देशातील बेरोजगारी Deshatil Berojgari Nibandh In Marathi Nibandh
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण देशातील बेरोजगारी हा निबंध Deshatil Berojgari Nibandh In Marathi बघणार आहोत . या जगात कोणीतरी तरी किंवा बेरोजगार म्हणून जन्म घेत नाही. पण तरीही आज सुशिक्षित बेरोजगारी खूप वाढत आहे. शिक्षण घेतलेल्या व्यक्तींना रोजगार नाही याचा अर्थ आपले शिक्षण रोजगार भिमुख नाही हे उघड सत्य आहे. चला आजच्या या निबंधामध्ये आपण या विषयावर सविस्तर चर्चात्मक स्वरूपामध्ये जाणून घेणार आहोत बेरोजगारी तिची कारणे, समस्या, बेरोजगारीवर उपाय, बेरोजगारी विषयक माहिती याबद्दल चला तर मग निबंधाला सुरुवात करुया.
Deshatil Berojgari Nibandh In Marathi
ज्या देशाच्या घटनेनेच ' निधर्मी ' राष्ट्राची संकल्पना स्वीकारली आहे ; त्याच आपल्या देशात आज धार्मिक मूलतत्त्ववाद रुजू लागला आहे . जमातवाद्यांच्या विघातक कारवायांना वेग आला आहे . ' धर्म ' म्हणजे काय हेही न कळणारी युवाशक्ती जमातवाद्यांच्या वेगवेगळ्या झेंड्यांखाली गोळा होऊ लागली आहे . कोणतीही क्षुल्लक बाब जातीय दंगल घडवून आणण्यास पुरेशी ठरत आहे . प्रांतवाद व भाषिकवाद यांनीही घटनाकारांच्या बलशाली व एकात्म भारताच्या स्वप्नास धक्के देण्यास सुरुवात केली आहे . विभाजनवाद ठिकठिकाणी डोके वर काढत असून युवाशक्ती त्याच्या मोहजालात फसत आहे . बंधुत्व , समता आणि एका यांवर अढळ विश्वास असणाऱ्या पुरोगामी शक्ती या सान्यांस तोंड देण्यास असमर्थ ठरत आहेत - दुबळ्या ठरत आहेत- लंगड्या ठरत आहेत . हे असे का व्हावे ? हा प्रश्न तुमच्या - आमच्यासारख्या सामान्यजनांना अस्वस्थ करीत आहे .
अस्वस्थ करणारा हा प्रश्न आपल्याला घेऊन जातो वाढत्या बेरोजगारीकडे . ' रिकामे डोके सैतानाचे घर ' या म्हणीप्रमाणे उदरनिर्वाहाचे साधन नसलेला आजचा युवक धर्मवादाच्या प्रांतवादाच्या , भाषावादाच्या अथवा विभाजनवादाच्या सैतानाच्या मोहजालात सापडत आहे . ' जन्माला येणारा प्रत्येक जीव खाणाऱ्या तोंडाबरोबरच कामासाठी दोन हातही घेऊन येतो ' असे म्हणतात . पण , आज या दोन हातांनाच काम नाही अन् काम नसलेले हे हात विध्वंसनाच्या कामाला जुंपले जात आहेत . रिकामी पोटे तत्त्वज्ञानाच्या गोष्टी ऐकायला तयार नाहीत . हे ... हे ... असेच चालू द्यावयाचे का ? याला काही उत्तर आहे का ? 'Deshatil Berojgari Nibandh In Marathi'
होय , याला उत्तर आहे . या हातांना योग्य ते काम , बेरोजगारांना रोजगार अन् रिकाम्या पोटात पुरेसे अन्न ; हेच याचे उत्तर होऊ शकते . भारतातील लोकसंख्येपैकी ५७ टक्के लोक १५ ते ५ ९ या वयोगटातील म्हणजे काम करणाऱ्यांच्या वयोगटातील आहेत . या ५७ टक्के लोकांवर स्वतः शिवाय उरलेल्या ४३ टक्के लोकांना पोसण्याची जबाबदारी आहे . आता प्रश्न हा आहे की , या काम करू शकणाऱ्या किती लोकांना आपण काम पुरवू शकतो ? आज देशात काम