जीवनाच्या प्रवासात कितीतरी माणसे प्रत्यक्ष न भेटता प्रत्यक्ष भेटल्यासारखी भासतात . त्यांच्या जगण्याची धुंदी आगळी वेगळी असते , जी आपल्या मनाला भावते . आयुष्याचा प्रत्येक क्षण दुसन्यासाठी जगणे हेच त्यांच्या जीवनाचे तत्त्व असते . त्यांचे व्यक्तिमत्व व जीवनकार्य असामान्य , अलौकिक असते . ते गुण आपल्या जीवनात सहज उतरतात आणि मग ते आपलेच होतात . असेच एक व्यक्तिमत्व आपलेसे झाले आहे , त्यांचे नाव आहे मुरलीधर आमटे . ते सर्वांचे बाबा आमटे आहेत . कुष्ठरोग्यांचे देव आहेत .Majha avadata samaja sevaka (baba amate)
बाबांचा जन्म सन १९९४ , सव्वीस डिसेंबरला वर्धा जिल्हयात हिंगणघाट येथे झाला . जमीनदार वडिलांमुळे त्यांचे बालपण श्रीमंतीत गेले . उंची वस्त्रे घालून इंग्रजी चित्रपट पाहणे हा त्यांचा छंद होता , वडिलाच्या इच्छेप्रमाणे ते कायदयाचे शिक्षण घेऊन वकील झाले . पण त्यात त्यांचे मन रमले नाही . कारण त्यांना डॉक्टर व्हायचे होते . जीवनाच्या वाटचालीत त्यांना महात्मा गांधीजी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभला आणि त्यांच्या आदर्शामुळे त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला . त्या काळातील समाजाच्या समस्या त्यांच्यासमोर उभ्या राहिल्या . त्या सोडवताना बाबांनी स्वतःला समाजसेवेला झोकून दिले . त्या वेळी लक्ष्मीचा हात सोडून दरिद्रीनारायणाचा हात धरण्याचा निर्णय घेणारे अनेक प्रसंग त्यांनी अनुभवले . वरोन्याच्या नगरपालिकेत ते बिनविरोध निवडून आले . कार्यरत असताना या समाजसेवकाने मैल्याच्या पाट्या वाहणे , संडास साफ करणे ही कामे करून समाजाला पाठ दिला , की ही कामे फक्त क्षूद्रांनीच करायची नाहीत तर आपणही केली पाहिजेत .
एकदा तुळशीराम या कुष्ठरोगी रोग्याला रस्त्याच्या कडेला कण्हत पडलेला त्यांनी पाहिला . वेळेवर उपचार न झाल्यामुळे तो वाचू शकला नाही . अस्वस्थ बाबांचे मन द्रवले . त्यांनी आपल्या सुखी संसाराचा , श्रीमंतीचा त्याग केला . त्यांच्याबरोबर पत्नी साधनाताई होत्या . दोघे मिळून अनेक अडचणींना तोंड देत कुष्ठरोग्यांना मदत करत काही कुष्ठ्योग्यांना घेऊन ते चंद्रपूर जिल्ह्यात हेमलकसाच्या जंगलात गेले . तेथे कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन करून स्वतः तेथे राहू लागले . आपले बाहू पसरून ज्यांना आधार हवा त्यांना आधार देत , त्यांच्या पाठीवरून हात फिरवत निर्धाराने व जिद्दीने जगण्यासाठी त्यांना उमेद देत बाबांनी आपल्या कुटुंबात त्यांना सामावून घेतले . ते सर्वांचे पालक झाले , त्यांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न करू लागले . त्यांना सन्मानाने जगू दया , त्यांच्याकडे दयाबुद्धीने पाहू नका . ' असे आर्जव समाजापुढे करत बाबांनी त्यांचे आनंदवन उभे केले . दोघा पती - पत्नीने एकमेकांच्या साथीने वेदनेचे रूपांतर आनंदवनात कसे होईल , हा ध्यास घेऊन श्वासागणिक किंमत मोजली .
महाराष्ट्रातले प्रसिद्ध लेखक पु . ल . देशपांडे आनंदवनात भेट देऊन आल्यावर सांगतात , की सारी सुखे लाथाडून त्या झडलेल्या बोटांना कुरवाळीत समाजाचा , नातेवाईकांचा विरोध पचवून जगावेगळा सेवेचा वसा या बाबांनी हाती घेतला. त्याला एक वेगळाच अर्थ होता . सारे गतिरोधक ओलांडून , अपमान सोसून स्वप्नाला सत्यात उतरवण्याचे धाडस त्यांनी केले . अनेक वादळांना सामोरे जाऊन ते शांत करून करुणेतून त्यांच्या ' आनंदवना ' चा जन्म झाला . आपल्या श्रमातून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण करणारे बाबा आनंदाचे यात्रिक झाले . बरोबरीने तरुणाईत आपल्या कार्याने नवीन आकांक्षांचे बीज त्यांनी पेरले .
त्यांनी आपल्या पत्नीप्रमाणेच मुले डॉ . प्रकाश व डॉ . विकास आमटे , सुना व त्यांचे मित्र यांना मदतीला घेऊन एक मोठे कुटुंब या वसाहतीत तयार केले . लवकरच बाबांच्या नावाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले . चार भिंतीत विसावणारे हे व्यक्तिमत्त्व नव्हते . सारे आनंदवनातले लोक त्यांचे नातेवाईक झाले . कंबरेला चामड्याचा पट्टा , हातात काठी , पायात रबरी वहाण अडकवून अत्यंत साधेपणाने चालत असलेल्या बाबांना आनंदवनातल्या माणसांनी डोळ्यांत साठवले . असे लेखक पु.ल.देशपांडे सांगतात .
जीवनाच्या वाटचालीत बाबांनी रोगमुक्त झालेल्यांना तिथेच प्रपंच थाटून दिला . काळाला थाबवून नव्या जगातील दुर्दम्य आशेची गीते त्यांना शिकवली . लाचारी , अगतिकता झटकायला लावली .
बाबांच्या अशा या संसाराची प्रसिद्धी दाहीदिशांना झाली . त्यांच्या कार्याचा गवगवा होऊन लोकांनी बाबांना आदर्श समाजसेवक मानले . त्यांच्या कार्याला दाद दिली . पैशांची मदत देऊन ते बाबांच्या कार्याला हातभार लावू लागले आणि बाबांनी जंगलात सिमेंटचे बांधकाम करून वसाहतीला साऱ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या .
भारत सरकारने त्यांना ' पद्मश्री ' व पुढे ' पद्मभूषण ' , महाराष्ट्र सरकारने ' महाराष्ट्र भूषण ' , अमेरिका राष्ट्राने ‘ डेमियन डटूटन ' व आशिया खंडाने ' मॅगसेसे पुरस्कार देऊन गौरवले . अर्थात बाबा आपल्या अलौकिक कार्याने जगाचे लाडके झाले .
बाबांनी आपल्या कार्याला मर्यादा न ठेवता गरीब , दलित , शेतकरी , मजूर , पीडित लोकांसाठी वयाच्या ९ ४ वर्षांपर्यंत मोठ्या हिमतीने लोकांची सेवा केली . आपल्या कार्याचा पसारा वाढवून त्यांनी लावलेली ज्योत मुलगा डॉ . प्रकाश यांच्या हाती देऊन नऊ फेब्रुवारी २००८ रोजी चंद्रपूर जिल्ह्यात त्यांच्या निवासस्थानी त्यांनी आनंदवनाचा कायमचा निरोप घेतला .
असे होते , आदर्श समाजसेवक बाबा आमटे .
0 Comments