आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत | Atmahatya kelelya setakaryacya patnice manogata

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत | Atmahatya kelelya setakaryacya patnice manogata



आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत | Atmahatya kelelya setakaryacya patnice manogata
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत 

          

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत



ती पूर्ण भांबावलेली होती . कुठे उभे राहावे ? कसे उभे राहावे ? काय बोलावे ? तिला काहीही सुचत नव्हते . समोरचा कोणीही सूचना करी , त्याप्रमाणे ती कृती करी टीव्ही वाहिन्यावाल्यांनी आपले माईकचे दंडुके समोर धरले होते . दारिद्र्य कुपोषण , रापलेपण तिच्या चेहऱ्यावर दिसत होते . तिच्या शब्दांत , उच्चारात हालचालींत संपूर्णपणे हताशपणा जाणवत होता एका शेतकऱ्याची ती पत्नी त्या शेतकऱ्याने काही दिवसांपूर्वीच आत्महत्या केली होती .

 **** टीव्हीवाल्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनी सुचवल्यावर ती बोलू लागली . साहेब काय बोलू ? नि काय सांगू घरमालकांनी आपलं जीवन संपवल आणि गेले . आम्हाला वान्यावर सोडून ! तेराव होईपर्यंत शेजान्यापाजान्यांनी आम्हाला जैऊ खाऊ घातलं . ती तरी आणखी किती घालतील ? दोन मुले पदरात आहेत . कोणाकोणाकडे काहीबाही मागून मागून पोट भरतोय आम्ही सरकारने एक लाख रुपये दिले होते . त्यातले तीस हजार एका साहेबानेच काढून घेतले . उरलेले सावकाराने घेतले. 'आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत | Atmahatya kelelya setakaryacya patnice manogata'

**** " आता सागा आम्ही गरिबांनी जगायच कसे ? माझं काहीही लय मागणं नाही . आम्हां गरिबांना काम दया भी कष्ट करीन कष्ट करून मुलांना मोठं करीन . " .** तिने बोलता बोलता पदराचा बोळा तोंडात कोंबला . हुंदका आवरला आणि पुढे बोलू लागली .. “ धरातल्या कर्त्या पुरुषाने स्वत : ला संपवल . आता आम्ही काय करायचं ? आणि करणार तरी काय ? आभाळच फाटलं तिथ कुठ कुठ ठिगळ लावणार ? म्हणजे पूर्वी फार सुखात होतो असे नाही , पण हे होते , तेव्हा निदान अर्धा घास तरी पोटात जायचा . आता मात्र अंधारच कोसळतोय अंगावर ! "

 ***परंतु दिवसच फिरले . दोन - चार वर्षे घड पाऊसच झाला नाही केलेली पेरणी फुकट गेली . पुन्हा पेरणी केली तर बियाणे खराब निघाले गत वर्षी पाऊस बरा झाला . कापूस गायदळ आला तर तो उचललाच गेला नाही . पैशाचे वांधे झाले . केलेला खर्चही भरून निघाला नाही . त्यात पोरगी मोठी झाली . गेल्या वर्षी तिचं लग्न करून दयावं लागलं . प्रत्येक कामाला पैका लागतो . सरकारी बैंकांचा तर उपयोग होतच नाही . मग गावातल्या सावकाराकडूनच उचल केली , परतफेड तर करणच शक्य झालं नाही . दामदुप्पट व्याजामुळे कर्जाचे आकडे सतत कुगतच जात होते . त्यातच घरातल्या म्हातान्या माणसाच आजारपण उभ राहिलं अडचणी सारख्या वाढतच होत्या . मालक सारखे अस्वस्थ राहत " या वर्षी मालकांनी खूप धावाधाव केली . अगदी मुंबईपर्यंत जाऊन आले . पण कुठूनही मदत मिळाली नाही . सावकाराकडून पैशाचा तगादा चालूच होता ."आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत | Atmahatya kelelya setakaryacya patnice manogata"मदतीचा हात कुठूनही नव्हता . मालक दुःखात बुडालेले गप गप असत . मग एक दिवस शेतावर गेले ते परतलेच नाहीत . स्वतःच लावलेल्या झाडावर गळफास लावून आणि जीवन संपवले ! " ते सुटले , पण आम्ही काय करायचे ? माझी पोरं अजून लहान आहेत . त्यांना शिकवायचं आहे . शेत बळकावण्यासाठी गावातील सावकार उत्सुक आहे . सरकारकडून मिळालेल्या एक लाखातली एक दमडीही आम्हांला मिळाली नाही . रोज एक वेळचंही जेवण नीट मिळत नाही . आम्ही वाटेल ते कष्ट करायला तयार आहोत . पण आम्हांला अन्न दया . गावातील इतर कुटुंबांचंही हेच दुखणं आहे . " आता सांगा , आम्ही काय करायचं ? कसं जगायचं ? आम्हाला जगू दया . या सावकारांपासून वाचवा . मला आत्महत्या करायची नाहीय . माझ्या मुलांसाठी तरी मला जगायचंय ! "



तुम्हाला वरील निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला निबंधा करता कुठला विषय हवा असेल तर तेही कळवा.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीचे मनोगत | Atmahatya kelelya setakaryacya patnice manogata

माझ्या YouTube channel बघा
Sachin k book review

Post a Comment

0 Comments