१) सामान्य रूप
नामाला किंवा सर्वनामाला विभक्तिप्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागण्यापूर्वी त्याचे जे रूप होते त्याला 'सामान्यरूप' असे म्हणतात.
उदा.
१) कावळा :- कावळ्यास, कावळ्याला, कावळ्याने, कावळ्याचा.
या सर्व शब्दांमध्ये कावळ्या हे सामान्यरूप आहे.
२) समुद्र :- समुद्रास, समुद्राला, समुद्राने, समुद्राचा.
या सर्व शब्दांमध्ये समुद्रा हे सामान्यरूप आहे.
२) पुल्लिंगी नामांचे सामान्यरूप
१) 'अ' कारान्त पुल्लिंगी नामाचे रूप 'आ' कारान्त होते.
उदा.
हात - हातात
घर - घरास, घराने
झाड - झाडास, झाडाने, झाडाला
२) 'आ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.
उदा.
झरा - झऱ्याला, झऱ्याने
दोरा - दोर्यास, दोर्याने
डोळा - डोळ्यास, डोळ्याने
अपवाद: आजोबा, दादा, काका, मामा, राजा, यांचे सामान्यरूप होत नाही.
३) 'ई' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.
उदा.
पाणी - पाण्याला, पाण्यास
धोबी - धोब्याला, धोब्यास
कोळी - कोळ्याचा
अपवाद: हत्ती, नंदी, पंतोती, मुनी, ऋषी, भटजी.
४) 'ऊ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप 'वा' कारान्त होते.
उदा.
लाडू - लाडवात
भाऊ - भावास, भावाचा
नातू - नातवाला, नातवास
५) 'ए' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप 'या' कारान्त होते.
उदा.
शहाणे - शहाण्याचा, शहाण्याने
ठाकरे - ठाकऱ्यांचा,
फडके - फडक्यांचा
फुले - फुल्यांचा
६) 'ओ' कारान्त पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप 'ओ' कारान्त राहते.
उदा.
फोटो - फोटोला
किलो - किलोस, किलोला
हीरो - हीरोला, हिरोस
३) स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप
१) 'अ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात 'ए' कारान्त होते व अनेकवचनात 'आ' कारान्त होते.
उदा.
सून - सुनेस, सुनेला, सुनांना, सुनेचा
बाग - बागेला, बागांना
२) काही वेळा ‘अ’ कारान्त स्त्रीलिंग नामाचे सामान्यरूप ‘ई’ कारान्त होते.
उदा.
वेल - वेलीला
विहिर - विहिरीस, विहिरीला
३) 'आ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप ‘ए’ कारान्त होते.
उदा.
माळा - माळेत, माळेस, माळेला.
भाषा - भाषेत, भाषेस, भाषेचा.
४) 'ई' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकवचनात 'ई' कारान्त व अनेकवचनात ‘ई’ कारान्त किंवा ‘या’ कारान्त होते.
उदा.
पेटी - पेटीने, पेटीत
स्त्रि - स्त्रिस, स्त्रिया, स्त्रियांचा
बी - बीस, बियांचा
५) 'ऊ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप होत नाही. क्वचित ते 'वा' कारान्त होते.
उदा.
ऊ - ऊवास, उवाला
जाऊ - जावेला, जावांना
काकू - काकूस, काकूला
सासू - सासुला, सासवांना
६) 'ओ' कारान्त स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात होत नाही व अनेकवचनात 'आ' कारान्त होते.
उदा.
बायको - बायकांना, बायकांचा.
४) नपुंसकलिंगी नामांचे सामान्यरूप
१) 'अ' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'आ' कारान्त होते.
उदा.
मूल - मुलास, मुलाला, मुलांना
नभ - नभात, नभांना
पान - पानास, पानाला, पानांना
झाड - झाडास, झाडाचा
२) 'ई' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप ‘या’ कारान्त होते.
उदा.
मोती - मोत्यात, मोत्याचा
लोणी - लोण्यात
३) 'ऊ' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'आ' कारान्त होते.
उदा.
घुंगरू - घुंगरांचा
लिंबू - लिंबास, लिंबाचे
लेकरू - लेकरास
४) काही वेळा 'ऊ' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'वा' कारान्त होते.
उदा.
अळू - अळूवाचा
गडू - गडवास, गडवाचा
५) 'ए' कारान्त नपुंसकलिंगी नामाचे सामान्यरूप 'या' कारान्त होते.
उदा.
गाणे - गाण्याचा
तळे - तळ्यात, तळ्याला
५) विशेषणाचे सामान्यरूप
१) 'अ' कारान्त 'ई' कारान्त व 'ऊ' कारान्त विशेषणाचे सामान्यरूप होत नाही.
उदा.
त्याचे लोकरी कपड्यांचे दुकान आहे.
मला कडू कारल्याची भाजी आवडते.
२) 'आ' कारान्त विशेषणांचे सामान्यरूप 'या' कारान्त होते.
उदा.
चांगला माणूस - चांगल्या माणसास
हा कुत्रा - ह्या कुत्र्यास
0 Comments