......आणि वर्गांतील बाकेबोलू लागली | ... Ani vargatila bake bolu lagali

            ......आणि वर्गांतील बाकेबोलू लागली | ... Ani vargatila bake bolu lagali

          ... Ani vargatila bake bolu lagali

       ती आज खूप खुशीत होती . खूप शिकली होती चांगल्या कंपनीत उच्च पदावरची नोकरी भरपूर पगार ... आज ती अनेक वर्षांनी आपल्या गावात शिरत होती . स्वतः गाडी चालवत ! 

     गावात शिरताच सगळे बालपण झरझरत डोळ्यांसमोरून सरकत गेले . मित्रमैत्रिणींबरोबरचे शाळेतले रम्य क्षण तिच्या मनात बागडू लागले . आठवणीतला एकेक क्षण ती गोळा करू लागली . शाळा जवळ येताच ती थांबली आणि डाळे मरून शाळा पाहू लागली , मंद पावलानी ती शाळेत शिरली . आपल्या जुन्या वर्गात गेली , आणि

 ... आणि वर्गात पाऊल टाकताच हर्षाची , "Ani vargatila bake bolu lagali" उल्हासाची सळसळ तिच्या कानांना स्पर्शन गेली . तिने चमकून पाहिले . वर्गात कोणीच नव्हते . मे महिन्याची सुट्टी चालू होती . मग आवाज ? तिने बारकाईने पाहिले , सर्व बाके हर्षोत्फुल्ल चेहऱ्याने तिच्याकडे पाहत होती . होय , बाकांचाच आवाज होता तो .

   " काय ग , किती छान दिसतेस ! तुला पाहून खूप खूप आनंद झाला , तुझ्या वेळचे दिवस जसेच्या तसे दिसू लागले बघ ! तू या वर्गात आलीस , त्याच वर्षी आम्हीसुद्धा या शाळेत आलो . आम्हाला बघून तुम्हांला केवढा आनंद झाला होता ! तुम्ही हसत खिदळत वर्गात शिरला होता , मोक्याची जागा पकडण्यासाठी केवढी धडपड चालली होती तुमची ! "

     बाकालाही खूप आनंद झाला होता . ती तिच्या नेहमीच्या बाकावर जाऊन बसली . त्या बाकाने तिला प्रेमाने जवळ केले . म्हणाले , " बस , बस . बघ माझ्या अंगावर तू तुझे नाव कोरले आहेस . आठवते ? अजूनही आहे बघ ते ! " तिने त्यावरून हात फिरवला . “ किती हुशार होतीस तू , नाही ? तुझे नेहमी कौतुक व्हायचे ! तुझ्या सोबत कायम असणारी तुझी मैत्रिण रोहिणी भेटते का ग तुला ? किती गप्पा मारायच्या तुम्ही ! सगळ्या गप्पा ऐकल्या आहेत मी . मधल्या सुट्टीत भेटून डबा खाता का ग अजून ? 

     तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले . " तुला आठवते काय ग ? तू सातवी पास झालीस , तेव्हा रानडेबाई तुझ्या घरी आल्या होत्या . ' गावात हायस्कूल नाही . तरी हिला घरी ठेवू नका . खूप हुशार आहे पोर . तिला खूप शिकवा . मोठी होईल . नाव काढल ' तूसुद्धा हे खरे केलेस ना ? आज कशी रुबाबात गाडी चालवत आलीस ! "

     तिला खूप गोष्टी भराभर आठवू लागल्या . केवढा सुखाचा ठेवा दिलाय या शाळेने ! सुखामागे धावता धावता आपण खऱ्या सुखापासून दूर गेलो की काय ? तेवढ्यात बाक पुढे बोलू लागले , " तुम्ही मित्रमैत्रिणी भेटता का ग ? आमच्यासाठी एक करशील ? तुझ्या वेळच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र कर , सगळेजण या इथे एकदा . इंटरनेट , फेसबुक इत्यादींच्या साहाय्याने सगळ्यांना गोळा करणे सोप्पे आहे ना ? कर ना मग तसे तुम्ही कोण कोण , कुठे कुठे आहात ? काय काय करता ? हे आम्हालाही कळेल . आम्हीसुद्धा तुमच्यासोबत हसू , खेळू आणखी एक करशील ? तुमच्या सुखातला एक एक दाणा इथल्या आताच्या बाळांच्या हातावर ठेवा , त्यांचेही बालपण सुखद होईल . "

Post a Comment

0 Comments