करू शकणाऱ्या वयोगटातील पाच कोटींहून अधिक लोकांना कोणत्याही स्वरूपाचा रोजगार उपलब्ध नाही ; तर याहूनही अधिक लोकसंख्या अर्धरोजगारी वा अंशतः रोजगारीवर समाधान मानीत आहे . आकडेवारी पाहू जाता देशातील ३८ टक्के लोक प्रत्यक्षात काम करणारे असून उरलेल्या ६२ टक्के लोकांना पोसण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडल्याचे दिसून येते . ग्रामीण भागातील अल्प भू - धारक व भूमिहीन शेतमजूर यांनाही कुंठितावस्थेतील भारतीय शेती पुरेसे काम देऊ शकत नाही . त्यांनाही आज एक प्रकारच्या अदृश्य बेरोजगारीसच तोंड द्यावे लागते . आकडेवारीच्या मोहजालात न फसता आपल्या आजूबाजूस चिकित्सक दृष्टिक्षेप टाकला तर आज काम करणाऱ्या वयोगटातील जवळ जवळ चाळीस टक्क्यांहून अधिक लोक कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या बेरोजगारीच्या विळख्यात अडकलेले दिसून येतील .
Deshatil Berojgari Nibandh In Marathi
ग्रामीण भागातील बेकार व अर्धबेकारांना पुरेसा रोजगार उपलब्ध व्हावा , दारिद्र्यरेषेखालील भूमिहीन शेतमजुरांच्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीस दरवर्षी किमान शंभर दिवसांचा रोजगार उपलब्ध व्हावा , यांसारखी उद्दिष्टे डोळ्यांसमोर ठेवून देशात यापूर्वी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम यांसारखे काही कार्यक्रम यापूर्वी अमलात आणले गेले आहेत ; नंतर अधिकाधिक व्यापक अशा जवाहर रोजगार योजना व जवाहर ग्रामसमृद्धी रोजगार योजना देशात राबविल्या गेल्या आहेत . आजही अतिशय व्यापक स्वरूपाची संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना देशात राबविली जात आहे . सुवर्ण जयंती ग्राम स्व - रोजगार योजनेसारख्या स्वयंरोजगाराच्या योजनाही राबविल्या गेल्या आहेत- राबविल्या जात आहेत . महाराष्ट्रासारख्या राज्यात रोजगार हमीसारखे कार्यक्रम राज्यस्तरावर अमलात आणले जात आहेत ; परंतु या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीतील दोष , मुळातच या कार्यक्रमांना असलेल्या मर्यादा यांमुळे बेरोजगारीच्या प्रश्नास आपण अद्यापही यशस्वीपणे सामोरे जाऊ शकलो नाही .Deshatil Berojgari Nibandh In Marathi खरे तर , ग्रामीण रोजगार कार्यक्रम व ग्रामीण भूमिहीन रोजगार कार्यक्रम या राष्ट्रीय स्तरावरील दोन कार्यक्रमांचे जवाहर रोजगार योजनेतील विलीनीकरण , जवाहर रोजगार योजनेचे जवाहर ग्रामसमृद्धी योजनेत आणि नंतर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजनेत करण्यात आलेले परिवर्तन या पार्श्वभूमीवर रोजगारनिर्मितीच्या या कार्यक्रमांचे स्वरूपही आज काहीसे अनिश्चित झालेले आहे . त्यातच लोकसंख्यावाढीस आळा घालण्यात आपणास येत असलेल्या अपयशाने बेरोजगारीचा हा प्रश्न दिवसेंदिवस उम्र स्वरूप धारण करीत आहे . जमातवाद , राजकीय अस्थैर्य , विभाजनवाद व वाढते दारिद्र्य ही या प्रश्नाचीच अपत्ये होत .
