम मध्ये मोजले जातात/ संख्येत मोजले जात नाहीत त्या घटकांच्या नावाला पदार्थ वाचक नाम म्हणतात. 'nam ani Tyanche prakara '
उदा.
तांबे, कापड, पीठ, प्लास्टिक, पाणी, सोने इ.

ब) समुह वाचक नाम :-

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम म्हणतात.

उदा.
मोळी, जुडी, ढिगारा, गंज इ.

३) विशेषनाम

एखाद्या नामातून एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा अथवा वस्तूचा बोध होत असेल तर अशा नामास 'विशेषनाम' म्हणतात.
ते फक्त एका घटका पुरते मर्यादित असते. विशेषनाम एकवचनी असते. विशेषनाम हे व्यक्तिवाचक असते, विशेषनामाचे अनेकवचन होत नाही. अनेकवचन आल्यास सामान्यनाम समजावे.

उदा.
गोदावरी, रमेश, ताजमहाल, सुर्य, चंद्र इ.

विशेष नाम व्यक्तिवाचक असते तर सामान्य नाम जातीवाचक असते.
उदा.
वैभव-(व्यक्तिवाचक), मुलगा (जातीवाचक)

४) भाववाचक नाम

भाववाचक नाम / धर्मवाचक नाम :-

ज्याला स्पर्श करता येत नाही, चव घेता येत नाही, डोळ्यांनी पाहता येत नाही nam ani Tyanche prakara अशा कल्पनेने मानलेल्या गुण, अवस्था व कृती यांच्या नावांना भाववाचक नामे म्हणतात.
हे घटक वास्तुस्वरुपात येत नाहीत.

उदा.
सौंदर्य, मनुष्यत्व, विश्रांती, श्रीमंती, गर्व इ.

भाववाचक नामाचे तीन गट पडतात.

अ) स्थितिदर्शक :-
गरिबी, स्वतंत्र

ब) गुंदर्शक :-
सौंदर्य, प्रामाणिकपणा

क) क्रुतिदर्शक :-
चोरी, चळवळ


मुलांनो तुम्हाला मी आज नाम आणि नामाचे प्रकार किती व कोणते सांगितले ! हे तुम्हाला समजले असेल तर तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट करा.👍👍"nam ani Tyanche prakara "
      माझे YouTube channel बघा. Sachin k book review .

 धन्यवाद.

नाम आणि त्यांचे प्रकार nam ani Tyanche prakara

Post a Comment

0 Comments