सुस्थिर व सुसूत्र असा राष्ट्रीय स्तरावरील रोजगार कार्यक्रम , राज्यस्तरावरील रोजगार कार्यक्रमांची या कार्यक्रमाशी सांगड , शहरी बेकारांसाठी व सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मितीच्या स्वतंत्र योजना , ट्रायसेमसारख्या माध्यमातून अधिक प्रभावीरीत्या स्वयंरोजगारास उत्तेजन व मदत , खाजगी उद्योगधंद्यांस उत्तेजन , सार्वजनिक प्रकल्पांची निर्मिती व सर्वाधिक महत्त्वाचे ( आणि सर्वाधिक दुर्लक्षितही ! ) म्हणजे लोकसंख्यावाढीवर प्रभावी नियंत्रण अशा सर्वकष प्रयत्नांद्वारेच हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने आपणास काहीतरी करणे शक्य होणार आहे . शासकीय सेवांमध्ये पंचावन्नाव्या वर्षी निवृत्ती , शासकीय व खाजगी सेवांमधून ज्यांना अशा नोकऱ्यांची फारशी आवश्यकता नाही व जे स्वयंरोजगार निर्माण करू शकतात अशांना स्वेच्छानिवृत्तीस उत्तेजन यांसारखे प्रयत्नही बेरोजगारीस आळा घालण्याच्या दृष्टीने अल्प प्रमाणात का होईना , उपयुक्त ठरण्यासारखेच आहेत .
Deshatil Berojgari Nibandh In Marathi
थोडक्यात म्हणजे , जन्मास येणाऱ्या , खाणाऱ्या तोंडाची संख्या कमी करण्यास व जन्मास आलेल्या प्रत्येक दोन हातास काम पुरविण्यास आपण प्रयत्नशील असावयास हवे . ' भुकेली पोटे व रिकामे हात ' हा राष्ट्रीय विकार समजून त्यावर प्रत्येक हाताला काम व प्रत्येक पोटाला अन्न हीच औषधयोजना केल्याशिवाय आपण तरुणांना विधायक कार्यास जुंपू शकणार नाही व राष्ट्राला अराजकापासून वाचवू शकणार नाही . प्रत्येक सुज्ञ माणसाने हे ध्यानी घेऊन त्या दृष्टीने आपले उत्तरदायित्व पार पाडले पाहिजे , हीच काळाची गरज आहे , याचा विसर पडता कामा नये .
मित्रांनो बेरोजगारी बद्दल देशातील बेरोजगारी निबंध "Berojgari Nibandh In Marathi"आपण आज बघितला आणि याचे वास्तव चित्रण आपल्या आजूबाजूला आज बघायला मिळते एकदम खरी वस्तुस्थिती आहे. आपण प्रत्येकजण हे मान्य करतो रोजगार नाही व्यवसाय नाही बाजारामध्ये मंदी आहे. अशी कारणे नित्याचीच आहे. परंतु जर तुमच्याकडे कोणते कौशल्य असेल तर ते तुमचे कौशल्य रोजगार नक्कीच तुम्हाला मिळवून देईल लाखोच्या संख्येत शिक्षण घेणारे भरपूर आहेत पण कौशल्यावर आधारित शिक्षण घेणारे नगण्य आहेत त्यामुळे याला लाखोंपेक्षा पेक्षा त्या नगण्य संख्येच्या लोकांनाच रोजगार मिळेल ही उघड वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आवड असणाऱ्या शैक्षणिक अभ्यासक्रमाला निवडा अन् त्यातच आपली कारकीर्द करिअर निर्मिती करा. काम केल्याचा आनंद मिळेल छंद जोपासण्याचा आनंद मिळेल, काम करतेवेळी उत्साह राहील, नेहमी नेहमी शिकण्याची प्रक्रिया चालूच राहील आणि रोजगार निर्मिती सुद्धा होईल हे सांगणे न लगे तुम्हाला वरील निबंध कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला निबंधा करता कुठला विषय हवा असेल तर तेही कळवा.

0 Comments